Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 24 Dec 2024-8:04 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल जाहीर

     

    ICC Champions Trophy Schedule : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं शेड्युल जाहीर झालंय. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा रंगणार आहे.. 23 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच ही दुबईत रंगणार आहे.  ग्रुप एमध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश या टीमचा समावेश आहे तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या टीमचा समावेश आहे.  टीम इंडियानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानं टीम इंडियाच्या सर्व मॅचेस या दुबईत खेळवल्या जाणार आहेत.  9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल मुकाबला रंगणार आहे.

  • अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंना सवाल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anjali Damaniya On Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला आहे. सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करायला तुम्हाला कार्यकर्ते लागतात का असा सवाल त्यांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कैलास फडवर परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

     

    Beed Firing : हवेत गोळीबार करुन व्हिडिओ काढणं एकाला चांगलंच भोवलंय.. परळीच्या कनेरवाडी येथील कैलास फड याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता. त्यानंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल केलाय.. कैलास फड हा धनंजय मुंडेंचा सहकारी असल्याची माहिती आहे...

  • चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chitra Wagh On Supriya Sule : बीड, परभणीमधल्या घटनांवरुन भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खासदारु सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. महायुतीचं सरकार गुन्हेगारांना माफी देत नाही, मात्र तुमच्या  वेळी सर्रास गुन्हेगारांना पाठीशी घातलं जायचं असा टोला चित्रा वाघ यांनी ट्विट करुन लगावलाय. गोवारी हत्याकांड, मुंबईतील ब्लास्ट ही त्याचीच उदाहरणं आहेत. यादी करायची झाली तर ती वाढतच जाईल, असा इशाराही वाघ यांनी दिला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  •  तंबाखू दिला नाही म्हणून टोळक्यानं कोयत्यानं हल्ला

     

    Nashik Marhan : तंबाखू दिला नाही म्हणून टोळक्यानं कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या हेडगेवार चौकात घडली. या टोळक्याजवळून पेंटर सौरभ वर्मा आणि सहकारी जात होते. त्यावेळी टोळक्यानं त्यांच्याकडे तंबाखू मागितला. मात्र तो दिला नाही म्हणून टोळक्याकडून या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्यातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तर अंबड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, इतर संशयित आरोपी फरार आहेत. 

  • नाणारबाबत स्थानिकांची भूमिका महत्त्वाची - उदय सामंत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uday Samant On Nanar : नाणार प्रकल्पाबाबत गैरसमज दूर झाल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं, तर सरकार त्या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसंच 90 टक्के स्थानिकांनी प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा असं मत मांडलं तर ती भमिकाही आपण मुख्यमंत्री फडणवीस आणि खासदार नारायण राणेंसमोर मांडू असं उदय सामंत म्हणाले. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही - फडणवीस

     

    Devendra Fadanvis On Beed Guridan Minister : बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर बीडचं पालकमंत्रिपद कोणी घ्यायचं हे महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बसून ठरवू, असंही त्यांनी सांगितलंय..

  • NDAच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    NDA Meeting Tomorrow : NDAच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक...उद्या जे पी नड्डांच्या निवासस्थानी बैठक...आंबेडकर वादासह विविध विषयावंर चर्चा...NDA घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय राखण्यास चर्चा

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • नवी मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या 10 बांगलादेशींवर कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bangladeshi Arrest In Navi Mumbai : नवी मुंबईत अवैधरित्या राहणा-या 10 बांगलादेशींवर कारवाई ...कोपरा गावात बांगलादेशी घुसखोरांचं बेकायदेशीर वास्तव्य ..२०२३पासून वैध कागदपत्रांशिवाय नवी मुंबईत सेक्टर-10 मध्ये वास्तव्य ..दोन पुरुष आणि आठ महिलांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई ..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर- संजय राऊत

     

    Sanjay Raut on CM Fadanvis : महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर-राऊत...बीड घटनेचे संशयित आरोपी मंत्रिमंडळात-राऊत... परभणीची घटना राज्याला काळीमा फासणारी-राऊत... राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागला-संजय राऊत... फडणवीस परभणीत जायला पाहिजे होते-राऊत....गृहमंत्री म्हणून तुम्ही गेलात का?-संजय राऊत...फडणवीस परभणीला जायला घाबरतात-राऊत.. परभणीला गेले तर सोबत सैनिक घेऊन जातील-राऊत

