Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीकडून निलंबनाची कारवाई.. 8 पदाधिका-यांविरोधात निलंबनाची कारवाई केल्याची माहिती.. महायुतीच्या उमेदवारांविरोधात अर्ज भरल्यानं कारवाई.
एक है तो सेफ है... मोदींचा नारा, आम्ही सर्व एकत्रच...उद्धव ठाकरेंचं मोदींना उत्तर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नरेंद्र मोदींनी धुळ्यातील सभेतून एक है तो सेफ है चा नारा दिलाय.. काँग्रेस आणि विरोधक जाती जातीत मतभेद करून वेगवेगळे करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप मोतींनी केलाय.. तर मोदींच्या आरोपांना ठाकरेंनी उत्तर दिलंय.. आम्हाला शिकवू नका आम्ही सर्व एकत्र असल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलाय.
समर्थ रामदासांनी शिवरायांना पाठिंबा दिला होता - अमित शाह
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, असं विधान अमित शाहांनी केलंय. सांगलीच्या शिराळ्यामध्ये अमित शाहांची प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी हे विधान केलंय. ही भूमी समर्थ रामदासांची पावलं पडलेली आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यताये.
मविआच्या गाडीला ना चाकं ना ब्रेक - मोदी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातून आपल्या प्रचाराची सुरुवात केली.. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली.. लाडक्या बहीण योजनेला काँग्रेसनं केलेल्या विरोधावरुन त्यांनी टीकास्त्र सोडलं.. तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास फडणवीसांचं वाढवण विमानतळाचं स्वप्न साकार करु असं आश्वासनही यावेळी दिलं..
राज ठाकरेंचा भोंगा 20 ते 25 वर्षांपासून ऐकतोय - संजय राऊत
Sanjay Raut On Raj Thacekray : राज ठाकरेंचा भोंगा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ऐकतोय. ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी शाहांना मदत करातत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय..
नालासोपाऱ्यात साडे 3 कोटींची रोकड जप्त
Nalasopara Cash Seized : नालासोपा-यात साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही संशयास्पद रोकड ATM व्हॅनमध्ये आढळली.पोलिसांच्या पथकाने ही व्हॅन आणि त्यातील दोन जणांना ताब्यात घेतलंय. बँकेच्या ATMमध्ये भरण्यासाठी ही रक्कम आणल्याचं सांगण्यात आलं. मात्र व्हॅनमध्ये असलेले साडेतीन कोटी रुपयांचा हिशोब जुळत नसल्यानं या रकमेबाबत संशय निर्माण झालाय. या घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे कार्यतर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यांनी चौकशीची मागणी केलीय.
जालन्यात 52 लाखांची रोकड जप्त
Jalna Cash Seized : जालन्यातही 52 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये... स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत एका वाहनात ही रक्कम आढळून आलीये.. शहरातील किरण पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आलीये.. एका वाहनातून ही रक्कम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला ताब्यत घेतलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
जळगावात 52 लाखांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : जळगाव शहरातील शनिपेठ भागात एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केलीये.. गस्ती दरम्यान पोलिसांना या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याची चौकशी केली.. यावेळी त्याच्याकडे 25 लाख रुपये आढळून आले.. सदर रकमेबाबत कुठलाही पुरावा सादर न केल्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.. प्रमोद हिरामण पवार असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.. ही रक्कम एका बड्या नेत्याची असल्याची चर्चा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ऐन निवडणूक काळात भाजीपाला शंभरीपार
Vegetable Price Hike : निवडणुकांच्या दिवसांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेत... कांदा 80 रुपये किलो, लसूण 500 रुपये किलो तर वाटाण्याचा दर 250रुपये किलोवर गेलाय.. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.. नागरिकांच्या नाराजीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांचं टेन्शन वाढलंय.. परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं बाजारात भाज्यांची आवक घटलीये.. त्यामुळे भाज्या महागल्यात..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हर्षवर्धन जाधवांची पोलिसांत तक्रार
Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधवांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आलीय. काही गाड्या पाठलाग करत आहेत. अपहरणाचा कट केला जात आहे, अशी तक्रार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांत केलीय. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणीही हर्षवर्धन जाधवांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पूज खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
Pooja Khedakar : पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.. पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी दिल्ली पोलीस आणि UPSCनं केलीये.. आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये पूजा खेडकरच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळालंय.. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सा-यांचं लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात आज दिग्गज नेते प्रचार सभेचा धडाका लावणारेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज ठाकरे आपापल्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणारेत. शरद पवार आज हिंगणघाट, जिंतूर, वसमतमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरेंची तोफ बुलढाणा, लोणारमध्ये धडाडणारेय. धाराशिवमध्ये 3 ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. तर अजित पवारदेखील पुण्यात तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. ते वडगाव शेरीचे उमेदवार सुनिल टिंगरेंचा प्रचार करणारेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ गुहागर, भांडुप आणि नवी मुंबईतील सानपाडामध्ये धडाडणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या महाराष्ट्रात प्रचार सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर सभांचा आज धडाका उडाणारेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमित शाह आज राज्याच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज धुळ्यात या विधानसभेसाठी पहिली सभा घेणार आहेत. 6 विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रचार सभा घेणारेत. त्यानंतर ते नाशिकमध्येही सभा घेणार आहेत. तसेच अमित शाहादेखील आज राज्यात प्रचार सभा घेणार आहेत. ते सांगली, कराड, शिराळा आणि इचलकरंजीमध्ये सभा घेणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -