Team India in Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत

Thu, 04 Jul 2024-8:34 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक, टीम इंडियाकडून ट्रॉफी उंचावून अभिवादनाचा स्वीकार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Team India in Mumbai : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेता टीम इंडियाची विजयी मिरवणूक सुरू... नरिमन पॉईंट ते वानखेडे विजयी मिरवणूक.. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना ... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.. मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींचा महासागर.. क्रिकेटप्रेमींनी फुलला क्विन्स नेकलेस. भारतीय टीमचं क्रिकेटप्रेमींकडून अभिनंदन.. टीम इंडियाकडून ट्रॉफी उंचावून अभिवादनाचा स्वीकार.. विशेष बसमधून ते वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.. त्याठिकाणी विश्वविजेत्या टीमचा जंगी सत्कार करण्यात येईल. हा सोहळा पाहण्यासाठी वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुंबई विमानतळावर विश्वचषकाचा जगज्जेता भारती क्रिकेट संघाचं जंगी स्वागत

     

    Team India in Mumbai : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषकाचा जगज्जेता भारती क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर दाखल झालाय. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं. मुंबई विमानतळासह, ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे, त्या मार्गावर चाहत्यांची गर्दी झालीय. हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडिअमवर विशेष बसनं पोहोचणार आहेत. त्या वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची गर्दी झालीय...

  • वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vasant More : पुण्याचे वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेत.. 9 जुलैला ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.. मातोश्रीवर त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली.. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थीत होते.. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. आता आगामी विधानसभा निवडणुक ते ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात 2 पोलीस कर्मचारी निलंबित

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात 2 पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.. हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावं आहेत.. ललीत पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.. तसंच ललीत पाटील एक्स रे काढण्यासाठी गेला तेव्हा दोघेही पोलीस कर्मचारी त्याच्या सोबत नव्हते असंही तपासात निष्पन्न झालंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा महाराज आहे. ते गुहेत जाऊन स्वत:ला बाबा म्हणून घेतात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय. देवाचा आवतार म्हणून घेणं ही भोंदूगिरीच, असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोल्हापुरात टोस्टमध्ये अळ्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur : कोल्हापुरात नामांकित कंपनीच्या बेकरी उत्पादनामध्ये अळ्या सापडल्यात. बाजार भोगाव इथं हा प्रकार उघडकीस आलाय. एका छोट्या मुलाला टोस्ट खाताना ह्या अळ्या दिसल्या. विशेष म्हणजे पॅकेटवरील एक्सपायरी डेट अजून पाच महिने बाकी असताना पाकिटात अळ्या आढळल्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतायत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ajit Pawar Vs Sanjay Raut : राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर अजितदादांनी पक्ष बदलला नाही तर चोरला असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीराजे ऑनलाईन गेमिंगविरोधात आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajiraje On Online Gaming : छत्रपती संभाजीराजे ऑनलाईन गेमिंगविरोधात आक्रमक झालेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवेदना विसरल्यात का? असा सवा त्यांनी केलाय. ऑनलाईन गेमिंग बंद करा अन्यथा 9 जुलैला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी विधान भवनात येणार असा इशारा त्यांनी दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Hingoli : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावात लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामस्थांची अडवणूक होत असल्याचा आरोप होतोय. ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांनी घरपट्टी भरा तरच कागदपत्रं मिळतील असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनिल केदारांना मोठा धक्का बसलाय.. सुनिल केदारांना शिक्षेस स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदारांना मोठा धक्का मानला जातोय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कृषी मंत्रालयात 118 कोटींचा घोटाळा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supriya Sule : राज्य सरकारच्या कृषी मंत्रालयात 118 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप संघाच्याच कृषी संघटनेनं केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. या संदर्भात संघाच्या कृषी संघटनेनं देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली मात्र 30 दिवस झाले तरीही याची चौकशी झाली नाही.. त्यामुळे हे प्रकरण आम्ही लोकसभेत मांडणार होतो. मात्र आम्हाला वेळ दिली नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान मोदींचा 13 जुलै रोजी मुंबई दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिल्यांच मुंबई दौरा असणारेय. गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन आणि विविध विकासकांच्या भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणारेय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Supriya Sule : अजित पवारांवरील भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर उत्तर महाविकासआघाडीनं नाही तर महायुतीनंच द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ajit Pawar : अजित पवारांनी ट्विटर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पात सरकारने घेतलेल्या विविध योजनांचे गुणगाण गायले आहे. त्याचसोबत मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण एकही सिद्ध झाला नाही. आणि भविष्यातही सिद्ध होणार नाही असं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमची साथ हवी आहे असं आवाहनही अजित पवरांनी त्या व्हिडिओद्वार केलं आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मीरा-भाईंदरमध्ये ड्रग्जविरोधात कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mira Bhyandar Drugs Seized : मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 326 कोटी 69 लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्स जप्त करण्यात आलंय.  याप्रकरणी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या आंतरराज्ययीय टोळीतील 15 आरोपींना विविध राज्यातून अटक करण्यात आलीये. पोलिसांनी या आरोपींकडून तीन पिस्तूल, एक रिवॉलर आणि 33 जिवंत काडतुस हस्तगत केल्या आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यावरील पाणीसंकट आणखीन गडद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Water Shortage : यंदा राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.. दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा केवळ 21.84% एवढाच आहे.. पुणे आणि औरंगाबाद  विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहीलाय तर अमरावती आणि विदर्भातील जलसाठा समाधानकारक आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात 2 महिन्यांत झिकाचे 8 रुग्ण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Zika Virus Update : राज्यात गेल्या 2 महिन्यांत झिकाचे 8 रुग्ण आढळून आलेत.. तर आतापर्यंत राज्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या 19वर गेलीये...पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेत. तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व महानगरपालिकांमधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबत मार्गदर्शनही करण्यात आलेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • NEET पेपरफुटी प्रकरणात CBI अ‍ॅक्शन मोडवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Neet Paper Leak Update : NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआय अ‍ॅक्शन मोडवर आलंय. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची सीबीआयने 12 तास कसून चौकशी केली. तसंच CBI पथकाने दोन्ही आरोपींना लातूर शहरातील इरण्णा कोनगलवारच्या बंद घरात नेलं आणि यावेळी पथकाने घराची झडती घेतल्याचीही माहिती मिळतेय.. न्यायालयाने आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय कस्टडी दिलीय. त्यामुळे  धागेदोरे शोधण्याचं मोठं आव्हान CBI कडे आहे.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मायदेशी आगमन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Team India : टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link