Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 05 Jan 2025-10:37 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल...हितेश धेंडे नामक तरुणाकडून धमकी...तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी... तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु...धमकी देणारा तरुण श्रीनगर वारली पाडा या ठिकाणी राहणारा असल्याची माहिती

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मनोज जरांगेंवर परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परळीत अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय...परभणीत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जरांगे यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं..याविधनानंतर अनेक जिल्ह्यात मुंडे समर्थक आक्रमक होत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं.. आंदोलनानंतर परळीत मनोज जरांगेंवर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आलं आहे... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुण्यातील शिरूर तालुक्यात कोयता गँगची दहशत

     

    Pune Koyta Gang : पुण्यातील शिरूर तालुक्यात कोयता गँगची दहशत पसरलीये. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथील मनी ट्रान्सफरच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयता गँगनं 35 हजारांची रोकड लंपास केलीये.. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी 24 तासाच्या आत या आरोपींना अटक केलीये. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.. 

  • बीडमधलं गँगवॉर थांबलं पाहिजे- बजरंग सोनवणे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bajrang Sonawane : बीडमध्ये गँगवॉर सुरु असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला...बीडमधलं गँगवॉर थांबलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सोलापूर बस स्थानकात एसटी बसने घेतला पेट, आगीत बस जळून खाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Solapur Burning Bus : बस स्थानकावर थांबल्या जागी एस टी बसने अचानक घेतला पेट...मोहोळ बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एसटी बसने घेतला पेट... सांगोल्याहुन हैद्राबादकडे जाणारी बस मोहोळ बसस्थानकात थांबलेली असताना घडली घटना...चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे भरलेल्या बस मधील प्रवाश्यांचा वाचला जीव..एसटी बस मधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडला प्रकार...या आगीत सर्व बस जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • 'मनोज जरांगेंचा बंदोबस्त करा',लक्ष्मण हाकेंची मागणी

     

    Laxamn Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. कधी, कुठं यायचं ते जरांगेंनी सांगावं, आव्हान हाकेंनी केलंय. काल परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला. तर जरांगे चिथावणीखोर वक्तव्य करतायेत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी हाकेंनी केलीय. 

  • जितेंद्र आव्हाडांचे ट्विटरवर गंभीर आरोप

     

    Jitendra Awhad Tweet : संतोष देशमुख हत्येप्रकरणी नेमलेल्या SIT मध्ये एक प्रमुख IPS नेमलाय. मात्र, त्यांच्या हाताखाली असलेले अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. PSI महेश विघ्ने यांचे वाल्मिकशी जवळचे संबंध आहेत. तर मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा खास माणूस आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून बीड LCBमध्ये काम करतात, असाही आरोप आव्हाड यांनी ट्वटरवरून केलाय. 

  • बीडमध्ये 4 पोलीस अधिका-यांच्या बदल्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Police Transferred : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असताना आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात.. यात देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत.. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी-दमानिया

     

    Anjali Damania : पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी फोन करुन धमक्या दिल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. माझे 5 दिवसांचे कॉल रेकॉर्ड तपासा आणि धमक्यांचे फोन करणा-यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी दमानियांनी केलीये.. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी स्थापन केलेली SIT आणि CID चौकशी केवळ धूळफेक असल्याचंही त्या म्हणाल्यात...  

  • लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय. कधी, कुठं यायचं ते जरांगेंनी सांगावं, आव्हान हाकेंनी केलंय. काल परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला. तर जरांगे चिथावणीखोर वक्तव्य करतायेत. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी हाकेंनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 13 बांगलादेशी नागरिकांना अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ghatkopar Bangladesh People Arrest : मुंबईच्या घाटकोपरमध्ये पोलिसांनी आज तब्बल १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे सर्व १३ आरोपी नालासोपाराच्या अचोले भागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती. यात मिळालेल्या माहितीच्या आधार ही कारवाई करण्यात आली.बांगलादेशी अनधिकृतपणे भारताच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल मार्गने भारतात आले.त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीडमधील पोलीस खातं बरखास्त करा - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय...अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय. आका आजही मंत्रिमंडळात बसलेत अशी टीकाही त्यांनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंढरपुरात दर्शन नावाखाली भाविकांची लूट?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pandharpur Devotees Looted : पंढरपुरात झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. श्री विठ्ठल रुक्मिणीचे झटपट दर्शन करून देण्यासाठी खाजगी एंजटनं भाविकाकडून 11 हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पालघर जिल्ह्यातील भाविक दर्शनास आल्यानंतर चिंतामणी उत्पात या खाजगी एजंटनं झटपट दर्शन करून देण्यासाठी तब्बल 11 हजार रुपये घेतले. पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता प्रकार उघड झाला. यानंतर चिंतामणी उत्पात वर गुन्हा दाखल झालाय. हा एजंट मंदिरात कोणाच्या संपर्कात राहून दर्शन घडवतो, हे मात्र गुलदस्त्यात आहे. समितीकडून त्याचा शोध घेण्याची गरज आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत मिटकरींची नाराजी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Mitkari On Suresh Dhas : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही ट्विट केलंय. यातून सुरेश धस यांच्या वक्तव्याबाबत मिटकरींनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुरेश धस यांना आवर घाला - सूरज चव्हाण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Suraj Chavan On Suresh Dhas : सुरेश धस यांना आवर घाला, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलीय. भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना काल परभणीतल्या सभेतून प्रश्न विचारल्यानंतर, सूरज चव्हाण आक्रमक झालेत. सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चव्हाणांनी केलाय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून, धस यांनी अजित पवारांचे चिमटे काढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आक्रमक झालेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मला नको - छगन भुजबळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal On Dhanajay Munde : धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद मला नको. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिलीये. तसंच मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत नाही, असं भुजबळ म्हणालेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात थंडीचा कडाका वाढला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Cold : राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. धुळ्यात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.. तर निफाडमद्येही पारा 10 अंशावर गेलाय.. पुढील तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहील  असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मेट्रो रेल्वेसेवेनं गाठला 1000 किमी लांबीचा टप्पा

     

    Metro Service : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेला नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नमो भारत रेल्वे सेवेची ची भेट दिलीये.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो रेल्वे सेवेने 1 हजार किलोमीटर लांबीचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय. 2002 मध्ये माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्लीत आधुनिक मेट्रो रेल्वे सेवेचा प्रारंभ केला होता.. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशभरातील 1000 किलोमीटरच्या ऐतिहासिक टप्यापर्यंत विस्तारलीये.. या नव्या विक्रमासह  भारतात जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो सेवेचे जाळं निर्माण झालंय.. 

  • माणिकराव कोकाटेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

     

    Manikrao Kokate On Chhagan Bhujbal : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी माजी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. ज्यांना जिथं जायचंय ते तिथं जाऊ शकतात. पक्षाने भुजबळांचे खूप लाड केलेत. अजून किती लाड करायचे, अशी बोचरी टीका कोकाटींनी केलाय.

  • नागपुरात 3 वाघ, एका बिबट्याचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Tiger, Leopard Death :  नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3  वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झालाय.. H5N1या व्हायरसमुळे या वाघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ  येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून देण्यात आलाय.. H5N1मुळे वाघाचा मृत्यू झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जातंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Railway Megablock : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिनही मार्गांवर दुरुस्तीची कामं असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणारेय. हार्बर रेल्वे मार्गावर  पनवेल-वाशी अप आणि डाऊन असा मेगाब्लॉक असणार आहे सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा  मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. मध्य रेल्वेचा माटुंगा-मुलुंड अप-डाऊन धीम्या मार्गावर  सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असणार आहेत. तर पश्चिम रेल्वेचा चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.

    बातमी पाहा - Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...

  • पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Janakrosh Morcha : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात आज जनआक्रोश मोर्चा आयोजीत करण्यात आलाय. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणा-या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link