Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 03 Jan 2025-7:24 pm,

LIVE Updates on January 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • बच्चू कडू यांचा तडकाफडकी राजीनामा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu's Resignation : बच्चू कडू यांनी राजीनामा दिला आहे. दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिला आहे. दिव्यांग कल्याण अभियानासाठी सरकारकडून निधीबाबत उदासीन वागणूक दिली जात असल्यानं, आपण राजीनामा देत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं - बजरंग सोनावणे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bajrang Sonawane : बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवारांनी घ्यावं अशी मागणी, राष्ट्रवादी SPचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. अजित पवार पालकमंत्री झाले तर त्यांना बीडमध्ये काय सुरू आहे याची माहिती मिळेल असं बजरंग सोनावणे म्हणाले. तर अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यास जिल्हा सरळ करु शकतात अशी प्रतिक्रिया, भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादीने बीडचं पालकमंत्रिपद गेलं तर पालकमंत्री कोण करायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • उद्धव ठाकरेंची आढावा बैठक, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray's Meeting : उद्धव ठाकरेंनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतलीये.. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  उद्धव ठाकरेंनी ही बैठक घेतलीये..या बैठकीत उद्धव ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केलीये...तसेच उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत... मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील  वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा..तसेच महापालिका निवडणुकीत मतदारसंख्या वाढवणे आणि मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी उपविभाग प्रमुखांना बैठकीत केल्या आहेत.

     

  • घरात पोलिसांची गुप्तपणे पाळत - जितेंद्र आव्हाड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या घरात सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत घुसले गोपनीय पोलीस.. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल.. पत्रकार परिषद सुरू असताना आव्हाड भडकले. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा आव्हाडांचा संताप.. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना का घुसलात? आव्हाडांचा गोपनीय पोलिसांना सवाल.

     

  • राजन साळवी यांचे पक्ष बदलाचे संकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajan Salvi : योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असं विधान राजन साळवी यांनी केलंय.. माझ्या पराभवाला  वरिष्ठ कारणीभूत याचा शोध घेतला गेला पाहिजे असं विधान करत राजन साळवी यांनी दिले पक्ष बदलाचे संकेत.

     

  • नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पूर्ण करणार-फडणवीस

     

    Satara Devendra Fadanvis : नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पूर्ण करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. स्मारकासाठी 10 एकर जमिनीचं अधिग्रहण करा, अशा सूचना फडणवीसांनी जिल्हाधिका-यांना दिल्यात. 

  • राजकारण आणि खेळात कधी काय घडेल सांगू शकत नाही - गोगावले

     

    Bharat Gogawale On Devendra Fadanvis : सामनातल्या फडणवीसांच्या कौतुकाबाबत भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिलीय...राजकारण आणि खेळ या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही असं गोगावले म्हणालेत

  • भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे - लक्ष्मण हाके

     

    Laxman Hake On Chhagan Bhujbal : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी मागणी केलीय. आम्हाला जन्माने ओबीसी असलेले मंत्री नकोत तर ओबीसीसाठी काम करणारे मंत्री हवेत, असं हाकेंनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी भुजबळांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी हाकेंनी केलीय.

  • उत्तम जानकरांचे मोहित कंबोज यांच्यावर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uttam Jankar On Mohit Kamboj : राज्यातील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून झाला होता आता त्याचा थेट संबंध मोहित कंबोज यांच्याशी लावण्यात येतोय. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केलेत आहे.  मोहित कंबोज यांच्यावर राज्यातील ईव्हीएम मशीनची सगळी जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडल्याचं दावा जानकर यांनी केला. त्यामुळे जानकर यांनी आणखी एका नव्या विषयाला तोंड फोडलंय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कुठल्याही आरोपीला VIP ट्रीटमेंट देऊ नका - सुळे

     

    Pune Supriya Sule : वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रीटमेंटबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही व्यक्तीला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि परभणी, बीड घटनेत पारदर्शकपणे न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय

  • लातूरमध्ये 7 जानेवारीला चक्काजाम आंदोलन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Protest : मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जातोय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणारेय.... सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली त्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. हा चक्काजाम सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'विच्छा माझी पुरी करा'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. तुरूंगात असूनही त्याच्या मागण्या मात्र वाढत आहेत. स्लीप एपनिया आजार असल्याचा दावा वाल्मिकनं कोर्टात केलाय. त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी, एक मदतनीस द्यावा, अशी मागणी अर्जाद्वारे त्यानं न्यायालयाकडे केलीय. 

