Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
'एक राज्य, एक गणवेश' योजनेत बदल, गणवेशांची जबाबदारी आता शाळांवर
One State, One Uniform : 'एक राज्य, एक गणवेश' योजनेत बदल करण्यात आलाय. आता विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी पुर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आलीय. माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची ही महत्वाकांक्षी योजना फसल्यानं आता यात बदल करण्यात आलेत. आधी शासन महिला बचत गटाकडून कपडे शिवून घेऊन विद्यार्थ्यांना पुरवायचं. मात्र शाळा सुरु होऊन सहा सहा महिने विद्यार्थ्यांना गणवेश मिळायचा नाही. मात्र आता शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील. या निर्णयामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या ४५ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणाराय. तसंच त्यांना वेळेत युनिफॉर्म मिळणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
खातेवाटपाशिवायच अधिवेशन संपणार?
Maharashtra Politics : मंत्रिपदाची शपथ घेऊनही अद्याप खातेवाटप नाही...आजही खातेवाटप होणार नसल्याची सूत्रांची माहिती...खातेवाटपाशिवायच अधिवेशन संपण्याची शक्यता
'अधिवेशनात बिनखात्याचे मंत्री, सरकारचा नवा विक्रम', भास्कर जाधवांचा टोला
Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही खातेवाटपावरुन सरकारवर टीका केलीये.. 42 मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र अजूनही खातेपाटप झालेलं नाही.. त्यामुळे या सरकरच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आल्याचं भास्कर जाधव यावेळी म्हणाले..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भरत गोगावले पालकमंत्रिपदासाठी इच्छुक
Bharat Gogawale : आज खातेवाटप जाहीर होणार असं वाटतंय-.खातेवाटपाबाबत भरत गोगावलेंचं विधान...खातेवाटपाबाबत काल ठरवण्यात आलं-गोगावले...आज खातेवाटपाचा निर्णय जाहीर होईल-गोगावले
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नागपुरात जीवघेण्या हल्लात वडील-मुलाचा मृत्यू
Nagpur Crime : नागपुरात वडील आणि त्यांच्या तरुण मुलावर हल्ला करण्यात आला. या हल्लाय वडील मुलाचा मृत्यू झालाय. शहरातील रामटेक नगरमध्ये ही घटना घडलीय. विजय सावरकर यांचं या भागात फर्निचरचं दुकान आहे. जुन्या वादातून चार ते पाच हल्लेखोरांनी दुकानात घुसून मारहाण केली. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. विजय सावरकर आणि मयूर सावरकर या दोघांचाही मृत्यू झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
MPSC भरतीच्या वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ
MPSC Extends Age Limit By One Year : आता MPSCच्या उमेदवारांना आनंदाची बातमी... MPSCसाठी विविद पदांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा एक वर्षान वाढवण्यात आलीये.. शुक्रवारी राज्य सरकारनं याबाब निर्णय घेतला.. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय.. 26 फेब्रुवारी 2024पासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाटी 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं.. मराठा समाजाची आरक्षणाची प्रक्रिया सुरु असतानाच MPSCनं पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने या जाहिरातीमध्ये बदल केल्यानं या भरती प्रक्रियेला विलंब झाला होता.. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवार अर्ज करु शकत नव्हते या सर्वांना आता दिलासा मिळालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपदासाठी का डावलले? असा सवाल मुनगंटीवारांच्या समर्थकांनी विचारलाय. त्यांनी नागपूर शहरातील सीताबर्डी भागात बॅनरबाजी केलीय. सलग सातव्यांदा आमदार असतानादेखील मंत्री म्हणून का डावललं? असा सवाल मुनगंटीवारांच्या समर्थकांनी केलाय.
मुंबईतील बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाची समिती स्थापन
Mumbai Boat Accident Case : बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाची समिती स्थापन...मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाने एका समितीची केली स्थापना...नौदलाच्या स्पीडबोटीनं धडक दिल्यानं एलिफंटाकडं जाणारी नीलकमल बोट समुद्रात बुडाली होती.... या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू...या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नौदलाची समिती स्थापन...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
सोलापुरात 3 दिवसांपासून 40 हजार क्विंटल कांदा पडून
Solapur Onion : सोलापुरात 3 दिवसांपासन तब्बल 40 हजार क्विंटल कांदा पडून आहे.. आज आणि उद्या कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.. अमित शाहांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे माथाडी कामगारांनी कांदा उचलण्यास विरोध केला होता.. त्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाहीये... उद्या बाजार समितीला साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे शुक्रवारपासून कांदा बाजार समितीमध्ये पडून आहे.. यामुळे शेतक-यांची चिंता वाढलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा?
Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्विकास निविदेविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीय. कंत्राट देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी नाही, अशा शब्दांत हायकोर्टानं याचिकाकर्त्याला सुनावलंय. राज्य सरकारच्या निर्णयाला सेकलिंक टॅक्नॉलॉजी या कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. एका ठराविक खासगी कंपनीलाच निविदा मिळावी, अशा पद्धतीने निविदेमध्ये अटी आणि शर्ती होत्या. तीन जणांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ अदानी समुहालाच निविदा मिळाली, असे सेकलिंकनं म्हटलं होतं. याचिकाकर्त्यांचा हा आरोप न्यायालयानं फेटाळून लावला.
संजय राऊतांच्या घराची रेकी झालीच नाही
Sanjay Raut : संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्या भांडुप पूर्वेकडील घराची शुक्रवारी सकाळी दोन अनोळखी तरुणांनी रेकी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलिसांच्या तपासात रेकी नाही तर ते तरुण मोबाईल नेटवर्कचे टेस्ट ड्रायव्ह करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. याबाबत मुंबई पोलिसांकडून प्रसिध्दी पत्रक जाहीर केलं आहे. घराचे रेकी करणारे कोणी गुंड नसून ते एका खासगी कंपनीचे कर्मचारी होते सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे ते चार कर्मचारी होते.. ईरिक्सन कंपनीकडून मोबाईल नेटवर्कचं टेस्ट ड्रायव्ह करत असल्याचे पोलीस चौकशी दरम्यान निष्पन्न झालंय.. पोलिसांनी तशी संबधीत कंपनीकडून खात्री सुद्धा केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मुख्यमंत्र्यांचं महायुतीच्या नेत्यांसाठी चहापान
CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांचं महायुतीच्या नेत्यांसाठी चहापान...रामगिरी निवासस्थानी थोड्याच वेळात चहापान..चहापानानंतर उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देणार...मुख्यमंत्र्यांचं महायुतीच्या नेत्यांसाठी चहापान
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शरद पवार आज बीड, परभणी दौऱ्यावर
Sharad Pawar : शरद पवार आज बीड, परभणी दौ-यावर आहेत. मस्साजोगमध्ये जाऊन मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेणारेत. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत. परभणी हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. तर विजय वाकोडे यांचंही निधन झालं होतं. त्यांच्याही कुटुंबीयांची पवार घेणारेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-