Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार ?
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
'ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमध्ये कडू एक नंबर', रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप
Ravi Rana vs Bacchu Kadu : निवडणूक संपताच राणा विरुद्ध कडू वाद पुन्हा पेटलाय. 'बच्चू कडू महाराष्ट्रात तोडी, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमध्ये एक नंबर आहेत. 'ज्याच्या ताटात ते खातात त्याच्याच पाठीत ते खंजीर खुपसतात, ही अचलपूरच्या आमदाराची ओळख आहे. जो चेहरा आपल्याला दिसतो तो हा चेहरा नाही'... असं म्हणत राणांनी बच्चू कडुंवर हल्लाबोल केलाय.. आमदार रवी राणांनी याआधीही बच्चू कडूंवर खोके घेऊन सरकारमध्ये सामील झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर राणांनी दिलगिरी व्यक्त केली होती मात्र आता पुन्हा राणांनी कडूंविरोधात वक्तव्य केलंय. तर राणा दाम्पत्य 2 वर्षापासून सातत्यानं आरोप करत आहे. त्यांच्या आरोपांना आता कोर्टातून उत्तर देणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय.
'EVMमध्ये फेरफार करणं शक्य', सॅम पित्रोदा यांचा दावा
Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅकिंग वादात इलॉन मस्क पाठोपाठ आता आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनीही उडी घेतलीय.. ईव्हीएममध्ये फेरफार करणं शक्य आहे, असा दावा त्यांनी केलाय.. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
अमोल कीर्तिकर कोर्टात दाद मागणार
Amol Kirtikar : निवडणूक आयोगाने पुर्नमोजणी करायला हवी होती असं मत ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मांडलंय. आम्ही केलेली व्हिडीओ फुटेजची मागणी आयोगाने 9 दिवसानंतर नाकारली. त्यांनी आम्हाला फुटेज द्यायला हवं होतं. एक उमेदवार म्हणून तो आपला अधिकार असल्याचं कीर्तीकर म्हणाले. तसंच मतदान कक्षात मोबाईल फोनचा वापर झाल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढणार
Priyanka Gandhi : प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. राहुल गांधी हे वायनाड तसंच रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.. मात्र राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता राहुल गांधींऐवजी वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत..
राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती
Police Recruitment : राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार पदं रिक्त आहेत. त्यासाठी पोलीस भरती होणार आहे. यामध्ये अठराशे पदांची कारागृह भरतीही होणार आहे. विशेष म्हणजे 17 हजार पदांसाठी 17 लाखांहून जास्त अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा होईल. उमेदवाराला 2 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येईल. मात्र 2 ठिकाणी तो अर्ज करु शकणार नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार?
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरु झालीय. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय.. भुजबळांना लोकसभा तसंच राज्यसभेला डावलल्यामुळे ओबीसींमध्ये नाराजी दिसून येतेय. तसंच सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला.. सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलीय.. छगन भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.. तेव्हा येत्या काळात छगन भुजबळांचं नाराजी नाट्य घडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय....
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'लोकसभेतील घडामोडी विसरा, विधानसभेसाठी एकत्र येऊ', सतेज पाटलांचं आवाहन
Satej Patil : लोकसभेत झालेल्या घडामोडी विसरा, विधानसभेसाठी एकत्र या असं आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केलंय. सांगलीतील मविआ नेत्यांच्या वादावर त्यांनी भाष्य केलंय. विश्वजीत कदम, जयंत पाटलांचा गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'उ. पश्चिम मुंबईच्या निकालात विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झाला असून, निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस ठाण्यात काय डील करत होते?...ते 4 दिवस पोलीस स्टेशनला का चकरा मारत होते...असा सवाल उपस्थित करत वनराई पोलीस ठाण्याचे CCTV जप्त करुन चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भूपेंद्र यादव महाराष्ट्रचे भाजप प्रभारी
Bhupendra Yadav : लोकसभेत भाजपला अपेक्षित यश न मिळालेल्या भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केलीय. भाजपनं महाराष्ट्रासाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केलीय. भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी असतील तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. राजस्थानमधील अल्वर मतदारसंघाचे खासदार असलेले भूपेंद्र यादव सध्या केंद्रात कामगार आणि पर्यावरण मंत्री आहेत. तसंच 2010 मध्ये नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना यादव यांची पहिल्यांदा भाजपचे सचिव म्हणून नेमणूक झाली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीसांवर गुन्हा दाखल
MLA Vilas Potnis : रवींद्र वायकर यांच्या मेहुण्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल...विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल....मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांनी एकत्र यावं', मंत्री गुलाबराव पाटील यांची इच्छा
Gulabrao Patil : जळगावमधील महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं हीचं आमची सदिच्छा असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलय. जर रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी प्रयत्न करावेत. असही ते म्हणालेत. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसतं त्याचपद्धतीनं जळगावमध्येही एकीकरण व्हावं अशी इच्छा गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
दिल्लीत भाजप कोअर कमिटीची उद्या बैठक
BJP : दिल्लीत उद्या भाजप कोअर कमिटीची बैठक होणारेय...ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलंय....महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीला जाणार...भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत...देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरही उद्या चर्चा होण्याची शक्यताय...
