Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 02 Jan 2025-10:35 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • कराडची चौकशी ऑन कॅमेराच झाली पाहिजे- अंजली दमानिया

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anjali Damania on Walmik Karad : वाल्मिक कराड याची सगळी चौकशी ही कुठल्याही परिस्थितीत ‘On Camera’ झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे...त्याच्या खोलीत देखील CCTV असला पाहिजे...कारण खूप खोटं बोललं जात आहे. पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग आले हे कुणालाच पटणारं नाही 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • SITअहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईल- विखे पाटील

     

    Radhakrishna Vikhe Patil on Dhananjay Munde : 'SITअहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल'...जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती... बीड प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी...अहवालानंतर राजीनाम्याबद्दल निर्णय होईल-विखे पाटील

  • मुख्यमंत्री फडणवीसांची बडेजावपणाला बंदी, दौऱ्यात पोलीस मानवंदनेलाही मनाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : प्रशासनची सूत्रं हाती घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बडेजावपणाला बंदी...आपल्या दौ-यात यापुढे स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणायचे नाही...तसंच दौ-‍याच्या वेळी पोलीस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा आपल्या दौ-‍यात बंद ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MPSC Exam : एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर...पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध...महाराष्ट्र गट ब ची परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार...महाराष्ट्र गट क ची परीक्षा 4 मे ला होणार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित...स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धी पत्र जारी..पकडून देणाऱ्याला दिलं जाणार योग्य बक्षीस..सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वांटेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर... या आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिले जाईल व नाव गोपनीय ठेवले जाईल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार?- विजय वडेट्टीवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojan : महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत, त्यामुळे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. त्यावर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी प्रत्यूत्तर दिलंय.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'लाडकी बहीण लाभार्थींची छननी होणार', मंत्री आदिती तटकरेंची माहिती

     

    Ladki Bahin Yojana : निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.. अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेनी दिलीये..लाडकी बहीण योजनेच्या मूळ निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय...
     

  • चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री?

     

    Nagpur Nitin Gadkari : पालकमंत्रिपदाबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी अनावधानाने बावनकुळेंचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला मात्र लगेच त्यांनी पालकमंत्री म्हणून अद्याप घोषणा झाली नाही, हे स्पष्ट केलं तसंच पालकमंत्री बावनकुळेच होणार, असंही गडकरींनी सांगितलं. काही ठिकाणी पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच होतेय. त्यात नागपूरच्या पालकमंत्रिपदाविषयी खुद्द गडकरींनीच माहिती दिलीय.

  • शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भिंतीला भगदाड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dadar Shivaji Park : शिवाजी पार्क मैदानातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय.या शिल्पाच्या तळाकडच्या भिंतीच्या लाद्या उखडल्यात.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हत्याकांडाचा खटला बीडबाहेर चालवा - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Sanjay Raut : बीड, परभणी मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे असं म्हणत हा खटला  बीड बाहेर चालवावा अशी मागणी राऊतांनी केलीय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar On Walmik Karad : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे.  बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आहे. मात्र पुरावे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. काहीही होऊ शकतं, याची माहिती आपल्याला उच्चपदस्थांनी दिलीय, असंही वडेट्टीवारांनी सांगितलं...  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रुग्णालयात उंदारांचा धुमाकूळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhandara Rat : सर्वसामान्य जनतेला उपचार आणि आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्र असलेल्या मुख्यालयातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या उंदरांचा कहर सुरू आहे.जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत आहे.त्यांच्या डब्यातील व पिशव्यातील खाद्यपदार्थांचा उंदीर फडसा पाडतानांचा विडीओ व्हायरल झालाय.. रुग्णांच्या आरोग्याची खेळ सूर असल्याचं समोर आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prime Minitster Narendra Modi On Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय.. गडचिरोलीमध्ये केलेल्या कामांवरुन पंतप्रधानांनी फडणवीसांचं कौतुक केलंय... राज्य सरकारकडून दुर्गम भागात सुरु असलेल्या विकास कामांची त्यांनी प्रशंसा केलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • चंद्रपुरात भरधाव ट्रकनं आजी-आजोबा आणि नातवाला चिरडलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrapur Accident : चंद्रपुरात एका भरधाव ट्रकनं आजी-आजोबा आणि नातवाला चिरडलंय.. भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेवर ही दुर्घटना घडलीये.. हॉटेलमधून जेवण आटोपून हे तिघे मोटारसायकलनं घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली.. हे तिघेही वणी तालुक्यातील रासाघोणसा गावातील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलंय. दरम्यान या दुर्घटनेनंतर भद्रावती शहरात हळहळ व्यक्त केली जातीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुदर्शन घुलेच्या तपासासाठी 7 पथकं रवाना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sudarshan Ghule : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत.. या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे.. तसेच एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे.. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का या संदर्भात सीआयडीला संशय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे... फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आठवडाभरानंतर निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Niphad Cold : आठवडाभरानंतर नाशिकच्या निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट आलीये. निफाडचा पारा 11 अंशावर गेलाय.. तापमानात होत असलेल्या या चढ उताराचा फटका इथल्या द्रक्षबागांना बसू लागलाय. रात्रीच्या थंडीमुळे  द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागलेत.. तसंच दिवसा पडणा-या कडक उन्हामुळे द्राक्षमणी बर्न होण्याची भीती निर्माण  झालीये.. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • RTE प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ देण्यात आलीये.. 18 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत RTE प्रक्रियेच्या शाळानोंदणीची मुदत दिली होती.. मात्र अपेक्षित नोंदणी न झाल्यानं ही मुदत आता 4 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलीये. त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रीया पूर्ण करता येणार आहे... त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु होईल.. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रात्री 1 पासून तुळजाभवानीचं दर्शन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tuljapur : तुळजाभवानीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी... मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे आठवड्यातील तीन दिवस तसंच पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीचं मंदिर मध्यरात्री 1 वाजता खुलं होणार आहे.. दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय.. वर्षभर हा नवा बदल लागू असणार आहे.. मंदिर संस्थानाकडून याबाबत पत्रकही काढण्यात आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जळगावच्या पाळधी गावात संचारबंदी वाढवली

     

    Jalgaon Cerfew : जळगावच्या पाळधीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दोन गटात झालेल्या राड्या नंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली होती. त्यानुसार ही संचारबंदी आज सकाळी आठ वाजेपर्यंत होती मात्र प्रशासनं ही संचारबंदी पुन्हा वाढवली असून आज रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे असे  आदेश काढण्यात आलेत. पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे.

  • वसई-विरारकडे भाजपचं लक्ष

     

    BJP Focus On Vasai-Virar :  विधानसभेतील जोरदार विजयानंतर आता भाजपनं वसई-विराकडेही आपलं लक्ष केंद्रित केलंय.. वसईतील बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं बविआचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. यात 50हून अधिक माजी नगरसेवकांचाही समावेस आहे.. हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. 

  • अमेरिका दहशतवादी हल्ल्यानं हादरली

     

    USA Terror Attack : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झालाय.. हल्लेखोराने न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर गर्दीत ट्रक घुसवला त्यानंतर वाहनातून बाहेर पडून गर्दीवर गोळीबार केला.. या हल्ल्यात 15 नागरिकांचा मृत्यू झालाय..या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. 

  • नराधमाला आज कोर्टात हजर करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kalyan Crime : कल्याण कोळशेवाडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्ये प्रकरणी आज नराधम विशाल गवळीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणारेय.. सर्व पुरावे न्यायलयात सादर करणार असल्याची माहिती समोर आलीये. आरोपी विशाल गवळी याला घेऊन कल्याण पोलीस शेगावला रवाना झालेत.. आरोपीने हत्या केल्यानंतर तो नेमका कुठे राहिला होता,  त्याला कोणी मदत केली त्या ठिकाणचा पंचनामा आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी विशालला शेगावला घेऊन गेल्याची माहीती मिळालीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतकऱ्यांना DAPखतावर विशेष अनुदान मिळणार

     

    DAP Subsidy : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी.. आजपासून शेतक-यांना DAP खतावर विशेष अनुदान मिळणार आहे..  त्यामुळे शेतक-यांना 50 किलो DAPखताची गोणी 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे.. अनुदानाअभावी हे खत शेतक-यांना तीन ते साडेतीन हजार रुपयांना विकत घ्यावे लागत  होते.. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता परवडणा-या दरात हे खत शेतक-यांना मिळणार आहे.. या अनुदानासाठी केंद्र सरकार ३ हजार ८५० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link