Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणणार

Sat, 29 Jun 2024-8:48 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • महाराष्ट्र भाजपाची दोन दिवसीय पुण्यात बैठक.बैठकीला गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता.बैठकीसाठी भाजपच्या चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण.13 जुलै रोजी प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार तर 14 जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक.

  • अहमदनगर: माजी आमदार भीमराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी..

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून वडेट्टीवार हक्कभंग आणणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत... याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदन दिले... निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे लोकप्रिय घोषणा करणं हक्कभंग असल्याचं ते म्हणालेत.

     

  • 'ठाकरे सरकार पाडल्याचा शिंदे गटाच्या आमदारांना पश्चाताप', भास्कर जाधवांचा टोला

     

    Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून मविआला डिवचण्याचा विरोधकांनी प्रयत्न केलाय...सत्ताधा-यांकडून 'किस्सा कुर्सी का' अशी पोस्टरबाजी करण्यात आलीय...या पोस्टरबाजीवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला टोला लगावलाय...ठाकरे सरकार पाडल्याचा शिंदे गटाच्या आमदारांना पश्चाताप झालाय त्यामुळे किस्सा खुर्ची का असं शिंदे गटाचे आमदार म्हणतायत असं भास्कर जाधवांनी म्हटलंय...तर उद्धव ठाकरेंना आपली खुर्ची राखता आली नाही...एक खुर्ची 12 भानगडी सुरू असल्याचा टोला गोगावलेंनी लगावलाय...

  • 'अंधेरी आरटीओत भ्रष्टाचार', विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar : अंधेरी आरटीओत 1 लाख 4 हजार लायसन्स दिली गेली...त्यापैकी 76 हजार लायसन्स ही अवैध वाहनांची टेस्ट घेवून दिलीयत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय...एका दुचाकीवर चारचाकी,क्रेन,बसचे लायसन दिले गेले आहेत. क्रेनचे लायसन हे बाईकवर कसे काय होवू शकते. केवळ पैसे देवून लायसन दिली जातायत...125 कोटींचा भ्रष्टाचार एका आरटीओ कार्यालयात झालाय.असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केलाय...तर याप्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिलेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

     

    Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेची घोषणा केलीय. आर्थिक परिस्थिती कमकूवत असणा-या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून तिर्थयात्रेवर जाऊन देवदर्शनचा लाभ घेता येणारेय. आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीत हा तिर्थयात्रा सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली.

  • राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक?

     

    Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यताय...राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रानं दिली. यासोबतच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. तर प्रथमच महिला अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करून ,सरकार महिलांचा सन्मान करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. 

  • 'शरद पवारांचे अनेक आमदार संपर्कात', आमदार अमोल मिटकरींचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Mitkari : शरद पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात आहेत, असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केलाय...आमदार देवगिरी बंगल्यावर येऊन गेल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • बीडचे शिंदे गटाचे नेते कुंडलिक खांडेंना अटक, उपजिल्हाप्रमुख मारहाण प्रकरण भोवलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kundalik Khande Arrested : बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना अखेर अटक करण्यात आलीय. 2 महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं पाटोदा परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऑडिओ व्हायरल प्रकरणी खांडे चर्चेत होते.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • बारामतीतील गोळीबारातील रणजित निंबाळकरचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Firing Update : बारामतीतल्या निंबूत गावात झालेल्या गोळीबारातील तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.. रणजित निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे.. शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शाहजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केलीये.. तर गोळीबारानंतर फरार झालेल्या गौतम काकडेचा पोलीस शोध घेत आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • 'सामूहिक नेतृत्त्व हेच आमचं सूत्र', शरद पवारांनी राऊतांचे टोचले कान 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरुन पवारांनी संजय राऊतांचे कान टोचलेत.. सामूहिक नेतृत्त्व हेच आमचं सूत्र आहे.. आमची तीन पक्षांची आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याच्या बातम्यांना पूर्णविराम दिलाय.. दुसरीकडे मात्र खासदार संजय राऊत स्वताच्या विधानार ठाम आहेत.. कोणतंही सरकार बिनचेह-याचं असू शकत नाही असं राऊतांनी पुन्हा म्हटलंय.. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन आधी छोटे मोठे नेते एकमेकांविरोधात बोलत होते...मात्र, आता मविआतीच मोठे नेतेही एकमेकांविरोधात बोलू लागलेयत.. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन मविआत शीतयुद्ध सुरु आहे का अशा चर्चा सुरु झाल्यात..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसणार?

     

    K. P. Patil met Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता...माजी आमदार के.पी.पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलीय...ही सदिच्छा भेट असून, मी माझी राजकीय विचारधारा बदलली नाही असं के पी पाटील यांनी म्हटलंय...मात्र, पवारांच्या भेटीनं के पी पाटील पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे...

  • मुंबईतील  म्हाडाच्या घरांसाठी मुहूर्त ठरला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mhada Lottery : मुंबईतील म्हाडाच्या 1 हजार 900 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळालाय.. जुलै महिन्यात या घरांसाटी जाहिरात निघणारेय. मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरं सर्व उत्पन्न गटासाठी असणारेय. या घरांसाठी जुलैमध्ये लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होईल तर ऑगस्ट महिन्यात सोडत काढली जाणारेय. म्हाडानं पहिल्यांदाच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर इथं तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी केलीय. या घरांच्या किमती काय असणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पुण्यात सलग चौथ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Mahapalika Action : पुण्यात सलग चौथ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलीये.. पुणे महानगर पालिकेकडून अनधिकृत पब्ज आणि बारवर धडक कारवाई करण्यात आली.. या कारवाई दरम्यान हडपसर, उंड्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील पब्स आणि बार जमिनदोस्त करण्यात आले.. दिवसभरात तब्बल 13 हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  •  पुण्यात पुन्हा अल्पवयीन टँकरचालकाने तिघांना उडवलं

     

    Pune Accident : पुण्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलाने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय...पुण्याच्या वानवडीमध्ये भरधाव टँकरचा अपघात झालाय...धक्कादायक बाब म्हणजे 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता...सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि एका दुचाकीस्वार महिलेला टँकरने धडक दिली...यात काही मुलं आणि महिला जखमी झाल्यायत...हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडलाय...नागरिकांनी हा टँकर अडवून चालकाला पकडलंय...दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या...स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढलं...मात्र, घडलेल्या घटनेनं पुण्यात चाललंय काय? असाच प्रश्न उपस्थित होतोय...

  • भाजपची आज चिंतन बैठक

     

    BJP : भाजप प्रदेश कार्यालयात आज दिवसभर चिंतन बैठक...सकाळी १० वाजता भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीच्या बैठकीला होणार सुरुवात... प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव घेणार आढावा....भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह कोअर कमिटीचे इतर नेते राहणार उपस्थित....विधान परिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व

  • आज भारत वि. दक्षिण आफ्रिका सामना

     

    India vs South Africa : आज टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना होणाराय...भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी लढत होणाराय...यावेळी दक्षिण आफ्रिकेला नमवून दुस-यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची टीम इंडियाला संधी आहे...त्यामुळे रोहित सेना सज्ज झालीय...दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठलीय...तर भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत होत आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया 11 वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

  • समृद्धी महामार्गावर 2 कारची भीषण धडक, 7 जण ठार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Samruddhi Expressway Accident : जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय...या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झालाय...तर घटनेत 7 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेत...यातील गंभीर असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं असून 4 जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...जालन्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात झालाय...नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या अर्टीगा कारला विरुद्ध दिशेने डिझेल भरून येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली...स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर दोन्ही कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती मिळतेय...या घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली...आणि क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढल्या...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link