Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार- सूत्र
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार-सूत्र...शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती...एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार...विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा 'एक है तो सेफ है'चा नारा
Devendra Fadanvis : भाजप गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक है तो सेफ है चा नारा दिला. विधीमंडळ पक्ष बैठकीत एकमताने फडणवीसांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात फडणवीसांनी पुढचा प्रवास संघर्षमय असून आपल्याला संघर्ष करायचा असल्याचं म्हटलं..
देवेंद्र फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड
Devendra Fadanvis : भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड करण्यात आलीय.विधीमंडळ पक्ष बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला...त्यानंतर सर्वांनी अनुमोदन केलं. यावेळी एकमेव फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचीच भाजपच्या गटनेतेपदी त्यांची निवड झाली. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीसच उद्या शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय. देवेंद्र फडणवीस उद्या तिस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
मित्रपक्षांमुळे काँग्रेस अडचणीत?
Congress : मविआत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झालीय.. कारण ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देण्यात आल्यानंतर आता काँग्रेसच्या महिला खासदारांनी राहुल गांधींकडे मित्रपक्षामुळे निवडणुकीत काँग्रेसला फटका बसल्याचं तक्रार केलीय.. तशी माहिती सूत्रांनी दिलीय.. काँग्रेसच्या महिला खासदारांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतलीय.. यावेळी महिला खासदारांनी नाना पटोलेंचीही तक्रार केल्याची माहिती आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीला आग
Nanded Fire : नांदेडमध्ये मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीला आग लागली... पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली.. अग्निशमन दलाच्या जवानांनी वसतिगृहात अडकलेल्या सर्व मुलींची सुखरुप सुटका केली.. या आगीमध्ये इमारतीमधील एका हॉटेल आणि मोबाईल दुकानाचं मोठं नुकसान झालंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
देवेंद्र फडणवीसांकडे गृहखातं असणार - सूत्र
Eknath Shinde & Devendra Fadanvis Meeting : शिंदे - फडणवीसांच्या भेटीत गृहखात्याबाबतचा वाद मिटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. या दोघांमध्ये काल 25 मिनिटं चर्चा झाली.. त्यात गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडेच असेल, असं ठरलंय. एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचं मंत्रिपद असेल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून काठीनं मारहाण
Ambernath Student Beaten : अंबरनाथमधील एका शाळेत 7 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेनं काठीनं मारहाण केल्याची घटना घडलीय.... इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग बोलता न आल्यानं विद्यार्थ्याला शिक्षिकेनं मारहाण केली....याप्रकरणी शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...
गोंदियात 3 वर्षांच्या मुलावर बिबट्यानं हल्ला
Gondiya Leopard Attack : गोंदियातील गोठणगावात एका 3 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडलीय....बिबट्याने या चिमुकल्याला पकडून 50 मीटर फरफटत नेलं... यावेळी गावक-यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडलं... त्यामुळे सुदैवानं या चिमुकल्याचे प्राण वाचले...मात्र या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय... तसेच या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो.. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील यावेळी गावक-यांनी केलीय...
राज कुंद्राला पुन्हा ईडीचं समन्स
Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीनं पुन्हा समन्स बजावलाय.. पोर्नोग्राफीच्या आरोपांप्रकरणी चौकशीसाठी ईडीन हा समन्स बजावलाय.. २ डिसेंबरला ईडीने त्याला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र तो किंवा त्याचा वकील कुणीही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.. त्यामुळे ईडीनं त्याला पुन्हा समन्स बजावलाय.. राज कुंद्रा याच्यावरील पोर्नोग्राफी आरोपाप्रकरणी २९ नोव्हेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि उत्तर प्रदेशात एकूण १५ ठिकाणी छापेमारी केली होती. शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा याच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानीदेखील छापे टाकण्यात आले होते.
भाजपा आज गटनेता निवडणार
भारतीय जनता पार्टीचा गटनेता आज निवडला जाणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.