Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 13 Dec 2024-10:39 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Western Railway  : रविवारी 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे... पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावदरम्यान 5 तासांचा जम्बोब्लॉक असणार आहे...या दरम्यान स्लो ट्रॅकवरच्या ट्रेन बंद असतील...तर फास्ट ट्रॅकवरूनच स्लो गाड्या धावतील....बोरिवली आणि गोरेगावदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे...ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhanajay Nikam : सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय..2 दिवसांपूर्वी सातारा आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता....सातारा जिल्हा न्यायालयात निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता..तो आज फेटाळण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार?

     

    Maharashtra Politics : महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार?...झी 24 तासला महायुतीच्या सूत्रांची माहिती...भाजपचं त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार?...शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरण्याची शक्यता..राष्ट्रवादीही पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार?

  • नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला- सूत्र

     

    Maharashtra Politics : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळतेय. 

  • अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर

     

    Actor Allu Arjun Granted Bail : अभिनेता अल्लू अर्जुन याला तेलंगणा हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्याआधी अभिनेता अल्लू अर्जुन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला सकाळी अटक केली. त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याविरोधात हैदराबाद हायकोर्टात दाद मागण्यात आली. तिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 
     

  • अश्विनी भिडेंची CMOत प्रधान सचिवपदी नियुक्ती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ashwini Bhide : मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात झाल्याचं यातून दिसून येतंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवस न्यायालयीन कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 15 डिसेंबरला नागपुरात शपथविधीची शक्यता?

     

    Mahayuti : महायुतीचा शपथविधी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आमदारांच्या सोईसाठी नागपुरात 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 16 तारखेपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे 15 डिसेंबरला नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

  • 'बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या', खासदार प्रियंका गांधींची मागणी

     

    Priyanka Gandhi : प्रियंका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण...महिल्याच भाषणात केंद्र सरकारवर हल्लाबोल...देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या-प्रियंका गांधी...पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींची मागणी...भारतीय संविधान नागरिकांसाठी सुरक्षा कवच-प्रियंका गांधी

  • 'EVM असेपर्यंत निवडणूक लढणार नाही', आमदार उत्तम जानकरांची घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uttam Jankar on EVM :  EVM विरोधात उत्तम जानकर आक्रमक... EVM असेपर्यंत निवडणूक लढणार नाही आणि मतदानही करणार नाही - उत्तम जानकर...निवडणूक न लढण्याची आमदार उत्तम जानकरांची मोठी घोषणा

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • हिंदुत्वावरुन आरोप-प्रत्यारोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thacekray Vs Sanjay Shirsat : बांगलादेशात हिंदुंवर होणा-या अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीये.. हिंदूंवर अत्याचार होत असताना मोदी गप्प का असा सवाल त्यांनी विचारलाय.. तर हिंदूत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंनी गमावला आहे असा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाटांनी लगावलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Allu Arju Arrest : हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी त्याच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान ही घटना घडली....रेवती नावाच्या 39 वर्षीय महिलेचा श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाला आणि तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध ५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला चिकडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'अबू सालेमला शिक्षेत कोणतीही सवलत मिळणार नाही'

     

    Abu Salem : अबू सालेमला शिक्षेत कोणतीही सवलत मिळणार नाही.. त्याला 25 वर्ष शिक्षा भोगावीच लागेल असं विशेष टाडा कोर्टानं म्हटलंय.. सरकारकडून शिक्षेत मिळत असलेली सवलत धरल्यास आपण शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे आपल्याला सोडण्याची तारीख कळवण्यात यावी, असा अर्ज सालेमनं कोर्टात केला होता.. मात्र सालेमने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे त्यामुळे त्याला शिक्षेत सवलत मिळणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. 

  • जळगावात FDAची मोठी कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalgaon FDA Raid : ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त ‍जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलीये.. मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर छापा मारुन तब्बल 2 हजार 792 किलो वजनाचा  मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा साठा जप्त करण्यात आलाय. याची किंमत 3 लाख 31 हजारांच्या घरात आहे.. या अन्न पदार्थांवर पॅकिंगची तारखी तसंच बिलाचा कोणताही उल्लेख नाहीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेनेत मंत्रिपपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena Formula : शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेचे 57 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्याही अधिक आहे. गेल्या वेळी मंत्रिपद न मिळालेले यंदा तरी मंत्रिपद मिळेल, यासाठी आशादायी आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेनं नवा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. अडीच वर्षानंतर दुस-या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे. सर्वाधिक आमदारांना संधी देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेना UBT खासदार संजय राऊतांचा मोठा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : शरद पवारांचे 5 खासदार फोडा, त्यानंतरच केंद्रात मंत्रिपद मिळेल, असं भाजपनं अजित पवार, प्रफुल्ल पटेलांना सांगितलं, असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय. शरद पवारांनी मोठ्या कष्टानं वयाच्या 84 व्या वर्षी खासदार निवडून आणलेत आणि ते खासदार फोडले जातायेत, असा आरोप संजय राऊतांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • धुळ्यात टोपण गिळल्यानं चिमुरडीचा मृत्यू

