Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
'वाल्मिक कराड परळीचा डॉन पेक्षा डॉन', टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धसांचा दावा
Suresh Dhas on Walmik Karad : 'वाल्मिक पंकजा, धनंजय मुंडेंपेक्षा मोठा होऊ लागला होता'...'वाल्मिक कराड परळीचा डॉन पेक्षा डॉन'...'वाल्मिक कराड हा डॉनपेक्षाही मोठा होता'...धनंजय मुंडे वाल्मिक कराडचंच ऐकत होते'...'वाल्मिक समर्थकांची संख्या खूपच वाढली'... टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धस यांचा दावा
वाल्मिक कराडला ईडीची नोटीस पूर्वीच आली होती- सुरेश धस
Suresh Dhas on Walmik Karad : वाल्मिक कराडची 1500 कोटींची संपत्ती'... 'वाल्मिक कराडला ईडीची नोटीस पूर्वीच आली होती'... टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धसांचा दावा... '2-4 महिन्यापूर्वी वाल्मिकला ईडीची नोटीस आली'... 'वाल्मिक दिवसाला कोट्यवधीची वसुली करत होता'..वाल्मिकच्या बायकोच्या नावे कोट्यवधीची संपत्ती...ईडीची नोटीस आली मग कारवाई का झाली नाही?.. वाल्मिकला ईडीपासून वाचवणारा कोण?
संभाजीनगरमध्ये चुलत भावाकडून बहिणीची हत्या
Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये चुलत भावाकडून बहिणीची हत्या...200 फूट डोंगरावरून मुलीला ढकललं... चुलत भावाला पोलिसांकडून अटक... प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती...खावडा डोंगरावरून ढकलून दिल्यानं मुलीचा मृत्यू...पोलिसांकडून अधिक तपास सुरु
बातमीचा व्हिडीओ पाहा-
...तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही- सूत्र
Ajit Pawar on Dhananjay Munde : बीड प्रकरणात ,जोपर्यंत पुरावा नाही,तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही... खात्रीलायक सूत्रांची माहिती...न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही...तिन्ही चौकशी मध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार...उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका
'दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदला',भाजपची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Change India Gate Name : दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीये... भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी इंडिया गेटच नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी मोदींकडे केलीये.. पंतप्रधान मोदींना जमाल सिद्दीकी यांनी पत्र लिहून इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी पत्रातून केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
संतोष देशमुख हत्या प्रकरण, 3 आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांना पोलीस कोठडी
कैलास फडचा पिस्तूल परवाना रद्द, हवेत गोळीबार करणं भोवलं
Kailas Phad : पिस्तुलातून हवेत गोळीबार करणं अखेर कैलास फड याला भोवलंय. कैलस फडसह इतर दोघांचे पिस्तूल लायन्स रद्द करण्यात आलंय. कैलास फडचा हवेत गोळीबार केल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं फडवर कारवाई केलीय. याबाबतचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्या सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. यानंतर जर कुणी अशा पद्धतीनं समाज माध्यमांवर दहशत निर्माण केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
दादरमध्ये टोरेस ज्वेलर्स कंपनीकडून फसवणूक
Torres Jewelers : दादरमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीने कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय... कालपासून दादरमधील हे दुकान बंद झाल्याने नागरिकांनी दुकानासमोर मोठी गर्दी केलीये..
भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याची गुंतवणूकदारांना आश्वासन देण्यात आलं होतं.. गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांचे पैसे परतफेड देखील करण्यात आली..तसेच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने डायमंड हिरा देखील दिला..मात्र हा डायमंड हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त 500 रुपये इतकीच असल्याचं समोर आलं आहे...या टोरेस कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखपर्यंत गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे...धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला
Dhananjay Munde Meets Ajit Pawar : धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला...मंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल...धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू...बीड प्रकरणी धनंजय मुंडे अजित पवार यांच्यामध्ये चर्चा
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, 9 सुरक्षा जवान शहीद
Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला...हल्ल्यात 9 सुरक्षा जवान शहीद झाल्याची माहिती... छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला
मुंबईत ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या
Mumbai same Number Plate : मुंबईत एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या.. दोन्ही गाड्याचं मॉडेलही एकच.. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, ताज हॉटेल परिसरात मिळाल्या एकात नंबर प्लेटच्या दोन गाड्या.. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या.. ताज हॉटेल जवळ गाड्या सापडल्याने पोलीस सतर्क. दोन्ही वाहनांना चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आल.
ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही - भुजबळांनी जरांगेंना सुनावले
Bhujbal on Jarange : ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावले.. जरांगेंनी कायदा हातात घेण्याची गरज नाही, जरांगेंचं बोलणं योग्य नसल्याचं छगन भुजबळ यांचं विधान. परभणीच्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. देशमुख कुटुंबीयांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारू, असा इशारा जरांगे यांनी दिला होता.
धनंजय मुंडेंचा राजीनामा सध्या मागणं योग्य नाही - भुजबळ
Bhujbal on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं नाही...आका-काका जे कोणी असतील जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात यावी मात्र चौकशीआधीच त्यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.... देशमुख हत्येचं प्रकरण गंभीर आहे...त्याची कसून चौकशी व्हायला हवी...आणि चौकशीनंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील असं वक्तव्य आणि मागणी भुजबळांनी केलीय. मात्र कुणावरही अन्याय होऊ नये, असं म्हणत मुंडेंची बाजू जणू भुजबळांनी मांडली.
