Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 09 Nov 2024-10:49 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • जळगावात 40 लाखांची रोकड जप्त

     

    Jalgaon Cash Seized : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तब्बल 40 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये...जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात सायंकाळी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एकाकडून 14 लाख 85 हजार रुपयांची रोकड पकडलीये.. तर चोपडा तालुक्यातील डी. के. पाटील बुलेट वरून जात असताना पोलिसांना संशय आल्याने तपासणीत 14 लाख 85 हजार रुपयांची रोकड आढळून आलीये...तर काल जळगाव शहरात 25 लाखांची रोकड शनिपेठ पोलिसांनी पकडली होती...या कारवायांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय...

  • वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील गृहिणी महिलांना दरमहा 3500 रुपये देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीने जाहीरनाम्यात नमूद केलंय..महिलांसाठई राबवल्या जाणा-या योजनेवरुन राजकीय पक्षांमध्ये निवडणूकीच्या तोंडावर जाहीनाम्यात चढाओढ दिसून येतंय...याआधी महायुती सरकारकडून दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवलीये....त्यानंतर महाविकास आघाडीकडून महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्यासंदर्भात जाहीरनामा जाहीर केलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवारांचा जयंत पाटलांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कासेगावात आजही पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत आहे, तुम्हाला तुमच्या गावात पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि राज्याचं नेतृत्व करायला निघाले...उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा समाचार घेतला..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : परळीमधून शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतलाय.. बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवण्यासाठी आग्रही असल्याचं म्हणत.. लोकांना त्रास देणं थांबवण्याचा इशारा शरद पवारांनी दिलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिरुरच्या सभेतून अजित पवारांनी अशोक पवारांना चांगलंच सुनावलंय...भावकी होण्याचा फायदा घेऊन घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याचे म्हणत मला बदनाम का करतोय. यापूर्वी दादा दादा करत होता..आणि आता काय झालं..असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट सुनावलं..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाण्यातील 2 काँग्रेस नेत्यांचं निलंबन

     

    Thane Congress Leader Suspension : विधानसभेत बंडखोरी केलेल्या ठाण्यातील दोन काँग्रेस नेत्यांचे काँग्रेसकडून निलंबन करण्यात आलंय.. मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे यांचे काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे.. मनोज शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलीये..तसेच सुरेश पाटील खेडे यांनी देखील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये बंडखोरी केल्याने त्याचं निलंबन केलंय... 

  • राजकारणात आता तुम्हाला कापणार - उद्धव ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बटेंगे तो कटेंगे घोषणेचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय.माझ्या कार्यकर्त्यांची बोटं कापली तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी नांदेडच्या जाहीर सभेत विरोधकांना दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची रविवारी जळगावमध्ये प्रचार सभा

     

    Jalgaon Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. रावेरच्या फैजपूरमध्ये अमोल जावळेंच्या प्रचारार्थ सभा होणारे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन ज्या ठिकाणी झाले होते त्याच फैजपूरमध्ये अमित शाहांची सभा होणारेय. रावेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात उद्या अमित शाह सभा घेणार आहेत. ते कुणावर निशाण साधणार याकडं सर्वांचं लक्ष आहे. 

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबईत 2 जाहीर सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबईत मोठी जाहीर सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचे आयोजन करण्यात आलंय...मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरुये... अमित शाहांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 तारखेला मुंबईत सभा घेणार आहेत...सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगलीत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडेंची हत्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Murder : सांगलीमध्ये मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आलीये.. मिरज-पंढरपूर रोडवरील राममंदिर परिसरात अज्ञातांकडून हत्या करण्यात आला.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.. शेत जामीनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय.. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून गेल्या काही वर्षांपर्यंत मनसेमध्ये सक्रिय होते.. काही दिवसांपूर्वी सुधाकर खाडे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षांपासून राजकारणापासून खाडे अलिप्त होते.. पोलिसांकडून पुढील तपास सुरुये..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राष्ट्रवादीकडून बंडखोर बापू भेगडेंचं निलबंन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bapu Bhegade : मावळ मतदारसंघातील बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचं राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेगडेंविरोधात कारवाई केलीय. पक्षातून उमेदवारी नाकारल्यानं बापू भेगडेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत. दरम्यान ज्यांनी बडतर्फ केलं त्यांनी याआधीच याचा विचार करायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया भेगडेंनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • ...काट्यानं काटा काढण्याचा हा प्रकार-अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : लोकसभेत पत्नी सुनेत्राला सुप्रिया सुळेंविरोधात उभं केलं. त्यामुळे त्यांनी आता विधानसभेला पुतण्याला माझ्या विरोधात उभं केलं. म्हणजे काट्याने काटा काढण्याचा हा प्रकार असू शकतो, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • राज ठाकरे फडणवीसांचं स्क्रिप्ट बोलतात- संजय राऊत

     

    Sanjay Raut on Raj Thackeray : भांडूपच्या सभेत राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना संजय राऊतांनी आज उत्तर दिलंय... राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची स्क्रीप्ट बोल आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय.. 

