शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय. 

नेहा चौधरी | Updated: Nov 2, 2024, 11:15 AM IST
शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

देशभरात दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी प्रचाराला लागले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष जोरदार मैदानात उतरले आहेत. दिवाळी म्हटलं की, मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही शिवाजीपार्क कंदील आणि रोषणाईने सजलं असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. 

Add Zee News as a Preferred Source

मनसेकडून लावण्यात आलेल्या कंदीलावर शिवसेना ठाकरे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा वाद पुन्हा एकदा रंगला आहे. या वादात मनसेने मोठं पाऊल उचलंय.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने काल घेतली. त्यानंतर एका रात्रीत शिवाजी पार्क परिसरातले बॅनर्स आणि कंदील काढण्यात मनसेकडून काढण्यात आले. या दीपोत्सवात लावण्यात आलेल्या कंदीलवर मनसे पक्षाचे इंजिन हे चिन्ह होतं. ज्यामुळे मनसेकडून आचारसंहितचे उल्लघंन केल्याचा आरोप झाला आहे. 

'उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हिंदू सणांना विरोध'

दरम्यान, ठाकरे गटाने दिपोत्सवावर आक्षेप घेतल्यानंतर  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. जर हिरवे कंदिल लावले असते, तर विरोध केला असता का? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला असता का? भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका हिंदू सण विरोधी असल्याचे संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केलाय. 

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More