मतं दिली म्हणजे मालक झाले का? - अजित पवार
Ajit Pawar & Chandrashekar Bawankule : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या सभेत कार्यकर्त्यावर संतापले. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक झाले का?, मला सालगडी केलंय का?, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. एका कार्यक्रमात नागरिक अजित पवारांना कामासंदर्भात निवेदन देत होते. यावेळी एका कार्यकर्त्यानं अनेक कामे झाले नसल्याचे म्हटले. यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. तर जनताच मालक आहे, असा चिमटा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना काढलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा - .
बीडमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल
Manoj Jarange : धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणीत केलेल्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. परळीपाठोपाठ आता बीडमध्ये जरांगेवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांनी काल दुपारपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. अखेर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अंजली दमानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी ओबीसी बांधवांनी केलीय. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल
Tuljabhawani Temple : तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल झालाय. आता भाविकांना गाभा-यातून दर्शन घेता येणारेय नाहीये. मंदिराच्या गाभा-याचं काम सुरू असल्यानं दर्शनाची व्यवस्था बदलण्यात आलीये. मात्र अगोदर सूचना न देताच मंदिर संस्थांनी गाभा-यातलं दर्शन बंद केल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे. भाविकांना सध्या खिडकीतूनच दर्शन घेता येणारेय. तर मंगळवारी पहाटेपर्यंत दर्शन पूर्ववत होण्याची अपेक्षा भाविकांना आहे.
शरद पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Sharad Pawar Letter To Devendra Fadanvis : शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आहे. लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत, त्यांना राज्य शासनानं योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं, अशी मागणी निवेदनाद्वारे शरद पवारांनी केली आहे. याचीच माहिती त्यांनी ट्वीट करूनही दिली आहे. गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते सातत्यानं शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधींना सरकारनं संरक्षण द्यावं, असं पवारांनी पत्रात म्हटलंय.
वाघिणीची वाट रोखणं पडलं महाग
Nagpur : नागपूरमधील वाघिणीची वाट रोखल्याप्रकरणी तीन महिन्यांचं निलंबन करण्यात आलंय चार जिप्सी चालक आणि गाईडचं तीन महिन्यांसाटी निलंबन करण्यात आलंय. आधी एका आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं.. मात्र त्या वाढ करून तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलंय.. नागपूरमधील उमरेड पवनी कऱ्हांडला अभरण्यातील F2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांची वाट जिप्सी चालक, पर्यटकांनी रोखली होती.. त्यानंतर प्रशासनानं कारवाई केलीय. तसेच जिप्सी चालकांना 25 हजार रुपये दंड, तर गाईड यांना प्रत्येकी हजार रुपये दंड लावण्यात आला
बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा
Beed Protest : बीडमध्ये आज संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सर्व दलित संघटनां या मोर्चामध्ये सहभागी होणारेत. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा आरोप करत पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य करणारे अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणारेय. परभणीमध्ये महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावेत, शासकीय नोकरीतील रिक्त असलेल्या राखीव जागा भराव्यात याही मागण्या या मोर्चातून केल्या जाणारेत.
धाराशिवमध्ये 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूकमोर्चा
Dharahiv Morcha : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जिल्ह्यात सर्वपक्षीय मूकमोर्चा निघणारेय. 11 जानेवारीला धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होणारेत. या मोर्चाची तयारी सुरू आहे.
वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात 70 जनावरांना विषबाधा
Wardha Cow : वर्ध्यातील आर्वी तालुक्यात 70 जनावरांना विषबाधा झालीये. सावळापूर शिवारात ही घटना घडलीय. यात आतापर्यंत 11 जनावरांचा मृत्यू झालाय. तर 59 जनावरांवर पशुवैद्यकीय अधिका-यांकडून उपचार सुरूयेत. कपाशीची बोंड खाल्ल्यानं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण स्पष्ट होणारेय.
सुषमा अंधारेंचा सुजय विखेंवर निशाणा
Sushma Andhare On Sujay Vikhe Patil : सुषमा अंधारे यांनी सुजय विखे पाटलांवर निशाणा साधलाय. शिर्डीच्या साई संस्थानमध्ये मोफत भोजन बंद करा. त्यावरील पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, अशी मागणी सुजय विखे पाटलांनी केली होती. यावरून सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात. आपल्या संस्थेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता का? असा सवाल अंधारेंनी सुजय विखे पाटलांना केलाय. चौथी ते पाचवीच्या मुलांकडून दीड लाख रुपयांची फीस घेता, यावेळी तुमचा समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो?, असं पत्र सुषमा अंधारेंनी विखे पाटलांना लिहिलंय.
कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल
Navi Mumbai APMC Mango : कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झालीय. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आंब्याची पहिली पेटी दाखल झालीय. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या आंबा बागेतील ही 5 डझनची पहिली पेटी आहे. यावर्षीच्या आंबा हंगामातील पहिली केशर आंबा पेटी आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे बुजवले
Bhiwandi Zee 24 Taas Impact : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा-खडवली बायपास जवळ नवीन उड्डाण पूलाच्या निर्मितीचं काम सुरू असून बाह्यवळण रस्ते तयार केलेतं. मात्र या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सततची वाहतूक कोंडी होऊन धुळीचे साम्राज्य पसरतंय. वाहन चालकांसह नागरीकांना याचा त्रास सहन करवा लागत होता. तसेच पूलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, वाहतूक धिम्या गतीने सुरू असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक आणि वाहन चालक हैराण झाले होते. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबींकडे लक्ष केंद्रित करून बाह्यवळण रस्ते दुरुस्ती करुन धुळीची समस्या सोडवावी या संदर्भाची बातमी झी २४ तासने दाखवली होती.त्याची दखल घेत तातडीने रस्त्यावर डांबर घालण्यात आलं.आणि उड्डाणपुलाच्या कामालाही गती आलीय.