Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 10 Jul 2024-10:20 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टरप्लान?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...विधान परीषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत....यासाठी त्यांनी मास्टर प्लान तयार केल्याची माहिती मिळतेय...महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मत, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची...? याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलीय अशी माहिती सूत्रांनी दिलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार', खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kolhe on Devendra Fadnavis :  'दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार'...शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य....'फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती विधानसभा लढवणार होती'  'मात्र आता देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार' असं वक्तव्य खासदार कोल्हेंनी  केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • '...तर सगळे रस्ते जाम करू', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : एकही कुणबी नोंद रद्द केली तर विधानसभा निवडणुकीत तुमचे 288 आमदार पाडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच कुणबी नोंद रद्द झाल्यास राज्यातील सगळे रस्ते जाम करु अशा इशाराही त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटलांची जनजागृती शांतता रॅली धाराशिवमध्ये पोहोचली. इथे आयोजित सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर घणाघाती टीका करत हा इशारा दिला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Marathwada Water : मराठवाड्यातील एकही जिल्ह्यांमध्ये पावसानं आत्तापर्यंतची सरासरी गाठली नाहीये. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय. जो सरासरीपेक्षा 40% टक्क्यानं कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 50% टक्के पेक्षाही कमी पाऊस बरसलाय. मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतक-यांना सतावतेय. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर !, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

     

    Good news for State Government Employees : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठे गिफ्ट....शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ....१ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू...विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोलेंची माघार

     

    MCA  Election 2004 : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA अध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. मात्र या निवडणुकीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माघार घेतली आहे. दुपारी नाना पटोले आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांनी MCA अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र पटोलेंनी त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता MCAचे सचिव अजिंक्य नाईक, तसंच MCAच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होणार आहे. यात आता क्रिकेटचं मैदान कोण मारणार याकडे लक्ष लागलंय. MCA अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालंय. 

  • वडेगाव ZP शाळा विद्यार्थ्यांविना पडली ओस 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Wadegaon ZP School : गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या ZP शाळेमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळा ओस पडलीये... शाळेत एकूण 7 वर्ग असून 112 विद्यार्थी आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असे 2 दोन जण कार्यरत आहे... तर याठिकाणी एकूण 5 शिक्षकांची गरज आहे... त्यामुळे उर्वरित शिक्षकांची जोपर्यंत नियुक्ती होत नाही तो पर्यंत विद्यार्थांना शाळेत पाठवणार नाही... असा पवित्रा पालकांनी घेतलाय... तर शिक्षकांची भर्ती करणार असून विद्यार्थ्यांना वर्गात येण्याची विनंती शाळेकडून करण्यात आलीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रन, सिटी लिंक बसने शाळकरी मुलीला चिरडलं

     

    Nashik Hit And Run Case : नाशिकमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडलीय सिटी लिंक बसनं 6 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडलं. अपघातानंतर बस चालक फरार झाला. तर चालक दारू प्याला असल्याचा आरोप जमावानं केला. गंभीर म्हणजे शहरामध्ये 3 दिवसांतली ही चौथी हिट अँड रनची घटना घडलीय.  

  • वरळी हिट अँड रन प्रकरण, मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आपल्याला पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं मिहीर शाहनं सांगितलं. तर मिहीर शाह अपघातानंतर कोणाला भेटला, तसंच त्याला कोणी मदत केली याची चौकशी करणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. तसंच पोलिसांकडे पूर्ण माहिती असून, मुख्य आरोपीच्या कस्टडीची गरज नसल्याचं बचाव पक्षानं सांगितलं. तर या गंभीर प्रकरणात अधिक चौकशीची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं मान्य करत कोर्टानं मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • वरळी हिट अँड रन प्रकरण, जुहूतील तपस बारवर बुलडोझर कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Worli Hit And Run Case : जुहूतील तपस बारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे...वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणातील बारवर कारवाई करण्यात आली आहे.....तपस बारमध्येच मिहीरनं केलं होतं मद्यपान....तपस बारवर मुंबई मनपाचा बुलडोझर

