कसं आहे श्रद्धा कपूरचे जुहूमधील घर? 1987 मध्ये 7 लाख किंमत, 2024 मधील किंमत पाहून...

15 ऑगस्ट रोजी श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

| Aug 22, 2024, 14:09 PM IST
1/6

भव्य अपार्टमेंट

दरम्यान, आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरच्या भव्य अपार्टमेंटची झलक दाखवणार आहोत. सध्या  श्रद्धा कपूर तिच्या आई-वडील यांच्यासोबत राहते. श्रद्धा कपूरचे जुहू येथील घर सी-फेसिंग आहे. 

2/6

3 BHK अपार्टमेंट

रिपोर्टनुसार, या 3 BHK अपार्टमेंट शक्ती कपूर यांनी 1987 मध्ये 7 लाख रुपयांना विकत घेतला होता. 

3/6

60 कोटी किंमत

गेल्या अनेक वर्षांत या सुंदर घराची किंमत 60 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. या आलिशान घरात लाकडी फर्निचरसोबतच बाग देखील आहे. 

4/6

समुद्राचे विहंगम दृश्य

या घरामध्ये सुंदर झाडे आणि सजवलेले टेरेस खूपच सुंदर दिसते. यामुळे अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. घराच्या एका कोपऱ्यात पुस्तकांचा संग्रह देखील आहे.

5/6

आकर्षक गोष्टी

श्रद्धा आणि तिच्या कुटुंबीयांनी त्यांचे घर चमकदार रंगांनी सजवले आहे. या घरात एक छोटे मंदिर देखील आहे. वेगवेगळ्या आकर्षक गोष्टींनी घर सजवले आहे. 

6/6

फोटो शेअर

श्रद्धा कपूर नेहमी तिचे घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सतत ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असते.