'उत्तर पश्चिम मुंबईचा निकाल संशयास्पद',अनिल परबांचा निवडणूक आयोगावर आरोप
Anil Parab : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद असून, निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेला हरताळ फासला गेल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय...19व्या फेरीनंतर पारदर्शकता नव्हती असं परबांनी म्हटलंय...
भाजपच मोठा भाऊ - संजय निरुपम
Sanjay Nirupam : आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र भाजपच मोठा भाऊ असा दावा शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केलाय...दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमचा स्ट्राईक रेट चांगला असून, आम्हीच मोठा भाऊ असं म्हटलं होतं...त्यामुळे शिंदे गटात दोन्ही नेत्यांमध्ये मतमतांतर दिसून येतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Sharad Pawar Letter To Eknath Shinde : शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय...दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती पवारांनी केलीय...दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता आहे...यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मृद, जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावं...बैठकीला संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी पवारांनी केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
रत्नागिरीत ढगफुटीसारखा पाऊस
Ratnagiri Rain : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. तिवरे गावात धरणखोरे परिसरात हा तुफान पाऊस झालाय. या पावसामुळे आजुबाजूचे नदी, नाले तुडुंब भरून वाहतायेत. सलग 2 तास हा तुफान पाऊस झाला. दहा वर्षांपूर्वी तिवरे इथं भेंदवाडीतील मातीचं धरण फुटलं होतं. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर इथले ग्रामस्थ भीतीच्याछायेखाली जीव मुठीत घेऊन राहतात.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
म्हाडाची बंपर लॉटरी
Mhada Home : राज्यातील सर्वसामान्यांना आता म्हाडाचे घर मिळू शकणारेय. म्हाडा तब्बल 13 हजार घरं बांधणार आहे. यात मुंबई, पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक आणि अमरावतीचा समावेश आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात म्हाडानं राज्यभरात 13 हजार 46 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी म्हाडा मंडळ 8 हजार 310 कोटी खर्च करणारेय. मुंबईत 3 हजार 660, कोकण मंडळात 5 हजार 122, पुण्यात 1 हजार 506 सदनिकांची उभारणी करण्यात येणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणणार
Shivaji Maharaj Waghnakh : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी... छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघनखं जुलै महिन्यात साता-यात आणली जाणारेत. तब्बल दहा महिने ही वाघनखं साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणारेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा कामाला लागलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
देवाच्या दारात भक्तांशी मुजोरी
Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेताना वयोवृद्धांना ढकलून सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केलाय...नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाने हा आरोप केलाय...आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना सुरक्षारक्षकांनी ढकललं आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप वकील असलेल्या सूर्यवंशींनी केलाय...आईला ढकलून दिल्यानं ती पाय-यांवरून खाली कोसळून जखमी झाल्याचा आरोप केलाय...त्यानंतर त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये 3 तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही तसंच मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही असा आरोप सूर्यवंशींनी केलाय. अखेर घटना घडल्यानंतर आमदारांनी दूरध्वनी केल्यानं सात तासांनी केवळ तक्रार दाखल करण्यात आलीय...त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वीकेंड निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदिराच्या गाभा-यामध्ये पिंडीचं दर्शन घेताना भाविकांना केवळ काही क्षण दर्शन मिळतं. नंतर तिथले सुरक्षा रक्षक भाविकांना मुजोरी करत ढकलून देत असल्याचा आरोप होतोय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
West Bangal Express Accident : कांचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झालाय...या एक्स्प्रेसला मालगाडीने पाठीमागून येऊन जोरदार धडक दिलीय...या धडकेनंतर कांचनंजगा एक्स्प्रेस रुळावरून घसरलीय..पश्चिम बंगालच्या निजबारी स्टेशनजवळ हा अपघात झालाय. . या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 20-25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ससून रुग्णालयाचं कामकाज पारदर्शक होणार
Pune Sasoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयाचं कामकाज आता पारदर्शक होणारेय. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर ससून प्रशासनाला ही जाग आलीय. रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर आपत्कालीन विभागात बदल करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती. या समितीनं अहवाल सादर केला. तर पारदर्शक कामकाजाची शिफारस केलीय. याची लवकरच अंमलबजावणी केली जाणारेय. तर अनेक बदल प्रस्तावित असणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Aashadhi Wari 2024 : शासनाने प्रत्येक दिंडीला 20 हजार मदतीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रशांत मोरे यांनी केलीय. शासनाच्या वीस हजार मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात असल्याचं मोरे यांनी म्हटलंय...20 हजाराचा निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोयी-सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी प्रशांत मोरे यांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
NCERTच्या अभ्यासक्रमात बदल