     

    Dhule Girl Death : धुळ्यात पेनचं टोपण गिळल्यानं पहिलीत शिकणा-या चिमुरडीचा मृत्यू झालाय. निमखेडीच्या जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. चिमुकली आपल्या आजोबाकडं शिक्षणासाठी आली होती. शाळा सुरू असताना तिच्या श्वासनलिकेत पेनंच टोपण अडकलं. शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

  • बीएमसीनं खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू

     

    Mumbai Chembur Death : मुंबई महानगरपालिकेनं खोदलेल्या खड्ड्यानं एका व्यक्तीचा बळी घेतलाय.. चेंबूरच्या टिळकनगर भागात ही दुर्घटना घडलीये.. मलनिस:रण वाहिनीसाठी या भागात 25 फूट खोल खड्डा खोदला होता.. मात्र कंत्राटदारानं या खड्ड्या भोवती कोणत्याही प्रकारचं सुरक्षा कुंपण लावण्यात आलं नव्हतं.. राजू दवंडे हे या खड्ड्याच्या बाजूनं जात असताना पाय घसरून ते खड्ड्यात पडले.. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं..याबाबत टिळक नगर पोलिसांनी घटनेची नोंद करून झेड कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केलाय..

  • नव्या वर्षात मुंबईकरांना कोस्टल रोडची भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Coastal Road : नव्या वर्षात मुंबईकरांना कोस्टल रोडची भेट मिळणार आहे.. कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण झालंय.. या मार्गाचा शेवटचा टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे..  त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • साताऱ्यातील भोंदूबाबाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

     

    Satara Bhondu Baba : साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बुद्रूक गावातील वृद्ध महिलेला फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केला आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे असं भोंदूबाबाचं नाव आहे. भोंदूबाबानं व्दारकाबाईच्या घरावर आणि संपत्तीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्रे तयार केली होती.वृद्ध महिलेच्या मयत झाल्यानंतर, भोंदूबाबाने तिच्या नातेवाईकांना सांगितले की, तोच तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर आहे. यावर संशय घेत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केल्यानंत भोंदू बाबानं महिलेची फसवणूक केल्याचं उघड झालं. त्यानंतर भोंदू बाबाला अटक करण्यात आलीय. 

  • दिल्लीतील 4 शाळांमध्ये बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

     

    Delhi School Threat : दिल्लीतील 4 शाळांमध्ये बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूलसह आणखी एका शाळेला धमकीचा मेल आलाय. धमकीचा मेल येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय. पोलीस घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मात्र, संशयित काहीही आढळून आलं नसल्याची माहिती मिळतेय. आज आणि उद्या पालकांच्या बैठकीला लक्ष्य करण्यात येणार असल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आलाय.

  • मुंबईत आजपासून वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम

     

    World Hindu Economic Forum : आजपासून मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम 2024चं आयोजन करण्यात आलंय.. 15 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या परीषदेचं उद्घाटन करण्यात येणार असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या परिषदेत संबोधित करतील.. तर उद्या योगी आदित्यनाथ, भूपेंद्र पटेल, पीयूष गोयल हे या परिषदेला उपस्थीत राहतील.. 

  • येरवडा जेलमधून कैदी फरार

     

    Pune : पुण्यातील येरवडा जेलमधून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झालाय. अनिल मेघदास पटोनिया असं कैद्याचं नाव आहे. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र कैद्याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याला खुल्या कारागृहात करण्यात आली होती. याचाच फायदा घेत अनिल पटोनिया हा कैदी जेलमधून पळाला.

  • मराठा समाजाकडून बीड बंदची हाक

     

    Beed Close : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येनंतर बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलंय. अगोदरही केज आणि मसाजोग या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाची चौकशी करून सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलं. तर 4 जण फरार आहेत. 

  • राज्यात थंडीचा कडाका कमी होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Temprature : राज्यात थंडीचा कडाका कमी होणार आहे... बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय.. त्यामुळे रविवारपासून पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.. या ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link