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'रिल'च्या नादात कारचा अपघात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Accident : नागपुरात रिल बनवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात झालाय.. अपघातापूर्वी रील बनवताना चा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय... भरधाव कार दुभाजकावर आदळून कारमधील दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जणं गंभीर जखमी झालेत.. नागपुरातील कोराडी रोडवर ही दुर्घटना घडलीये. विक्रम गादे या तरुणाच्या घरी पार्टी करुन हे पाच तरुण मध्य रात्री कारमधून फेरफटका मारण्यासाठी निघाले होते.. गाडीत एक मित्र सोशल मीडियावर रिल्स बनवायला लागला.. त्यानंतर चालकानंही वेगाशी स्पर्धा सुरु केली.. मात्र त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून गाडीचा चेंदामेंदा झाला.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई-गोवा हायवे बंद राहणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai-Goa Express Way : मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगाब्लॉक असणारेय..11 ते 13 जुलै दरम्यान 4 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलीय. कोलाड इथल्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Manoj Jarange On Changan Bhujbal : छगन भुजबळांना माझ्याविरोधात सरकारनंच उभं केलंय. सरकारनेच भुजबळांना बळ दिलंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. लातूरमध्ये शांतता रॅलीदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर हे आरोप केले. तसंच भुजबळांना सत्तेत घेऊन त्यांना मंत्रीपद दिल्यानं पदाचा गैरवापर करत मराठ्यांवर अन्याय करत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Vijay Wadettiwar On Worli Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही सरकारवर टीका केलीय. पोलिसांना आरोपी कुठे होता हे माहिती होतं असा आरोप त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणीही केलीय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Sanjay Raut On Worli Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांनी आरोपीच्या वडिलांसह सरकारवर गंभीर आरोप केलेयत...आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून, आरोपीचे वडील राजेश शहांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप राऊतांनी केलाय...आरोपीने अपघातावेळी ड्रग्जची नशा केली होती...मात्र, ड्रग्जचा अंश सापडू नये म्हणून आरोपीला 3 दिवस फरार ठेवलं...यात पोलिसांवरही शंका उपस्थित करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केलीय...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पुणे पोलीस आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Police : पुण्यात जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवलीत तर तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं.. पुण्यातील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीये.. या पूर्वी दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकावर केवळ खटले दाखल केले जात होते.. मात्र आता चालकाचा थेट लायरन्स रद्द होऊ  शकतो अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्तांनी दिलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीडमध्ये चोरीच्या अफवेचं पेव

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed : बीड शहरात चोरीच्या अफवांमुळे बीडकर रात्र जागून काढतायत...चोरांच्या भीतीमुळे लोक रात्र रात्र जागून गस्त घालतायत...काही दिवसांपूर्वी बीडमध्ये काही चोरटे सीसीटीव्हीमध्ये रात्री बीडच्या रस्त्यांवर फिरताना चित्रित झाले होते...त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून बीड शहरांमध्ये सोशल मीडियासह सर्वत्र याची चर्चा सुरू झाली...त्यामुळे बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं...यामुळे नागरिकांनी स्वतःच्या संपत्तीचे संरक्षण व्हावे यासाठी स्वतःच रात्रभर पहारा दिलाय...हातात लाठ्या काठ्या शिट्ट्या वाजवत नागरिकच गस्त घालतायत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ratnagiri Landslide : रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड-बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे...वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले.. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर फोडण्यात आलाय.. यामुळेच सतत दरड कोसळण्याच्या घटना होत असून वाहतुकीसाठी हा घाट धोकादायक बनलाय..

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Pune Hit & Run Update : पुणे बोपोडी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आलीये.. ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय.. अपघातानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह कार मधील तिघांना ताब्यात घेतलं... त्यांच्या चौकशीत त्यांनी एका वाढदिवसाच्या पार्टीत मद्यपान केल्याचं समोर आलंय... मद्यपान करून घरी येत असताना सिध्दार्थ केंगार हा गाडी चालवत होता. त्याला एका कारने ओव्हरटेक केल्याने त्याला राग आला यामुळे पुढे गेलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने स्वत:ची कार दामटण्याचा प्रयत्न केला आणि अपघात झाल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले.. या अपघातात पोलिस हवालदार समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिस शिपाई संजोग शिंदे हे जखमी झाले आहेत

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Marathwada : मराठवाड्यातील एकही जिल्ह्यांमध्ये पावसानं आत्तापर्यंतची सरासरी गाठली नाहीये. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय. जो सरासरीपेक्षा 40% टक्क्यानं कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 50% टक्के पेक्षाही कमी पाऊस बरसलाय. मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतक-यांना सतावतेय. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमरावतीत मुसळधार पावसाचा रुग्णालयाला फटका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. या पावसाचा फटका जिल्हा सामान्य रुग्णालयालाही बसला. जोरदार पाऊस बरसल्यानं संपूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी झालं. त्यामुळे रुग्णालयातील वॉर्डला जलाशयाचे स्वरुप प्राप्त झालं. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. डॉक्टरांवरही पाण्यात उतरुन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली. यावरून पुन्हा एकदा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दमदार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यात वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Dam Water Level : राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झालीय. धरणांमध्ये 8 दिवसांत 68.24 टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय. राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 26.61 टक्क्यांवर गेलाय. पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे प्रामुख्यानं पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणिपुणे जिल्ह्यातील धरणांत सर्वाधिक 61.40 टीएमसीनं पाणीसाठा वाढला आहे. मराठवाड्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये फक्त अर्धा टक्क्यानं वाढ झालीय. मराठवाड्यासाठी संजीवनी ठरलेल्या जायकवाडी धरणामध्ये सध्या 3.1 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या दृष्टीनं सध्या तरी चिंताजनक स्थिती आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंची धाराशिवमध्ये शांतता रॅली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dharashiv Manoj Jarange : जरांगे पाटलांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये असणारेय. मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगे पाटील मराठवाड्यात शांतता रॅली घेतायेत. धाराशिवमधून आज सकाळी 11 वाजता त्यांच्या जनजागृती रॅलीला सुरूवात होणारेय. शहरभर फिरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होईल. त्यानंतर मनोज जरांगे यांची भव्य सभा होणारेय. आज या सभेतून जरांगे पाटील कोणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link