Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 04 Jan 2025-9:17 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • नाशिक जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसांच्या बाळाची चोरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Child Theft : नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार.. रुग्णालयातून उत्तरप्रदेशातील महिलेचं बाळ पळवलं.. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञात  महिलेने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ.. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल..  बाळ पळवणारी महिला सीसीटीव्हीत चित्रित.. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्ह्याची तक्रार दाखल करणार.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Santosh Deshmukh Case : बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, हत्येप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी.. तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला पोलीस कोठडी.. केज न्यायालयानं आरोपींना सुनावली पोलीस कोठडी. आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी केलेली मागणी.

     

  • मुंबईत वांद्रा येथे ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत भीषण आग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Fire : मुंबईत वांद्रे परिसरात भीषण आग.. ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत आग.. 10 ते 15 झोपड्यांना भीषण आग.. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत वांद्रा येथे ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत भीषण आग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Fire : मुंबईत वांद्रे परिसरात भीषण आग.. ज्ञानेश्वरनगरमधील झोपडपट्टीत आग.. 10 ते 15 झोपड्यांना भीषण आग.. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • संतोष देशमुख हत्येतील आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या- सरकारी वकील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Santosh Deshmukh Case : बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, थोड्याच वेळात केज न्यायालयाकचडून निर्णय दिला जाईल. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • बीड बदनाम केलं, आता पुणे बदनाम करायचंय- जरांगे

     

    Manoj Jarange : 'बीड बदनाम केलं, आता पुणे बदनाम करायचंय'...मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल...बदनाम करण्यात मंत्र्यांचा हात-मनोज जरांगे...आरोपींना फरार करण्यात आले-मनोज जरांगे

  • उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा

     

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा व्यवस्था...उद्योगपतीकडून ठाकरेंना सुरक्षा व्यवस्था..पोलिसांसोबत खासगी सुरक्षा व्यवस्थाही तैनात... ठाकरे कुटुंबालाही खासगी सुरक्षा व्यवस्था

  • चौकशी ऑन कॅमेरा करावी- अंजली दमानिया

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anjali Damania on Santosh Deshmukh murder Case : दोन आरोपींना अटक झाली- दमानिया...सूत्रधार कोण समोर येणार- दमानिय...चौकशी ऑन कॅमेरा करावी अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया दिलीये

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, विशाल गवळीसह पत्नीला 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

     

    Kalyan : कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण.....मुख्य आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 18 तारखेपर्यंत दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. कल्याण सत्र न्यायालायने ही न्यायालयीन कोठडी सुनावलीय. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत सर्वं काही निष्पन्न झाल त्यामुळे न्यायालयान कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आलीय होती. 
     

  • 'वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता',आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sandeep Kshirsagar on  Santosh Deshmukh murder Case : वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता असा आऱोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय..वाल्मिकचं सीसीटीव्ही काढा- संदीप क्षीरसागर...वाल्मिक 28 डिसेंबरपर्यंत पुण्यात होता- संदीप क्षीरसागर...'हॉस्पिटलमध्ये कोण कोण भेटलं सीसीटीव्ही काढा'... पुण्यातील हॉस्पिटलमध्ये वाल्मिकला कोण कोण भेटलं त्याचं सीसीटीव्ही तपासण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलीय...धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा त्यांनी केलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका-  सुरेश धस 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suresh Dhas on Santosh Deshmukh Case : 'पकडलेले आरोपी प्यादे, मुख्य आरोपी आका'...आरोपींच्या अटकनेनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया...आरोपींना अटक केल्याने LCBचं अभिनंदन...आरोपींच्या अटकनेनंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pimpri Chinchwad : ऑनलाईन पिझ्झा मागवताना सावधान...पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा..पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील घटना..ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा'

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • भाजपचा पुन्हा एकदा बविआला धक्का

     

    Vasai : भाजपने पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसईतील अनेक पदाधिका-यांनी आज भाजपत प्रवेश केलाय. बविआचे तिन्ही आमदार पाडल्यानंतर आता वसई-विरार महापालिकेकडे भाजपचं विशेष लक्ष आहे.

  • महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम-सूत्र

     

    Maharashtra Politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम-सूत्र...पालकमंत्रिपदासाठी अद्यापही रस्सीखेच-सूत्र...नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेत स्पर्धा... तर सोलापूरसाठी भाजपसोबतच राष्ट्रवादीदेखील इच्छुक...रायगड व कोल्हापूरसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत चढाओढ

  • संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिघांपैकी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी  फरार तीन आरोपीं पैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती...तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा... आणखी एकां संशयीताला ताब्यांत..एकूण तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...हत्येच्या 25 दिवसानंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती...अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती

     

  • भंडाऱ्यात अंगणात खेळताना चार वर्षाचा मुलगा बेपत्ता 

     

    Bhandara : तुमसर तालुक्यातील चिखला गावाच्या 52 कॉलनीतल्या एका घरात अंगणात खेळताना चार वर्षाचा मुलगा बेपत्ता झालाय. गेल्या तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. श्वास पथकालाही पाचारण करण्यात आलं. मात्र अद्याप या चिमुकल्याचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. चिमुकल्याचं अपहरण किंवा हिंस्र प्राण्याने शिकार तर केली नसावी, या शक्यतेतून वनविभाग आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केलीय. मात्र वनविभाग आणि पोलीस योग्य तशी शोधमोहीम करत नसून एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे उद्या पोलीस स्टेशन आणि वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं गावक-यांनी सांगितलंय.  

  • प्लास्टिक बंदीबाबत आता कडक कारवाई होणार

     

    Strict Action Will Be Taken Regarding Plastic Ban  :  प्लास्टिकचा वापर केल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांकडूनही दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसी प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करणार आहे. प्लास्टिक बंदीबाबतच्या आवश्यक सूचना पालिकेला देण्यात आल्या असून विक्रेता आणि खरेदीदार असा कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आता मुंबईकरांच्या हातात दिसल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणारेय. 

  • कल्याणमधील मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरण, विशाल गवळीला आज कोर्टात हजर करणार

     

    Kalyan Crime : कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल गवळीला आज पुन्हा कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. विशाल गवळीसोबत त्याची पत्नी साक्षी गवळीबाबतही आज कोर्टात सुनावणी होणार आहे. विशालच्या गुन्ह्यात त्याची पत्नी साक्षी गवळी हिचाही सहभाग होता त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज त्यां दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायालय आता काय शिक्षा सुनावते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • परभणीत आज संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parbhani Morcha For Santosh Deshmukh Case​ : संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मोर्चा काढला जाणारेय. जिंतूर रस्त्यावरील नूतन कॉलेजच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने हा मोर्चा काढला जाणारेय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस,संदीप क्षीरसागर, राहुल पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणारेत. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link