Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 30 Jan 2024-11:17 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'GRला विरोध केल्यास OBCआरक्षण रद्द करणार', मनोज जरांगेंचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : राज्यातला मराठा आरक्षणाचा वाद आता मंडल आयोगावर येऊन ठेपलाय...मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या जीआरला विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंडल आयोगाच्या अहवालालाच आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मंडल आयोगाला कुणीही आव्हान देऊ शकत नसल्याचा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मराठा सर्वेक्षणाला 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

     

    Maratha Survey : मराठा समाजातील कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठीची मुदत आता २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलीय... राज्य मागासवर्ग आयोगानं हा निर्णय घेतलाय. मराठा समाजातील खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत करण्यात येणार होत. मात्र ते पूर्ण न झाल्यानं आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आलीय.

  • मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या नव्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. उद्याच नवा जीआर लागू करा अन्यथा १० फेब्रुवारीपासून आमदर उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. जरांगे रायगडावर छत्रपत्री शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • 2 फेब्रुवारीच्या बैठकीला आंबेडकर येणार- संजय राऊत

     

    Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : मविआच्या बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय...आजच्या बैठकीत मविआचा विस्तार...पुंडकरांचा काहीतरी गैरसमज झालाय...2 फेब्रुवारीच्या बैठकीला आंबेडकर येणार...मविआत अजिबात मतभेद नाहीत.... संजय  राऊत यांचं वक्तव्य

  • नव्या जीआरला कोर्टात आव्हान देणार-  लक्ष्मण हाके

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake on Manoj Jarange : मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरला कोर्टात आव्हान देणार असल्याचं मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन करून जीआर काढल्याचा आरोप हाकेंनी केलाय. जरांगेंनी आता कोर्टातच भेटावं असा इशारा त्यांनी दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ashok Saraf : आपल्या सदाबहार अभिनयानं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा सर्वोच्च पुरस्कार देऊन अशोक सराफांचा गौरव करण्यात येणाराय. २५ लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन अभिनयातून घडवलं, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचं अभिनंदन केलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार जलील आक्रमक

     

    Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बुडालेल्या बँका आणि पतसंस्था यांच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं वृद्ध आणि महिला सामील झाल्या. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील काही बँकांवर आरबीआयनं निर्बंध आणले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपये बँका आणि पतसंस्थांमध्ये अडकले. संचालक मंडळानं पोबारा केला. याविरोधात जलील यांनी आंदोलन सुरु केलंय.. यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं..

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर?

     

    Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. येत्या आठवड्यात दिल्लीत NDA ची बैठक होणाराय... लोकसभा निवडणूक जागावाटपाबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचं समजतंय. त्यासंदर्भात शिंदे-पवारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

  • पंतप्रधान मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर?

     

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौ-यावर येण्याची शक्यता आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ल्यावर पंतप्रधान मोदी नतमस्तक होण्याची शक्यता आहे. तसंच पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनलचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 

  • नारायण राणेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

     

    Narayan Rane met Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय...सह्याद्री अतिथीगृहावर दोघांची भेट झाली...या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. ..

