Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
वरळीतील कोळीवाड्यांवर प्रत्येक बिल्डरांचं लक्ष -राज ठाकरे
Raj Thackeray : वरळीतील कोळीवाड्यांवर प्रत्येक बिल्डरांचं लक्ष असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलाय.. तर कोळी बांधव हे मुंबईचे मालक आहेत..त्यामुळे तुमचा शत्रू समुद्रातून नाही, जमिनीवरून येणार, याकडे कोळी बांधवांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय.. ते वरळी विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली
Laxman Hake : नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली... कंधार तालुक्यातील बचोटीमधील घटना...गाडी अडवून मराठा आंदोलकांची घोषणाबाजी....चंद्रसेन पाटलांच्या प्रचारासाठी हाके नांदेडमध्ये
मुख्यमंत्री शिंदे निवडणूक लढवणार नव्हते- नरेश म्हस्के
Naresh Mhaske on CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार नव्हते, असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ देण्यासाठी ते निवडणुकीला सामोरे जाणार नव्हेत. मात्र, त्यांना विनंती केली आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री शिंदेंनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज भरल्याचं म्हस्के म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'माझ्या लफड्यात पडू नका, नादी लागू नका', जरांगेंचा राज ठाकरेंना इशारा
Manoj Jarange Patil on Raj Thackeray : तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय.. उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता.. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय.
भाजपची हवा काढण्याची वेळ आली- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on BJP : भाजपला आमदार दिले, खासदार दिले वरची सत्ता दिली, खालची सत्ता दिली, त्यांच्या डोक्यात हवा गेली आता ही हवा काढायची वेळ आल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत..अमरावतीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ठाकरे बंधूंमध्ये शिवाजी पार्कसाठी चढाओढ
Maharashtra Politics : 17 नोव्हेंबरला प्राचरसभेसाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) मिळण्यासाठी ठाकरे बंधुंमध्ये चुरस...शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 17 नोव्हेंबरच्या शेवटच्या प्रचारसभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी आग्रही...18 नोव्हेंबरला दुपारनंतर प्रचार बंद होत असल्याने 17 नोव्हेंबरला रात्री होणारी शेवटची प्रचार सभा असणारे...17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन असल्याने इतर कोणत्याही पक्षाला शिवाजी पार्क येथे सभा घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवण्याची शक्यता असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षानं म्हटलंय...यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
वरळीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
Worli Shivsena UBT : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला वरळीमध्ये मोठा धक्का बसलाय...शिवसेनेच्या वरळीतील पदाधिका-यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
निकालानंतर राजकीय समीकरणं बदलू शकतात- वळसे पाटील
Dilip Walse Patil : निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदलू शकतात, असं मोठं विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय. प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर खरं गणित जुळवले जातील. जर सरकार आलं नाही तर सरकार स्थापन करण्यासाठी काहींना गणितं जुळवावी लागतील. निवडणुकीच्या रिंगणात 6 पक्ष आहेत. त्यामुळे गणितं जुळवायला भरपूर वाव असल्याचं वळसे पाटील म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शिवसेना UBT पक्षाचा वचननामा लबाडाघरचं जेवण - आशिष शेलार
Ashish Shelar On Uddhav Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा म्हणजे लबाडा घरचं जेवण, असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. ठाकरेंनी 24 तासात स्वतःचं वेगळेपण दाखवण्यासाठी स्वतःचा वचननामा प्रकाशित केला. धारावी पुनर्विकासाबाबत तुमचं मत सुस्पष्ट आहे तर ते महाविकास आघाडीच्या पंचसूत्री जाहीरनाम्यात का नाही? असा सवाल शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. पुनर्विकासाबाबत उद्धव ठाकरे वैयक्तिक मत मांडत आहेत का? असंही शेलार म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
EVM हॅक करुन जिंकून देण्याचं आमिष देणारा गजाआड
Nashik : EVM हॅक करुन वसंत गीतेंना जिंकून देणा-या आरोपीला नाशिकमध्ये अटक करण्यात आलीये... भगवानसिंग चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे.. पमहाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयातील कर्मचा-याला चव्हाण यानं EVMहॅक करुन गीतेंना जिंकून देण्याचं आमिष दाखवलं होतं.. त्याबदल्यात 42 लाख रुपयांची मागणी केली होती.. यातील 5 लाख रुपये तात्काळ द्या उरलेले नंतर द्या अशी बतावणी केली होती.. प्रोग्रामिंगवाले ओळखीचे आहेत.. त्यामुळे पैसे न दिल्यास गीतेंना पराभूत करण्याचीही धमकी या आरोपीनं दिली... पोलिसांनी चार तासातच या आरोपीला अटक केली.. चव्हाण हा मुळचा राजस्थानचा असून गेल्या 15 दिवसांपासून म्हसरूळमध्ये एका मार्बलच्या दुकानात काम करत होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राहुल गांधी संविधानाचा अपमान करतात - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis On Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या संविधान सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय. राहुल गांधी दररोज संविधानाचा अपमान करतात, असा आरोप फडणवीसांनी केलाय. काल राहुल गांधींनी नागपुरात नौटंकी केली. मात्र ही जनता या नौटंकीला बळी पडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.