  • राज्यात 27 ते 28 डिसेंबरदरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert :  27 ते 28 डिसेंबरदरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय. त्यामुळे शेतक-यांनी हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून शेतीचं नियोजन करावं.. तसंच अवकाळी पावसामुळे पिकांचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून देण्यात आलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना धमकी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tanaji Sawat Nephews Threatened : 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'...तानाजी सावंतांच्या दोन पुतण्यांना धमकी...अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी...ढोकी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'काय होतास तू आणि काय झालास तू?', सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suresh Dhas on Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडे अगोदर असे नव्हते. काय होतास तू आणि काय झालास तू ?... अशा शब्दांत धस यांनी मुंडेंवर हल्लाबोल केलाय. परळीतल्या लोकांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा कसा भरला? असा सवाल त्यांनी विचारलाय. याला तत्कालीन कृषीमंत्री जबाबदार आहेत. मात्र, त्या कृषीमंत्र्यांचं नाव अठवत नसल्याचं ते म्हणाले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • इक्बाल कासकर​चा फ्लॅट ईडीच्या ताब्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा फ्लॅट ईडीच्या ताब्यात... ठाण्यातील फ्लॅट ईडीच्या ताब्यात...मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्त केला होता फ्लॅट... कासकरवर खंडणीतून फ्लॅट मिळवल्याचा आरोप

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • बंगले, दालनावरून महायुतीत नाराजी-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahayuti : बंगले, दालनावरून महायुतीत नाराजी-सूत्र.. वास्तूप्रमाणे दालन मिळालं नसल्यानं मंत्री नाराज?... अनेक बंगले अशुभ असल्यची तक्रार-सूत्र...अनेक बंगले बदलण्याची शक्यता

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उल्हासनगरमध्ये हिट अँड रन, मद्यधुंद कारचालकाने 3 वाहनांना उडवलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhasnagar Hit and run : उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना...मद्यधुंद कारचालकाने 2 ते 3 वाहनांना उडवलं.. कारच्या धडकेत 9 जण जखमी.. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मध्ये पहाटे 5 वाजताच्या सुमारास अपघात...कारची 2 दुचाकी आणि एक रिक्षाला धडक... जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

     

  • राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता

     

    Rain Alert : राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला पावसाची शक्यता..पुणे वेधशाळेचा वर्तवला पावसाचा अंदाज...उ. महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता...मुंबईतल्या वातावरणातही होणार बदल

  • मराठवाड्यात ओला दुष्काळ?

     

    Marathwada : मराठवाड्यात ओला दुष्काळ असल्याची माहिती समोर येतीये.. यावर्षी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं... या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.. मराठवाड्यातील 8 हजार 486 गावांपैकी 6 हजार 150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी आलीये.. तर 2 हजार 336 गावांची पैसेवारी 50पैशांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलंय. यात परभणी,नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश आहे.. अतिवृष्टीनंतर पंचनामे करुन शासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर केलाय.. त्यानंतर शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी नुकसानीपोटी 2 हजार 726 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.. अंतिम पैसेवारी 50 पैशांहून कमी असलेल्या गावांमधील शेतक-यांचा शेतसारा तसंच विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे.. तसंच वीज बीलातही 33 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे.  

  • पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच

     

    Pune Koyta Gang : पुण्यात कोयता  गँगचां धुमाकूळ सुरुच आहे.. पुण्यातील लोहगावमध्ये साठी वस्तीत दोन तरुणांनी अनेक वाहनं आणि दुकानांची तोडफोड केलीये... कोयते दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. या दोघांची दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीत.. या टोळक्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीये. दरम्यान पोलीस या दोन्ही तरुणांचा शोध घेत आहेत.. 

  • रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती

     

    Railway Recruitment : रेल्वे भरती बोर्डाची पुन्हा एकदा मोठी भरती..32 हजार 438 जागांसाठी ही भरती असणारेय...23 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार...22 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

  • मनोज जरांगेंचा आजपासून गाठीभेटी दौरा
     

    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर जाऊन गाठी भेटी घेणार आहेत. दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज ते पाथरी, पोखर्णी, शिंगणापूर फाटा मार्गे दामपुरी इथे मुक्कामी असणारेत. तर उद्या दामपुरी वरून पूर्णा तालुक्यातील आलेगाव इथे येणार आहेत, त्यानंतर परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेणार आहेत, त्यानंतर मनोज जरांगे पाटील साळेगाव वरून बीड जिल्ह्यतील मस्साजोग इथे जाणार. पुढे नागझरी वरून अंतरवालीत येणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 3 दिवस हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट रात्रभर सुरु राहणार
     

    The bar will be open all night on the 31st : नाताळसह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आज उद्या आणि 31 डिसेंबरला हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स रात्रभर सुरु राहणार आहेत.. पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स सुरु ठेवण्यास गृहविभागानं परवानगी दिलीये.. या तीन दिवशी वाईनशॉप मध्यरात्री 1वाजेपर्यंत सुरु असतील तर परमीट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बीअरबार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.. खुल्या जागेत होणा-या संगीत कार्यक्रमांसाठीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलीये. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link