  • तर OBCचं 27% आरक्षणही रद्द करणार - मनोज जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj jarange on Mandal Commission : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा जरांगेंनी दिलाय.. मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही. मात्र मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय.. मंत्री छगन भुजबळ जर मराठा आरक्षणाला आव्हान देत असतील तर आम्हीही ओबीसींना आव्हान देऊ असा जाहीर इशारा जरांगेंनी दिलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एकनाथ शिंदे वंचितसोबत जाणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिलीय.. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिलीय.. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झालीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंची आणखी एका लढ्याची घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगेंनी आज आणखी एका आरक्षणाच्या लढ्याची घोषणा केलीय.. येत्या काळात धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी काम करणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलीय.. धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी जरांगेंनी आता रणशिंग फुकलंय.. रायगडावरुन जरांगेनी ही घोषणा केलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई महापालिकेत शिंदे गटाचा घोटाळा - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्याच नेत्यांना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल या शिंदे गटाच्या नेत्यांची नावं घेत राऊतांनी हा आरोप केलाय. या नेत्यांची नावं घेण्याची हिम्मत ईडी आणि किरोट सोमय्यांमध्ये आहे का असा सवाल राऊतांनी विचारलाय.. पलटवार करण्याची संधी आम्हालाही मिळणार, मात्र आम्ही वार केल्यावर तुम्ही उठणार नाही.. असा इशाराही राऊतांनी शिंदे गटाला दिलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विनोद तावडे, पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajyasabha Election : भाजप नेत्या पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.. पंकजा मुंडेंसोबतच विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाचीही राज्यसभेसाठी चर्चा आहे... राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे.. विनोद तावडे सध्या भाजपचे बिहारचे प्रभारी आहेत.. बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. केंद्रीय नेतृत्व लवकरच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचंही सूत्रांनी म्हटलंय.  येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • किरीट सोमय्यांनी पुढे यावं - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांनी समोर यावं असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय.. किरिट सोमय्यांविरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला पुढे आल्यात.. किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा आरोप या महिला करत असल्याचा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केलाय.. मात्र आम्ही राजकाऱण कुटुंबापर्यंत नेत नाही अशा शब्दांत राऊतांनी सोमय्यांना इशारा दिलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मानवी मेंदूत कॉम्प्युटर चिप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Computer Chip In Brain : मानवी मेंदूत कॉम्प्युटर चीप बसवण्यात यश आलंय.. अमेरिकेत डॉक्टर्सनी एका रुग्णाच्या मेंदूत टेलिपथी हे यंत्र यशस्वीपणे बसवलंय... एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंकने हा प्रयोग यशस्वी केलाय.. स्वतः एलॉन मस्क यांनी ही माहिती दिलीय.. मेंदूत चिप बसवण्याच्या प्रयोगामुळे अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होणार आहे.. या सुपर चिपमुळे मानवी मेंदू थेट कॉम्प्युटरला जोडला जाणार आहे.. ही चीप मानवी मेंदूच्या हालचाली रेकॉर्ड करमार नाही तर त्यावर प्रभावसुद्धा टाकण्याचं काम करेलं.. पार्किन्सनसारख्या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही चीप म्हणजे चमत्कार असल्याचा दावा न्यूरालिंकने केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • टाटा पॉवरचा दरवाढीचा शॉक?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tata Power To Hike Electricity Bill : मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी.. कारण मुंबईत टाटाची वीज महागण्याची शक्यता आहे.. खास करुन छोट्या घरगुती ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे.. टाटा पॉवर कंपनीकडून वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय.. 100 युनिट वीजेसाठी लागणा-या दरात तीप्पट वाढ होणार आहे.. गेल्या काही वर्षांमध्ये वीज वसुली कमी होत असल्याचं कारण देत वीज दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. तेव्हा हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची ईडी चौकशी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sandeep Raut : संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलंय. कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलंय. सूरज चव्हाणच्या चौकशीतून संदीप राऊतांचं नाव समोर आलंय. तेव्हा संदीप राऊत आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय... कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे.. किशोरी पेडणेकर आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत.. दरम्यान, या घोटाळ्याशी आपला काडीचाही संबंध नाही, असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकरांनी दिलंय....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • यवतमाळमध्ये 2 शिक्षकांना मारहाण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Yavatmal Maratha Survey : यवतमाळमध्ये मराठा सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या दोन प्रगणकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.शिक्षक संदीप पत्रे आणि अमोल बाबरे यांच्यासोबत हा प्रकार घडलाय. यवतमाळ शहराच्या जिजाऊ नगर परिसरात ते दोघे शिक्षक सर्व्हेक्षण करण्यासाठी गेले होते. मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस तक्रार करण्यात आलीये. त्याचबरोबर सर्व्हेक्षण करणा-या प्रगणकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी होतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगे पाटलांचा रायगड दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगे पाटील आज किल्ले रायगडावर जाणार आहेत.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आज जरांगे जाणार आहेत.. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जरांगे दर्शन घेतील... रायगड दौ-यानंतर जरांगे स्वत:च्या घरी जाण्याची शक्यता आहे.. दरम्यान सगे-सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा फाईट होणार असा इशारा जरांगेंनी रायगडाकडे रवाना होण्याआधी दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai India Alliance Meeting : मुंबईत आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे.. राज्यातल्या लोकसभेच्या जागावाटपावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.. मराठवाड्यातलं लोकसभेचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. त्यामुळे इतर जागांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. दुसरीकडे इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी आघाडीला मोठा धक्का दिलाय.. इंडिया आघाडीची साथ सोडत त्यांनी भाजपसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. त्याचेही पडसाद या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link