NCERT : बाबरी मशीद, भगवान राम, श्री राम, रथयात्रा, कारसेवा आणि विध्वंसानंतरची हिंसा याविषयीची माहिती NCERT पुस्तकातून काढून टाकण्यात आलीय. देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थेनं 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकलेत. त्याचबरोबर पुस्तकात बाबरी मशीद या नावाऐवजी तीन घुमट रचना आणि अयोध्या वाद या नावानं अयोध्या विषय शिकवला जाणारेय. 4 पानांचा विषयही 2 पानांचा करण्यात आलाय. बाबरी मशीद विध्वंस किंवा त्यानंतर झालेल्या जातीय हिंसाचाराचा संदर्भ का काढला गेला? या प्रश्नावर एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी उत्तर दिलंय. त्यांनी शाळेत दंगली का शिकवायच्या? आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत, हिंसक आणि निराशाजनक लोक नाही असं म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सामना अग्रलेखातून नारायण राणेंवर प्रहार
Saamana On Narayan Rane : सामनामधून राऊतांनी राणेंवर प्रहार केलाय...शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही...एखाद्या पराभवाने खचणारी, मागे हटणारी शिवसेना नाही...राणेंसह त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली...चौथ्यांदाही पराभव होईल...राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे...नव्या मंत्रिमंडळात राणेंना स्थान न मिळाल्याने त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्यायत...त्यातूनच ते 'शिवसेना संपली, संपवली' अशी भाषा बोलू लागलेत अशी टीका सामनातून करण्यात आलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हत्येनंतर आरोपींची हॉटेलमध्ये पार्टी
Nagpur : नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींचे पार्टी करतानाचे फोटो झी 24 तासच्या हाती लागलेयत...पुट्टेवारांची हत्या केल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये जाऊन दारूची पार्टी केली...त्याचे फोटो आता समोर आलेयत....त्यामुळे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते हे यातून स्पष्ट होतंय...या आरोपींनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेतला...नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांनी हत्येनंतर पार्टी केली...त्या वेळचे काही एक्सक्लुसिव्ह फोटो झी 24 तासच्या हाती लागलेयत...एवढेच नाही तर या नीरज निमजे, सचिन धार्मिक आणि या प्रकरणातला तिसरा आरोपी सार्थक बागडे हे तिघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर मनालीला जाणार होते... तिथेही त्यांच्या पार्टीची सोयही करण्यात आली होती...मात्र, हे तिघे मनालीला पळून जातील त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'मेट्रो 4' कारशेडच्या जागेबाबत अद्याप प्रतीक्षाच
Metro 4 Car Shade : मेट्रो 4 साठी कारशेडच्या जागेबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी अद्यापही एमएमआरडीएला मिळालेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादामुळे जागेसाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागतेय. मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे मात्र कारशेडचा पत्ताच नाही. 3 महिन्यात ही जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला मिळण्याची शक्यताय. जागा ताब्यात आल्यावर कारशेड बांधायला दीड ते 2 वर्ष लागणार असल्यामुळे मेट्रो 4 लांबणीवर गेलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे?
Government Employee Age : राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचा-यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करावं, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचा-यांकडून करण्यात येतेय. या मागणीसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकारसोबत बैठक झाली. त्यामध्ये निवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती महासंघाकडून देण्यात आली. केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचा-यांचा महागाई भत्ता 46 वरून 50 टक्के केलाय. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केलाय. तो मंजूर करावा अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आलीय. यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसंच सरकारी नोक-यांची 3 लाख रिक्त पदं भरावीत, अशी मागणीही करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग सुरू
Amarnath Yatra Helicoptar Booking Start : अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेची ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आलीय. यात्रेची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलीय. 29 जूनपासून यात्रेला सुरुवात होणारेय. अमरनाथ यात्रेला जाणा-या भाविकांच्या हेलिकॉप्टरसाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आलेत. एक नीलकंठ-पंजतरणी मार्ग तर दुसरा पहलगाम-पंजतरणी मार्ग असणारेय. 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी अमरनाथ यात्रा संपणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
कोकणपासून विदर्भात मान्सूनची उघडीप
Monsoon : राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी झालाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढलाय. कमाल तापमान सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढलंय. राज्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसवर गेलंय. 20 जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल असा अंदाज हवामान विभागानंवर्तवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक
Chagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावलीय...आज सकाळी 11 वाजता वांद्रेतल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथे ही बैठक होणार आहे...भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर भुजबळ आजच्या बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. तसंच जरांगे, मराठा, ओबीसी आरक्षण या विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
आदित्य ठाकरेंची आज पत्रकार परिषद
Mumbai Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणारेत. दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. यावेळी ते ईव्हीएमबाबत बोलण्याची शक्यताय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षानं केलाय. मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आता याप्रकरणी ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -