Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर
Latest Updates
कल्याणमध्ये अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार
Kalyan Crime : कल्याणच्या आंबिवली परिसरात अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय..भोंदू बाबा अरविंद जाधव याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय...
'महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार',नितेश राणेंचं विधान
Nitesh Rane : 'महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार'...नितेश राणेंचं विधान... 'मुख्यमंत्र्यांनी गोहत्या बंदी कायदा कडक करावा'...मंत्री नितेश राणेंची मागणी...मी आमदार, मंत्री नंतर आधी हिंदू आहे...नितेश राणेंचं विधान
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यात रेल्वे उडवून देण्याचा कट
Pune : पुण्यात रेल्वे उडवून देण्याचा कट रचन्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आलाय..मात्र, लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.. रविवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय.. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.
बीड शस्त्र परवानाप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर
Navneet Kanwat on Beed : बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर....गरज नसतील त्यांचे शस्त्र परवाने रद्द होणार...शस्त्रपरवान्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु...मराठवाड्यात सर्वात जास्त बीडमध्ये शस्त्रपरवाने...परवानाधारक शस्त्रांचा वापर दहशतीसाठी होत असल्याचा आरोप
आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद- सुरेश धस
Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मीक कराडसह धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय... पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीनं सुरु ठेवण्याची मागणी सुरेश धसांनी केलीये.. संतोष देशमुख हत्येप्रकरणात आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद सुरु असल्याचा दावा धसांनी केलाय.. तर या हत्येप्रकरणात आकाचा आका नसावा, असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केलाय..
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीची चौकशी सुरू- धनंजय देशमुख
Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग...धनंजय देशमुखांनी घेतली सीआयडी अधिका-यांची भेट... वाल्मिक कराडच्या दुस-या पत्नीची चौकशी सुरू...धनंजय देशमुख यांची माहिती... ज्योती जाधव यांची चौकशी सुरू असल्याची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
थर्टी फर्स्टनिमित्त मुंबई समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यासाठी जादा बसेस सोडणार
Mumbai BEST Bus : नववर्ष स्वागतासाठी बेस्टच्या २५ अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहे...मुंबईतील समुद्रकिना-यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे...31 डिसेंबरला बेस्टकडून २५ अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नागपुरात 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त
Nagpur Drugs Seized : नागपुरात 50लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केलीये.. या प्रकरणी पोलिसांनी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक केलीये.. त्यांच्याकडून 550 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलंय... नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 डिसेंबरला सप्तश्रृंगीचं मंदिर रात्रभर खुलं राहणार
Vani Saptashrungi Devi Temple : नाशिकच्या वणीतील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणारेय. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. वर्षाखेर भाविकांना रात्रभर देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणारेय. नेमका याच दिवशी मंगळवार असल्यानं अधिक गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याठिकाणी अधिक दक्षता घेण्यात आलीये. यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ताही पूर्णपणे खुला ठेवण्यात येणारेय.
पुण्यात थर्टीफर्स्ट पार्टीसाठी पहाटे 5पर्यंत परवानगी
Pune : थर्टीफस्टच्या पार्टीसाठी पुण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बार सुरू राहणारेत. मात्र एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय मद्यविक्रीचीही दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणारेय. दरम्यान अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात 21 पथकं सज्ज झालीयेत. जिल्ह्याच्या सीमेवर विशेष पथकं तैनात करण्यात आलीये. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झालेत.
नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही- अतुल लोंढे
Atul Londhe on Nitesh Rane : नितेश राणेंवर काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी टीका केलीय.. काँग्रेसच्या बाजूनं मतदान करणा-यांना नितेश राणे दहशतवादी म्हणात असा पलटवार लोंढेंनी केलाय.. नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचं लोंढे म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
वर्ध्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
Wardha Dog Attack : वर्ध्याच्या देवळी गावात पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातलाय.. या कुत्र्यानं 17 मजुरांसह अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. कुत्र्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकावर ग्रामीण जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही हा कुत्रा मोकाट असल्यानं लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे..
अंजली दमानियांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
Beed Anjali Damania : अंजली दमानियाच्या धरणं आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानिया यांचं आंदोलन सुरू आहे.. . जोपर्यंत वाल्मीक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिलाय.. धनंजय मुंडे यांचा राजीनामाही तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्या यावेळी म्हणाल्यात..जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचे फोटोज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले असून या अनुषंगाने पुढील तीस दिवसात कारवाई करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं दमानिया यांनी सांगितले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कंत्राटी बेस्ट बसच्या वेगावर लवकरच नियंत्रण
Mumbai Best Bus Speed : मुंबईच्या कंत्राटी बेस्ट बेसच्या वेगावर लवकरच नियंत्रण येणारेय. बसची ताशी 50 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आलीये. तसंच वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदारांना बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचनाही दिल्या जाणारे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्ट उपक्रमाकडून अपघात रोखण्यासाठी विविध उपाय सुचविले जातायेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नागपुरात मामानेच केली दोन भाच्यांची हत्या
Nagpur Crime : परस्पर वादातून मामानेच दोन भाच्यांचा खून केलाय. गांधीबाग परिसरातील काली माता मंदिरासमोर ही घटना घडली. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या झाली. रवी राठोड आणि दीपक राठोड या दोघं सख्ख्या भावांचं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मामासोबत वाद सुरु होता.. या वादातून आरोपनं दोघांवर चाकूनं हल्ला केला... दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला..
केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान - नितेश राणे
Nitesh Rane On Rahul Gandhi : मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे. दहशतवादीच राहुल गांधी यांना मतदान करतात, असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय.
सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार
Nashik : नाशिकच्या वणीतील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणारेय. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. वर्षाखेर भाविकांना रात्रभर देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणारेय. नेमका याच दिवशी मंगळवार असल्यानं अधिक गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याठिकाणी अधिक दक्षता घेण्यात आलीये. यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ताही पूर्णपणे खुला ठेवण्यात येणारेय.
अंजली दमानियांच्या धरणं आंदोलनाचा दुसरा दिवस
Beed Anjali Damania : अंजली दमानियाच्या धरणं आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानिया यांचं आंदोलन सुरू आहे.. . जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय... तर दुसरीकडे सीआयडीला तपासात दोन मोबाईल सापडल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिलीय.. एका बड्या नेत्याचा फोनही आल्याचा दावा त्यांनी केलाय..
पुण्यात थर्टीफस्ट पार्टीसाठी पहाटे 5पर्यंत परवानगी
Pune 31st December Party : थर्टीफस्टच्या पार्टीसाठी पुण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बार सुरू राहणारेत. मात्र एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय मद्यविक्रीचीही दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणारेय. दरम्यान अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात 21 पथकं सज्ज झालीयेत. जिल्ह्याच्या सीमेवर विशेष पथकं तैनात करण्यात आलीये. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान
Unseasonal Rain Impact : राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय... जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे दोन हजार सहाशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय.. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता पुणे कृषी विभागाने व्यक्त केली आहे....अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या केळींच्या बागा असलेल्या भागाला बसला. वादळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ झालीये. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
जळगाव MIDCमध्ये चटई बनवणाऱ्या कंपनीत आग
Jalgaon Fire : जळगाव शहरातील MIDCमध्ये भीषण आग लागली.. प्लास्टिक पासून चटई बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही आग लागली.. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक असल्यामुळे आग वेगानं परसली.. सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये ही आग लागली.. रात्री 12च्या सुमारास सुरक्षारक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली आणि काही क्षणात आगीनं संपूर्ण कंपनीला विळख्यात घेतलं.. या आगीदरम्यान स्फोट झाल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सारंगखेडा घोडे बजाराने मोडला 4 वर्षांचा विक्रम
Nandurbar Horse Trade : सारंगखेडा घोडेबाजारानं यंदा गेल्या 4 वर्षांचा विक्रम मोडलाय.. या वर्षी घोडे बाजारात विक्रीसाठी २२०० घोडे दाखल झाले होते. त्यापैकी ९०० घोड्यांची विक्री झाली आहे यातून ४ कोटीची उलाढाल झाली आहे. अजून तीन ते चार दिवस घोडे बाजार सुरु राहणार असल्याने, हा आकडा ५ कोटी पर्यंत पोहचण्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा
Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन मिळणारये. अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देता यावं, यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्य़ात आलं होतं. या बैठकीत मानधनाची रक्कम केंद्रीय साहाय्यांकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास आता अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
प्रवीण दरेकरांचा अंजली दमानियांना टोला
Pravin Darekar On Anjali Damania : अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी उगाच हवेत बोलू नये असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आशी माहितीही त्यांनी यावेळी दिली..
कल्याणमध्ये कुटुंबावर जीवघेणा हल्ला
Kalyan Attack : कल्याणच्या चिकणघरमध्ये एका कुटुंबावर त्यांच्याच शेजा-यानं जीवघेणा हल्ला केलाय.. क्षुल्लक करारणावरुन त्यानं हा हल्ला केलाय.. आरोपीनं आधी रॉकेल टाकून या कुटुंबाचं घर जाळण्याचा प्रयत्न केला.. त्यानंतर चौघांवर कु-हडीनं वार केले..यात चौघे गंभीर जखमी असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.. रात्री हे चौघे घराबाहेर गप्पा मारत होते.. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला.. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीये. तर जखमींना रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून यातील दोघांना सायन रुग्णालयात पाठवण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -