Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 02 Nov 2024-3:52 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis Security Increased : केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आलीये...फोर्स वनचे 12 जवान फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत...नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानासह सार्वजनिक कार्यक्रमातही फडणवीसांच्या भोवती आता फोर्स वन कमांडोंच्या सुरक्षेचं कड असणारे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  6 नोव्हेंबरपासून देवेंद्र फडणवीस प्रचाराची सुरुवात करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत.. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ 6 नोव्हेंबरला फडणवीस यांची जत येथे जाहीर सभा होणार आहे. जत येथे सकाळी दहा वाजता पडळकर यांच्या समर्थनार्थ फडणवीस जहीर सभा घेणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • खासदार अरविंद सावंतांकडून दिलगिरी व्यक्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Arvind Sawant : शायना एनसींबाबत केलेल्या विधानावरून आता खासदार अरविंद सावंतांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केलीये. राजकीय कारकिर्दीत कधीच महिलेचा अवमान केला नाही. जर कोणच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील दिलगिरी व्यक्त करतो असं अरविंद सावंत म्हणालेत. शायना एनसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शायना एनसी यांनी अरविंद सावंतांविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे सौदे पार

     

    Sangali Halad Saude : सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे सौदे पार पडले... दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या सौद्यात हळदीला 17 हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. गेल्या अनेक वर्षांपासून पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याची परंपरा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींच्या हस्ते या सौद्याचा शुभारंभ करण्यात आला.

  • राज्यात सत्तांतर झालं पाहिजे - शरद पवार

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. उत्पादनाच्या बाबतीत राज्याला धक्का बसला. त्यामुळं राज्याला पूर्वस्थितीत आणणा-यांना संधी द्या, असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलंय. बारामतीत पवार कुटुंबीयांनी पाडवा साजरा केला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होतीय. यावेळी त्यांनी बोलताना अजित पवारांवरही निशाणा साधलाय. वेगळा पाडवा केला, पण वेगळंपण दिसलं नाही. मात्र, काही नागरिकांना दोन ठिकाणी जावं लागलं त्यामुळे अस्वस्थ आहे, असं पवार म्हणाले.

  • बारामतीत कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, सुप्रिया सुळेंचा बॅनरवर भावी मुख्यमंत्री उल्लेख

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Supriya Sule : शरद पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीत दाखल झालेत. खेड शिवापूरचेही कार्यकर्ते बारामतीत दाखल झालेत. मात्र, चर्चा सुरू आहे ती त्यांनी सोबत  आणलेल्या बॅनरची. सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • माहीम मतदारसंघावरुन शिवसेना आणि मनसे आमनेसामने

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आलीये. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून आता मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी टीका केलीये. मुख्यमंत्री संकुचित मनाचे आहेत. परतफेड करताना हात आखडता घेतला अशी टीका किल्लेदारांनी केलीये. तर एकनाथ शिंदे कपटी असल्याचा हल्लाबोलही यशवंत किल्लेदारांनी केलाय. तर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी किल्लेदारांना प्रत्युत्तर दिलंय.

  • अजित पवारांकडे लाभार्थ्यांची गर्दी - रोहित पवार

     

    Baramati Rohit Pawar : अजित पवारांकडे दिवाळी पाडव्यासाठी आलेली गर्दी म्हणजे सर्व लाभार्थी आहेत अशी टीका रोहित पवारांनी कोलीय. तर शरद पवारांकडे सर्व सामान्य लोकांची गर्दी आहे. ⁠जर आता अजित पवारांना घर फुटण्याचं दुःख होतय मात्र लोकसभेला त्यांनीच याची सुरूवात केलीय.  

  • गोपाळ शेट्टी बोरिवलीतून निवडणूक लढवण्यावर ठाम

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र  फडणवीसांच्या भेटीनंतरही गोपाळ शेट्टी बोरिवलीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत ... सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत दीड तास चर्चा केलीय..  मात्र चर्चेनंतरही गोपाळ शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम..

  • सदा सरवणकरांची माहीम मतदारसंघातून माघार नाहीच

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी माहीममधून निवडणूक लढणार असल्याचं सरवणकर म्हणालेत... काहीही झालं तरीही माहीममधून माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार सरवणकरांनी केलाय.. 

  • मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Shivaji Park : दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवण्यात आलेत.. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने काल घेतली.. त्यानंतर एका रात्रीत शिवाजी पार्क परिसरातले बॅनर्स आणि कंदील काढण्यात मनसेकडून काढण्यात आले... या दीपोत्सवात लावण्यात आलेल्या कंदीलवर मनसे पक्षाचे इंजिन हे चिन्ह होत... 

    बातमी पाहा - शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

  • अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

     

    Sambhajinagar Abdul Sattar : शिवसेना नेते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताये. सत्तारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलीय. या तक्रारीची निवडणूक आयोगानं दाखल घेतलीय. निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोडचे निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात पुढे काय कारवाई होणारेय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

  • विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब होणार आहे.. कारण शिटी चिन्ह हे संयुक्त जनता दलासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्यात. त्यामुळे निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह घेता येणार नाहीये.. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना यंदाच्या निवडणुकीत वेगळं चिन्ह घ्यावं लागणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • माहीमच्या जागेवरुन एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहीमच्या जागेवरून मोठं विधान केलंय.. आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय... आमची राज ठाकरेंसोबत विधादनसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती.. असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय.. आमच्या माहीममध्ये विद्यमान आमदार आहे.. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.. कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ देणार नसल्याचं शिंदे म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सिंचन घोटाळ्यावरुन भाजपनं अजित पवारांना ब्लॅक मेल केलं - जयंत पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil : सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना गेल्या 10 वर्षांपासून भाजप ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केलाय.. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांनी दावा केलाय.. सिंचना घोटाळ्याचा वापर राष्ट्रवादी फोडण्यासाठी केल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केलाय..  देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांनी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर आरोप केलेत.. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आर. आर पाटलांवर खापर फोडण्यचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेचं नुकसान झालं, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमदारांची कामं होत नव्हती त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलो, शिंदे म्हणाले.

     

  • अंबरनाथमध्ये राजेश वानखेडेंना मदत करणार - राजू पाटील

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडेंना मित्र म्हणून नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटलांनी जाहीर केलीय. अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नाही, तसंच राजसाहेबांनी अद्याप काहीही स्पष्ट आदेश आम्हाला दिले नाहीत, असं पाटील म्हणाले. राजेश वानखेडे माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार, पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं, ते आम्ही पक्ष म्हणून ठरवू, असं राजू पाटील म्हणालेत.

  • पुण्यात 31 ठिकाणी आगीच्या घटना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Fire : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी  ३१ ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात. संध्याकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटना घडल्याचं समोर आलंय.. काही ठिकाणी कचऱ्याला आग लागली तर काही ठिकाणी झाडांना आग लागल्याच्या घटना समोर आल्यात..अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या आहेत... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link