Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
गिरीष महाजनांची एकनाथ शिंदेंशी चर्चा
Girish Mahajan's discussion with Eknath Shinde : भाजप नेत्यांशी बोलण्याचा शिंदेंना आग्रह..गिरीष महाजनांची एकनाथ शिंदेंशी चर्चा...शिंदे-महाजन भेटीबाबत झी 24 तासला सूत्रांची माहिती...किमान व्हीसीसाठी तरी बसण्याचा आग्रह-सूत्र... फडणवीसांशी फोनवर बोलण्याचा महाजनांचा आग्रह
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भाजपचे संकट मोचन गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत. महाजन शिंदेंच्या निवास स्थानी पोहोचले असून यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
'दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार',सुनील तटकरेंचा दावा
Sunil Tatkare : मुख्यमंत्रिपदाबाबत सुनील तटकरेंचा मोठा दावा...दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं'... भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलंय- तटकरे...सुनील तटकरेंची मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
उद्या निवडणूक आयोगाशी मविआचे नेते करणार चर्चा
Mahavikas Aghadi : निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात नाना पटोले यांचा समावेश...३ डिसेंबरला म्हणजे उद्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ घेणार निवडणूक आयोगांची भेट..विरोधकांनी महाराष्ट्रातील निकालाबात ईव्हीएमवर आक्षेप घेतले होते...त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोध करणाऱ्या नेत्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं..या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असून या शिष्टमंडळात नाना पटोले यांचा समावेश आहे...महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी राज्यातील विधानसभा निवडणुक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नाहीत
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नाहीत... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार मात्र दिल्लीला रवाना
ठाणे शहरात आजपासून 8 दिवस पाणीकपात
Thane Water Cut : आजपासून संपुर्ण ठाणे शहरात आठवडाभर पाणी कपात...मुंबई ला १० टक्के पाणी कपात सुरू आहे, दुरुस्ती चे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे शहरात देखील पाणी कपात होणार आहे...पुढील आठ दिवस पाणी जपून वापरण्याचे ठाणे पालिकेचे आवाहन.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
अविनाश जाधव यांनी घेतला राजीनामा मागे
MNS Avinash Jadhav Resignation Withdtraw : अविनाश जाधव यांनी जिलाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे...राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची माहिती...आता अविनाश जाधव पुन्हा ठाणे आणि पालघर जिलाध्यक्ष म्हणून करणार काम ..इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा कधीच विचार करणार नाही अशी दिली माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
महाराष्ट्रासाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा
BJP : महाराष्ट्रासाठी भाजपकडून निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे....केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....ते उद्या रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे...तर 4 डिसेंबरला सकाळी भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदासाठी बैठक पार पडणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द- सूत्र
Eknath Shinde meeting cancelled : एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द झाल्याची सूत्रांची माहिती.. आज आमदारांची बैठक बोलावली होती... एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे सर्व बैठका रद्द, आज एकनाथ शिंदे ठाण्यात असतील.. एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नागपुरात टोळक्याकडून तरुणाला मारहाण
Nagpur : नागपूर विद्यापीठ रोडवरील हिंदुस्तान कॉलोनी येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये घुसून तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला.या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झालाय. विद्यापीठ रोडवर तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. यामुळे संबंधित तरुण आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये शिरला. मात्र हल्लेखोरांनी त्याला अडवत तिथेच मारहाण केली. दरम्यान मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा - नागपुरात रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये तरुणाला बेदम मारहाण
खासदार संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल
Sanjay Raut : फक्त गृहमंत्रिपदावरून सरकार स्थापनेत अडचण येत नसल्याचा आरोप शिवसेना UBT खासदार संजय राऊतांनी केलाय. इंतकंच नाही तर फडणवीसांच्या जागी दुसरं कोणी आणलं जातंय का ? असा सवाल करत सत्ता स्थापनेवरून राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
आमदार राजेश वानखडेंचा यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप
Amravati Yashomati Thakur Vs Rajesh Wankhede : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार राजेश वानखडेंनी केलाय. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात एकही उद्योग आणला नाही. एक दूध डेअरी उभा केली. त्यातही आर्थिक गैरव्यवहार केला, असा निशाणा वानखडेंनी साधलाय. यशोमती ठाकूरांनीवानखडेंच्या आरोपाचं खंडण केलंय. आर्थिक गैरव्यवहार झालाय, याचे पुरावे सादर करा, असं आव्हान यशोमती ठाकूर यांनी वानखडेंना दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राजेश वानखडेंचा यशोमीत ठाकूर यांच्यावर आरोप
Amravati Yashomati Thakur Vs Rajesh Wankhede : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार राजेश वानखडेंनी केलाय. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात एकही उद्योग आणला नाही. एक दूध डेअरी उभा केली. त्यातही आर्थिक गैरव्यवहार केला, असा निशाणा वानखडेंनी साधलाय. यशोमती ठाकूरांनी वानखडेंच्या आरोपाचं खंडण केलंय. आर्थिक गैरव्यवहार झालाय, याचे पुरावे सादर करा, असं आव्हान यशोमती ठाकूर यांनी वानखडेंना दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवसेना UBTचा पुन्हा स्वबळाचा नारा?
Sachin Ahir : विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना UBT पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात अशी मागणी शिवसैनिकांकडून होतेय...विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा दिल्या नाही ही नाराजी असून येणा-या निवडणुका स्वबळावर की आघाडीत लढव्यात याबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत संभ्रम
BJP Meeting Update : शपथविधीची तारीख 5 डिसेंबरला निश्चित झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक ही आज किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती .मात्र अद्याप पर्यंत आमदारांना या बैठकीसंदर्भातले कोणताही निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत..दरम्यान विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या किंवा परवा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बैठकीत भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
तेलंगणात 2 अपत्य योजना बंद होणार?
Telangana : आंध्र प्रदेशानंतर आता तेलंगणामध्येही 2 अपत्य योजना बंद होण्याची शक्यताये. तेलंगणा राज्य सरकारनं कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू केल्यात, अशी माहिती सूत्रांनं दिलीय. देशाच्या जन्मदर 2.11 आहे. तर तेलंगणाचा जन्मदर केवळ 1.5 आहे. भविष्यात लोकसंख्या घटण्याचा धोका लक्षात घेता तेलंगणा सरकार 2 अपत्य योजना बंद करण्याच्या विचारात आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही लढवणं शक्य होत नाही. हे निर्बंध हटवण्यासाठी तेलंगणा सरकारनं ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय. 2018 च्या पंचायतराज कायद्यात संशोधन केलं जाणारेय. त्यानंतर ते मंजुरीसाठी मंत्रीमंडळासमोर ठेवले जाणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विक्रांत मेस्सीची 'फिल्मी' रियाटरमेंट पोस्ट
Vikrant Massey : अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून सन्यास घ्यायचा ठरवलंय. तशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकलीय. मेस्सीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मात्र धक्का बसलाय.टीव्ही मालिकांपासून सुरु केलेल्या करियरनंतर गेल्या काही वर्षात मेस्सीचे सिनेमेही खूपच गाजले. 12 वी फेल, द साबरमती रिपोर्ट, तसंच वेबसीरीजमधल्या त्याच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष दाद मिळाली. मात्र मेस्सीने अब समय आ गया है म्हणत शेवटचे दोन सिनेमा आणि अनेक वर्षांच्या आठवणी...धन्यवाद म्हणत चाहत्यांचे आभार मानलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
EVMमध्ये छेडछाड झाल्याचा संशय - प्रणिती शिंदे
Solapur Praniti Shinde : विधानसभेची निवडणूक सरळ झाली नाही. यात षडयंत्र केलं गेलं, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरच्या सभेत केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेह-यावर विजयाचा आनंद दिसत नाही. ते मागच्या दाराने येऊन विजयी झालेत, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय. EVMमध्ये छेडछाड झाल्याचा संशयही त्यांनी यावेळी बोलताना केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवशाही बससेवा कायचमी बंद होणार?
Shivshahi Bus Service : शिवशाही बससेवा कायमची बंद होणार असल्याची शक्यताय. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनानं शिवशाही बससेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. शिवशाहीच्या गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे बसच्या अंतर्गत आणि बाह्य रचनेत आवश्यक तो बदल करून त्याचं रुपांतर साध्या बसमध्ये अर्थात लालपरीत करण्यात येणारेय. एसटीच्या वरिष्ठ अधिका-याकडून ही माहिती मिळालीये. त्यामुळे येत्या महिन्यांतच शिवशाहीची चाकं कायमची थांबणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कोकण रेल्वे मार्गावर निडी ग्रामस्थांचा रेलरोको
Konkan Railway Protest : कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील निडी ग्रामस्थांनी रेलरोको आंदोलन केलं. रेल्वे फाटक बंद केल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी दुरांतो एक्स्प्रेस रोखून धरली. त्यामुळे ही एक्स्प्रेस रखडली. पावसाळ्यात भुयारी मार्गामध्ये पाणी साचतं. यामुळे पर्यायी आणि सोयीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. अखेर पर्यायी मार्ग एपलब्ध होत नाही तोपर्यंत फाटक बंद करणार नाही, असं आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
संभाजीनगरमध्ये शिवसेना UBTचं आंदोलन
Sambhajinagar Shivsena UBT Protest : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाची हाक पुकारलीय. बांगलादेशात हिंदूवर अन्याय, अत्याचार होत आहे आणि केंद्र सरकार शांत बसून पाहात आसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज शहरातील क्रांती चौकात आंदोलन केलं जाणारेय. या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन अंबादास दानवेंनी ट्विटरवरून केलंय.
राज्यात थंडी ओसरली, चक्रीवादळाचा फटका
Maharashtra Cold Wave : राज्यभरात थंडी कमी झालीय. रविवारी ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झालीय , किमान तापमान हे 11 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलंय. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात आजही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 8 डिसेंबरपासून पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईत दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train)
हेसुद्धा वाचा : Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...
राज्यात थंडीनं मारली दडी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा आणि तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या 'फेंगल/ फेइंजल' या चक्रीवादळामुळे हवामान प्रणालीत हे बदल झाल्याचं सांगितलं जात आहे. चक्रीवादळामुळं तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होत असून, काही क्षेत्रांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. याच कारणास्तव राज्यात तग धरलेल्या थंडीवरही परिणाम होत असून, तापमानवाढ नोंदवली जात आहे.
सविस्तर वृत्त- Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; कोणत्या भागाला बसणार तडाखा?
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलं
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलंय. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर 26 तारखेला सरकार स्थापन होणं गरजेच होतं मात्र, लग्नाची तारीख जवळ अन् नवरदेव हुंड्यासाठी रुसला असल्याची टीका रोहित पवारांनी केलीये.
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद?
दरम्यान शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्रपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू आहे..याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.
सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? - एकनाथ शिंदे
जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? असा सवाल करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
आताच्या क्षणाची मोठी बातमी; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
पीटीआयनं भाजप नेत्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांच्यावर पुढील दोन दिवसांमध्ये भाजपच्या संभाव्य बैठकीमध्ये विधीमंडळ पक्षनेतेपदासंदर्भातही मोठा निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी रात्री भाजप नेत्यानं यासंदर्भातील माहिती वृत्तसंस्थेला दिली.