Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

Tue, 09 Jul 2024-10:25 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'राजकीय पोळी  विरोधकांचा भाजण्याचा प्रयत्न', देवेंद्र फडणवीसांची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : 'जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटता ठेवण्याचे प्रयत्न' ....राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न....उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर तिखट हल्लाबोल....सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार.... विरोधकांनी बहिष्कार घालून आपले रंग दाखवले....मुख्यमंत्री आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतील अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • गौतम गंभीर भारतीय क्रिकेट टीमचे नवे कोच, BCCI सचिव जय शाहांची घोषणा

     

    Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची निवड करण्यात आलीय.. बीसीसीयचे सचिव जय शाह यांनी ही मोठी घोषणा केलीय.. गौतम गंभीर यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक म्हणून सूत्र हाती घेतली होती. आणि त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकलं होतं. भारतीय क्रिकेट टीमचे सध्याचे कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्ड कपनंतर संपलाय. याआधी 2023 च्या वन डे वर्ल्ड कपनंतरच द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र बीसीसीआयने त्यांना टी-20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र आता टीम इंडियाची जबाबदारी गौतम गंभीर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
     

  • 'बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी', इलॉन मस्क यांची मागणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Elon Musk On Ballot Paper : इलॉन मस्क यांनी पुन्हा ट्विटरवर, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असं ट्विट केलंय. ईव्हीएमवर निवडणूक घेणं धोक्याचं ठरत असल्यामुळे इलॉन मस्क यांनी हे ट्विट केलंय. यापूर्वी देखील इलॉन मस्क यांनी ईव्हीएम सुरक्षित नसल्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्य सरकारच्या आरक्षण बैठकीला विरोधकांचा बहिष्कार

     

    Maharashtra Politics : राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतलाय... आम्ही बैठकीला जाणार नाही... आरक्षणाबाबत सरकारनं सभागृहातच भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय.. 

  • विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : विधान परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय...पावसाळी अधिवेशनातच सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे...भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने भाजपनं सभापतीपदावर दावा केलाय..तर राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तबही होण्याची शक्यता आहे..सभापतीपदासाठी शिंदे गटही आग्रही असल्याची माहिती मिळतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'मिहीर शाहवर मर्डरची केस लावा', आदित्य ठाकरेंची मागणी 

     

    Aaditya Thackeray : वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाहवर मर्डरची केस लावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता.. तेव्हा मिहीरला अटक करण्यासाठी 60 तास का लागले.. मिहीर शाहाला लपवण्याचा प्रयत्न झाला का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारलाय.

  • वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.. मुख्य आरोपी मिहीर शाहाच्या पोलिसांनी शहापूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.. मुंबई गुन्हे शाखेनं मिहीर शाहाला बेड्या ठोकल्या आहेत.. मिहीर शाहाला मदत करणा-या 12 जणांनाही ताब्यात घेण्यात आलंय... त्याचसोबत मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता.. मिहीर शाहाला लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात यश आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 55 जणांना चावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhiwandi Dog Bite : भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस... कुत्र्याने 50 ते 55 जणांना एकाचवेळी चावा...भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरातील धक्कादायक घटना....चावा घेतलेल्यांमध्ये 18 शाळकरी मुलं, दोघांची प्रकृती चिंताजनक 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

     

    Mumbai Mantralaya : मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न...पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न