शिवसेना UBT पक्षाचा वचननामा प्रसिद्ध
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात आला.. उद्धव ठाकरे यांनी आज वचननामा जाहीर केला... ठाकरे गटाच्या वचननाम्यामध्ये महिला, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्याबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370वरुन राडा
Jammu Kashmir Vidhan Sabha Rada : जम्मू काश्मीर विधानसभेत आज पुन्हा कलम 370 वरुन राडा झालाय. इंजिनीयर रशीद यांचे भाऊ आणि आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर झळकावले. त्यानंतर विधानसभेत गोंधळ झाला. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मांनी यावर आक्षेप घेतला. काला सत्ताधारी पक्षाकडून कलम 370 पुन्हा कायम करण्यासंदर्भातील ठराव मांडण्यात आला होता. यावरून आज नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप आमदार आमनेसामने आलेत. भाजप आमदारांनी ठरावाची प्रत फाडून टाकली. यावेळी सभागृहात मोठा गोंधळ उडाला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र - पूनम महाजन
Poonam Mahajan : दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत त्यांच्या कन्या पूनम महाजन यांनी मोठा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र होतं आणि ते कधीतरी बाहेर येईलच असा दावा पूनम यांनी केलाय. महाजन यांच्या हत्येनंतर जवळजवळ दोन दशकांनंतर पहिल्यांदाच कुटुंबातील सदस्य सविस्तर पणे बोलल्या आहेत. महाजन यांच्या सख्ख्या भावाने 2006 मध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र आता पूनम महाजन यांनी हे केवळ पैशासाठी, किंवा मत्सरापोटी झालेलं कृत्य नसून, त्याच्या मागे एक मोठं षडयंत्र असल्याचं म्हटल्याने 18 वर्षानंतर देशातल्या या सगळ्यात high profile मर्डर केस मध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.
बातमी पाहा - 'प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी नाही, हे मोठं षडयंत्र'; पूनम महाजनांचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार नव्हते - नरेश म्हस्के
Naresh Mhaske On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार नव्हते, असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ देण्यासाठी ते निवडणुकीला सामोरे जाणार नव्हेत. मात्र, त्यांना विनंती केली आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री शिंदेंनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज भरल्याचं म्हस्केम्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून वर्षभरात तब्बल 25 वाघ बेपत्ता
Tiger Missing : सवाई माधोपूर येथील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातून वर्षभरात तब्बल 25 वाघ बेपत्ता झालेत.. वर्षभरात एवढ्या मोठ्या संख्येत वाघ बेपत्ता झाल्याची ही पहिलीच घटना आहे.. या बेपत्ता वाघांचा शोध घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीये. या प्रकरणाचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाणार आहे.. दरम्यान रणथंबोरमधून वाघ बेपत्ता होत असल्याने तज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केलीये..
पहिल्या मंत्रिमंडळात मंत्रिपद पाहिजे - रामदास आठवले
Ramdas Aathavle : रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनी महायुतीकडं सत्तेत वाटा मागितलंय. राज्यात सत्ता आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्रिपद पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी केलीय. विस्तारामध्ये मंत्रिपद देऊ, यावर विश्वास नासल्याचंही ते म्हणाले. सध्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. मतदानाला 14 दिवस शिल्लख आहेत. मात्र, मतदानापूर्वीच रामदास आठवलेंनी महायुतीकडं मंत्रिपदाची मागणी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सदाभाऊ खोतांकडून दिलगिरी व्यक्त
Sadabhau Khot : आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केल्यानतंर आता सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.. शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सदा भाऊ खोत यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.. माझ्या विधानामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं खोत म्हणालते..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
भाजपमध्ये ज्यांची चर्चा होते ते सीएम होत नाहीत - विनोद तावडे
Vinod Tawade : भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावाची चर्चा होते. ते कधीच मुख्यमंत्री होत नाही, असं विधान भाजप नेते विनोद तावडेंनी केलंय. मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्या नावाची चर्चा सुरूये, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी हे उत्तर दिलंय. जर नावाची चर्चा सुरू आहे, तर मुख्यमंत्री होणार नाही हे निश्चित आहे, असं तावडे म्हणाले. यावेळी त्यांनी भजनलाल शर्मा, मोहन यादव यांचंही उदाहरण दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सुनील तटकरेंच्या भरत गोगावलेंना कानपिचक्या
Sunil Tatkare On Bharat Gogawale : माझी ताकद नगण्य आहे, असं समजू नका, अशा शब्दांत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना कानपिचक्या दिल्यात. रायगडच्या गोरेगावमधील राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तटकरे आक्रमक झालेत. आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. माझ्या पक्षाला हात लावू नका, असा थेट इशारा तटकरेंनी गोगावलेंना दिलाय.
राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर
NCP Party Symbol : घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्याय प्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात 36 तासांत वर्तमानपत्रात द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले होते.. त्यापूर्वी दिलेल्या आदेशांमध्येही चिन्हासोबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश दिले होते.. कोर्टाच्या या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक वृत्तपत्रांमध्ये तशा आशयाची जाहिरात दिलीये.. या जाहिरात प्रकाशित केलीये.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल
Pune : पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब उर्फ अख्तर शेख यानं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वताचं खोटं नाव पोलिसांना सांगीतलं.. तसंच फरार आरोपीचं नाव आणि गावही खोटं सांगीतलं.. त्यामुळे आता पुणे पोलीस आरोपींच्या गावी जाऊन सखोल तपास करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवसेना UBT पक्षाचा वचननामा आज प्रकाशित होणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन होणारेय. ठाकरेंच्या वचननाम्यात महिला, शेतकरी, युवा, रोजगार निर्मिती, उद्योग आणि आरोग्य क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यताये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -