Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 15 Jul 2024-10:48 pm,

LIVE Updates on JULY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • Aashadhi Wari Special Train : आषाढी एकादशीसाठी भाजप भाविकांकरता विशेष ट्रेन सोडणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे नियोजन केलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. यामुळे विठू माऊलींच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांना दिलासा मिळालाय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Harshawardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवामध्ये केलं. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभात ते बोलत होते. विशेष म्हणजे धैर्यशील माने यांचं विजयासाठी अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी हे विधान केलं. यामुळे खळबळ उडाली असून, यातून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Uddhav Thacekray : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला... ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, असं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलंय.. शंकराचार्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान केला.. यावेळी शंकराचार्यांनी हे वक्तव्य केलं. माझं राजकारणाशी देणंघेणं नाही, सत्य तेच बोलतो, असं ते म्हणाले.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास मुदतवाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pik Vima : महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतक-यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतक-याना 31 जुलैपर्यंत पीकविमा भरता येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार  केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी, 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. 

     

  • मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय..तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ड देण्यात आलाय...कोल्हापूर, संभाजीनगर, जालना आणि परभणीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय...हवामान विभागानं हा अलर्ट जारी केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदित्य ठाकरेंचा उद्या कर्जत, उरण विधानसभेचा दौरा

     

    Aaditya Thackeray : ठाकरे गटाचं मिशन विधानसभा सुरू झालंय...आदित्य ठाकरे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू करताय..उद्या ते कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणारेत...आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पदाधिका-यांशी संवाद साधणारेत...दुपारी अडीच वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे ते पदाधिका-यांशी संवाद साधतील...तर सायंकाळी पाचच्या सुमारास उरण विधानसभा येथील जेएनपीटी येथील मल्टीपर्पज हॉल येथील पदाधिका-यांकडून परिस्थिती जाणून घेणार आहेत...

  • विशाळगडावरील हिंसाचार मनाला वेदना देणारा - शाहू महाराज

     

    Kolhapur Shahu Maharaj : विशाळगड अतिक्रमण मुद्द्यावरून झालेला हिंसाचार मनाला प्रचंड वेदना देणारा असल्याची प्रतिक्रिया, खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रगल्भ असलेल्या जिल्ह्यात अशी घटना घडणं हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यानी सरकार, प्रशासन आणि पोलिसांवरही ताशेरे ओढले. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभिर्यानं घेतली गेली नाही अशी टीका त्यांनी केली. उद्या शाहू महाराज विशाळगडला भेट देणार आहेत. 

  • राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कॅगकडून चिंता व्यक्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra State CAG Report : राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कॅगकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय...वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा असे ताशेरे कॅगने सरकारवर ओढलेयत...महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलंय...2022-23 या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केलीय...राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेलाय...कर्जाचे हे प्रमाण उत्पन्नाच्या 18.73 टक्के आहे. हे प्रमाण 18.14 टक्के अपेक्षित आहे...मात्र, ते वाढत असल्याने सरकारच्या तिजोरीवर अधिक बोजा वाढणार आहे...यामुळे कॅगने सरकारला सावधतेचा इशारा दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पूजा खेडकर यांची कागदपत्र सापडली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pooja Khedkar Document : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली आहेत...अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत...आज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे...त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये....पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते...जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते...

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • 'आरक्षणासंदर्भात पवारांशी चर्चा केली', छगन भुजबळ यांची माहिती

     

    Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली...ही भेट राजकीय नसून, राज्यात आरक्षणावरून स्फोटक स्थिती निर्माण झालीय...ती शांत करण्यासाठी पवारांची भेट घेतल्याची माहिती भुजबळांनी दिली...पवार हे ज्येष्ठ नेते आहेत...त्यामुळे राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भुजबळांनी केलीय...यावेळी पवारांनी शिंदेंशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं...

  • 'रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगतात'​, शरद पवार गटांची अजित पवारांवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Group on Ajit Pawar : बारामतीतील अजित पवारांच्या सभेवरून शरद पवार गटानं निशाणा साधलाय. सभेतील रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगत आहेत. जनता गद्दारीला क्षमा करत नाही. गद्दारी स्वीकारायला जनता तयार नाही, अशा शब्दांत शरद पवार गटानं 'एक्स' हँडलवरून टीका केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • खेडकर कुटुंब पुण्यातून फरार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pooja Khedkar  Family : पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पूजा खेडकर कुटुंबाचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manorama Khedkar : पूजा खेडकर कुटुंबाचे पंकजा मुंडेंशी (Pankaja Munde) राजकीय संबंध असल्याची सूत्रांची माहिती....मनोरमा खेडकरांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची मदत?...3 ऑक्टोबर 2023ला 12 लाखांची मदत केल्याचा उल्लेख?.. पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांचे पंकजा मुंडेंच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध?... पंकजा मुंडे लोकसभा किंवा राज्यसभेची...उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकरांनी नगरमधल्या मोहोटा देवीला साकडं घातलं असल्याचीही सूत्रांची माहिती...दिलीप खेडकरांचे भाऊ माणिक खेडकर पाथर्डीतील भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेत

     

  • अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

     

    Ajit Pawar : 'झी 24 तास'वर आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय...अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे...छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना-सूत्र...भाजपची नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती

  • पुणेकरांनो काळजी घ्या ! झिका रुग्णांची संख्या वाढली

     

    Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसने डोकं वर काढलंय...एकट्या पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर गेलीय. त्यामुळे पुणेकरांना झिका हळूहळू घेरतोय, असं चित्र दिसतंय. राज्यात 25 रुग्णांची नोंद झालीये. तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही झिकाचा शिरकाव झालाय. दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय. रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. मात्र अद्याप लहान मुलांना याचा धोका नाहीये. मात्र गर्भवती स्त्रियांना झिकाचा धोका अधिक आहे. याने बाळाचा मेंदू लहान होण्याची शक्यताय. तसंच मुदतपूर्व प्रसुती देखील होऊ शकते.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भुजबळ-पवार भेटीचं कारण गुलदस्त्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांची भेटीला पोहोचलेयत...मात्र, भुजबळ-पवारांच्या भेटीचं कारण अस्पष्ट आहे...या भेटीमुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलंय...ही भेट नक्की कशासाठी आहे हे कळू शकलेलं नाहीये...कालच भुजबळांनी अजित पवारांच्या मेळाव्यातून पवारांवर टीका केली होती...आरक्षण बैठकीला विरोधकांना पवारांचा फोन आल्याने ते बैठकीला आले नाहीत असा गंभीर आरोप भुजबळांनी केला होता...त्यानंतर आजच भुजबळ पवारांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यायत...

     

  • निकाल विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची उद्धव ठाकरेंची धमकी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahavikas Aghadi : विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगलंय...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेते दोन गट पडले होते...त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • IAS अधिकारी पूजा खेडकरचं दिव्यांग, ओबीसी प्रमाणपत्र तपासणार?

     

    Pooja Khedkar Case : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आलीय...पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यताय...यासोबतच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र देणा-या डॉक्टरांचीही चौकशी होणाराय...पीएमओ कार्यालयाने पुणे जिल्हाधिका-यांकडून हा अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

  • राज्यातील वारकऱ्यांसाठी खूशखबर ! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Warkari Pension : पारी वारी करणा-या वारक-यांना पेन्शन मिळणार आहे...राज्यातील कीर्तनकार आणि वारक-यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय...परंपरेने महिन्याची पायी वारी करणा-या वारक-यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे...राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती...या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरात असणार आहे...महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल...या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत...कल्याणमध्ये गोरखपूर एक्स्प्रेसच्या ब्रेक लायनरला आग...ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील घटना

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • रत्नागिरीत तरुण धरणाच्या पाण्यात गेला वाहून

     

    Sheldi Dam : खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून तरुण वाहून गेलाय. जयेश आंब्रे असं वाहून गेलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मित्रांच्या डोळ्यांदेखतच हा तरुण वाहून गेला. मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांना काहीही करता आलं नाही. वाहून गेलेल्या तरुणाला शोधण्याचं काम सुरुय. 

  • रत्नागिरी, रायगडमधील सर्व कॉलेज, शाळांना आज सुट्टी 

    Colleges, schools in Ratnagiri, Raigad have holiday today : रत्नागिरीत रेड, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट...अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाचा निर्णय... रत्नागिरीतील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर...रायगडमधील 3 तालुक्यात शाळा, कॉलेजेसना सुट्टी...महाड, माणगाव आणि पोलादपूर या तीन तालुक्यात शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • रत्नागिरीत रेड, रायगडमध्ये पावसाचा आज ऑरेंज अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Rain Alert : राज्यातील 10 जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जाही करण्यात आलाय...तर रत्नागिरीत रेड अलर्ट जारी केलाय...अतिवृष्टीची शक्यता असल्याने रत्नागिरीत शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आलीय...तर मुंबई, ठाण्यात आज यलो अलर्ट जारी करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link