    बातमी पाहा - Walmik Karad ला गंभीर आजार! कोर्टाला म्हणाला, कोठडीत 'ही' मशीन द्या; 24 तास हेल्परही हवा

  • दरडग्रस्त तळीये गावात पाणीटंचाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Water : महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावात सात वाड्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावतेय. तळीये गावासाटी वरंध धरणातून पाणीपुरवठा केला जाणारेय. मात्र अद्यापही त्याचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे तळीये ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. दरम्यान शासनानं पाण्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबार

     

    Navi Mumbai Firing : नवी मुंबईच्या सानपाडा परिसरात गोळीबार झालाय. डीमार्ट जवळ हा गोळीबार झालाय. दोन जणांकडून पाच ते सहा राऊंड फायरिंग करण्यात आलीये. त्यानंतर दोघं जण बाईकवरून फरार झालेत. गोळीबारात एक जण जखमी झालाय. दरम्यान सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरूये.

  • जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले, 3 विद्यार्थी जखमी

     

    Gondia : गोंदियाच्या साईटोला गावात जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लास्टर मुलांवर कोसळल्याची घटना घडलीयं...  मुलांवर छताचे प्लास्टर कोसळल्याने 3 विद्यार्थी जखमी झालेत.... त्यामुळे जिल्हा परिषद या कडे लक्ष देत नाही , तो पर्यत  मुलांना शाळेत न पाठवण्याची  भूमिका पालकांनी घेतलीयं... 

  • 'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

     

    Saamana Editorial On Chief Minister Devendra Fadanvis : मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या स्वागतात आणि उत्सवात मग्न असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाचं नवं पर्व सुरू केल्याचं म्हटलंय.

  • धनंजय देशमुख यांचं पोलिसांना पत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Dhanajay Deshmukh : मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय... पोलीस ठाण्यातच अरेरावी करण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसंच वाल्मीक कराडला मिळत असलेल्या सुविधा  आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही केलाय. काही पोलीस अधिकारी बाहेरच्या लोकांना मदत करत असून एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी या पत्रातून केलीय....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 'श्री विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करा'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pandharpur : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केलीय. ही समिती गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहे. पंढरपुरात येणा-या वारक-यांना ही समिती सोई-सुविधा देत नाही, असा आरोप मराठा महासंघानं केलाय. समितीवर नव्या व्यक्तींना संधी देण्याची मागणीही या महासंघानं केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रायगडमध्ये शिवसेना UBT पक्षात मोठे फेरबदल

     

    Raigad Shivsena UBT : रायगड जिल्ह्यात शिवसेना UBT पक्षात मोठे फेरबदल करण्यात आलेत. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी नंदू शिर्के यांची निवड करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पदाधिकारी बदल प्रक्रियेला सुरूवात झालीय. श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी नंदू शिर्के यांना देण्यात आलीय. अनिल नवगणे यांच्या हकालपट्टी नंतर शिर्के यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागलीय. म्हसळ्यातले नंदू शिर्के यापूर्वी उपजिल्हाप्रमुख होते  आता त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून बढती मिळाली. 

  • मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai-Solapur Vande-Bharat Express : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केलीय. दगडफेकीत एक्स्प्रेसच्या सी-11 बोगीची काच फुटलीय.. सोलापूर जिल्ह्यातली जेऊर स्थानकाजवळ दगडफेक झालीय. सुदैवानं यात कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नाहीय.. मात्र मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसवरील दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे.

    बातमी पाहा - महाराष्ट्र UP-बिहारच्या मार्गावर? सोलापूरमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेक; कारण...

  • नाशिक शहर आणि परिसरात पुन्हा थंडीचं पुनरागमन

     

    Nashik Cold : नाशिक शहर आणि परिसरात गेल्या पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. मात्र नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीचं पुनरागमन झालं. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झाला.  आजपासून पुढील पाच ते सहा दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून गारवा निर्माण झालेला जाणवतोय..

  • देशात काँग्रेसचं 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान

     

    Congress Campaign : देशात आजपासून काँग्रेस 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान राबवणारेय. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात येणारेय, अशी माहिती काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिलीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ असलेल्या मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी या अभियानाचा समारोप होणारेय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link