  • तेजस ठाकरेंच्या डान्सवर नितेश राणेंची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nitesh Rane On Tejas Thackeray : अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात केलेल्या तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन नितेश राणेंनी टीका केलीये.. एकाचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो.. तर दुसरा अंबानींच्या कार्यक्रमात नाचतो.. त्यामुळे कुठल्या तोंडानं अदानींना शिव्या घालतात असा सवाल नितेश राणेंनी उपस्थीत केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विधानसभेसाठी बच्चू कडूंची तिसरी आघाडी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bacchu Kadu : विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताय. लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वादग्रस्त महिला IAS अधिकाऱ्याची बदली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune IAS Transfer : खासगी गाडीवर लाल दिवा लावणं महिला IAS अधिका-याला चांगलंच भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वडिलांनीच दिला मुलाला पळून जाण्याचा सल्ला?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Worli Hit & Run Case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आलीये.. राजेश शहांनीच मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. वरळीत कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर आरोपी मिहिर याने त्याचे वडील राजेश शहा यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी, शहा यांनी मिहिर याला पळून जाण्यास सांगितले. तसेच, हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे सांगू, असे सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा आरोपी राजऋषी बिडावत याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. राजऋषी हा शहा कुटुंबीयांचा चालक असून अपघातावेळी मिहिरच्या शेजारी गाडीमध्ये बसला होता.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • खामगावमध्ये पावासाचा हाहाकार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Buldhana Heavy Rain : बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला.  12 पैकी 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. जवळपास 250 घरात  पुराचं पाणी शिरलं... मुसळधार पावसामुळे 3 घरांचं पूर्णतः नुकसान झालं तर 89 घरांची पडझड झालीय...अनेकांचे संसार उघड्यावर आले. पुरात अडकलेल्यांची आपत्ती शोध बचाव पथक, स्थानीक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कोलारी गावात  काही महिला लहान मुलांसह अडकलेल्या होत्या त्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं.  शेती खरडून गेल्याने शेती पीकांचंही अतोनात नुकसान झालं. आवार महसूल मंडाळात 219.3 मिमी पावसाची नोंद झालीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अरुण गवळीवर मकोका लावणारी कागदपत्र गहाळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Arun Gawali : कुख्यात गुंड अरुण गवळीवर मकोका लागू करण्यासाठी लागणारी कागदपत्रं गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 10 वर्षानंतर कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली न्यायालयात दिलीय. 2013 साली मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्रं गहाळ झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय.गेल्या महिन्यात याच कागदपत्रांवरून न्यायालयानं पोलिसांना खडसावलं होतं. कमलाकर जामसंडेकरांच्या हत्या प्रकरणात नागपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गवळी सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवार गट विधानसभेसाठी लागला कामाला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Camp : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 90 दिवसात प्लॅन बनवला जाणारेय. प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणारेय.तसंच अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचं कॅम्पेन राबवलं जाणारेय. बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेते, आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या बैठकीत येत्या 14 जुलैला बारामतीत जाहीर 'जन सन्मान' रॅली आयोजित करण्याचा ठराव पास करण्यात आलाय. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी असेल असं पक्षानं म्हटलंय.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरात हिट अँड रनचं सत्र सुरुच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Hit And Run : नागपुरात हिट अँड रनचं सत्र सुरूच आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत या 2 घटना घडल्यायत. एका घटनेत बाईकस्वार तरुणाचा जीव गेला तर दुस-या घटनेत रेल्वेतील अधिकारी गंभीर जखमी झालेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vasant More : पुण्याचे वसंत मोरे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.. आज दुपारी 12च्या सुमारास ते आपल्या कार्यकत्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थीतत पक्ष प्रवेश करतील.. मातोश्रीवर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असेल.. मागील आठवड्यात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्याच  वेळी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचं घोषित केलं होतं.. वसंत मोरे याआधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये  होते..  लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती...आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - वसंत मोरेंचा आज ठाकरे गटात प्रवेश

  • पुण्यात गर्भवती महिलेला 'झिका'ची लागण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Zika Virus Update : पुण्यात आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण झालीय. येरवडयाच्या कळस भागातील 31 वर्षीय महिलेला झिकाची लागण झालीय. त्यामुळे आता झिका रुग्णांची संख्या 12 वर पोहोचलीय. महिलेच्या शरीरावर लाल चट्टे आलेत. तर ताप आणि अंगदुखीसारखे लक्षणं दिसून आली होती. तिच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडं पाठवण्यात आले होते. यातून ती झिका पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. दरम्यान, गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली तर त्याचा थेट परिणाम बालकाच्या मेंदूवर होतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - पुण्यात गर्भवती महिलेला झिकाची लागण

  • मुंबईची पाण्याची चिंता मिटली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Dam Water Level : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय..  मुंबईला पाणीपुरठा करणा-या सातही धरणांमधील पाणीसाठा 18 टक्क्यांवर आलाय.. दोन दिवसांतच धरणांतील पाणीसाठा 4 टक्क्यांनी वाढलाय.. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलीये.. धरणांतील जलसाठा खालावल्यानं बीएमसीनं 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतलाय... आता हा निर्णय महानगर पालिका मागे घेणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंची लातूरमध्ये शांतता रॅली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची आज लातूरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅली होणारेय. दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांचं शहरात आगमन होईल. त्यांच जंगी स्वागत केलं जाणारेय. शहरातील विवेकानंद चौकातून रॅलीला सुरुवात होईल. सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जाहीर सभा होणारेय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेसाठी खास मंच तयार करण्यात आलाय. इथूनच ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोकण रेल्वेचं वेळापत्रक पावसामुळं कोलमडलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Konkan Railway : मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले असून सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. मुंबईहुन सुटणाऱ्या सर्वच गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत असून कोकण रेल्वेने याबाबत कोणतीही अधिसूचना दिली नाही.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Rain Alert : मुंबईत आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यताय. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय.. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे. सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    School & Colleges Holiday : बातमीपत्राच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातून ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आज बंद असतील. नवी मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मनपा आयुक्तांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आज बंद राहणारेत. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. पुण्यातीलही सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link