  • 'भाजप महाराष्ट्रात खोटा प्रचार करतेय', डी. के. शिवकुमारांचा आरोप

     

    D. K. Shivakumar on BJP :  'कर्नाटक-तेलंगणातील योजना बंद झाल्याचा खोटा प्रचार' 'भाजप महाराष्ट्रात खोटा प्रचार करतेय'...डी. के. शिवकुमार यांचा भाजपवर आरोप...भाजप नेत्यांना कर्नाटक फिरवून आणण्याची ऑफर

  • फडणवीसांची जागा धोक्यात, म्हणून शाह म्हणालेत- अजित पवार

     

    Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असे संकेत नाशिकच्या सभेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिले होते. यावरून राजकीय वातावरण तापलंय. देवेंद्र फडणवीसांसह सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रिया अजित झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये व्यक्त केलीय. महायुतीचं सरकार बनवायचंय. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचंय, असं विधान शाहांनी केलं होत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. कदाचित फडणवीसांची जागा धोक्यात आहेत. नाशिकच्या सभेतून फडणवीसांना विजयी करा, असं आवाहन अमित शाहांना करायचं असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'सुप्रिया सुळेंचं वक्तव्य म्हणजे नौटंकी', अजित पवारांची टीका

     

    Ajit Pawar on Supriya Sule : सिंचनाच्या प्रकरणावरुन RR पाटलांच्या कुटुंबाची माफी मागीतली.. हे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका अजित पवारांनी केलीये.. झी २४तासच्या टू द पॉईंटमध्ये ते बोलत होते.. काय म्हणालेत अजित पवार पाहूयात..

  • राज ठाकरेंची आज यवतमाळ आणि पुण्यामध्ये सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray : राज ठाकरे यांची आज यवतमाळच्या उमरखेड आणि पुण्यात तोफ धडाडणारेय. उमरखेडचे उमेदवार राजेंद्र नजरधनेंच्या प्रचारार्थ ही सभा होणारे. सकाळी 11 वाजता ही सभा होणारे. तर त्यानंतर ते पुण्यात 2 सभा घेणार आहेत. कसबा पेठचे उमेदवार गणेश भोकरे आणि कुथरूडचे उमेदवार किशोर शिंदेंसाठी ते प्रचार करणार आहेत. राज ठाकरे काय बोलतील, याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • यंदा उसासोबत साखर उत्पादनात घट?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Sugar Production To Reduce : राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादनाबरोबरच साखर उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चालू गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरु होणार असला तरी राज्यात विधानसभेचे धामधूम सुरू असल्याने प्रत्यक्षात गळीत हंगाम सुरू होण्याला डिसेंबर उजेडेल अशी शक्यता आहे. हंगाम लांबला तर ऊस उत्पादनासह साखर कारखान्याचा उतारा देखील घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्या अमित शाह यांची मुंबईत पत्रकार परिषद

     

    Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत...अमित शहा यांची उद्या मुंबईत होणार पत्रकार परिषद...भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा शहांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्य

  • सुभाष वानखेडेंची शिवसेना UBTमधून हकालपट्टी

     

    Subhash Wankhede : सुभाष वानखेडेंची शिवसेना UBTमधून हकालपट्टी...सुभाष वानखेडे हिंगोलीचे माजी खासदार...पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप

  • पालघरमध्ये 3 कोटी 7 लाखांची रोकड जप्त

     

    Cash seized in Palghar : पालघरच्या वाडा येथे तीन कोटी सत्तर लाखांची रोकड जप्त . वाडा येथून विक्रमगड कडे जाणारे संशयित वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता या वाहनात करोडोची रोकड असल्याची उघड . नवी मुंबईतील ऐरोली येथून रोकड घेऊन जाणार वाहन वाडा , जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची पोलिसांची माहिती .
     

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसचा अपघात, 10 जखमी

     

    Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसचा अपघात...9 ते 10 प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती...पुण्याहून येताना खोपोलीच्या नवीन बोगद्यात अपघात...बसचा पुढील भागाचा चक्काचूर, जखमींवर उपचार सुरू

  • पंतप्रधान मोदींची आज अकोला, नांदेडमध्ये सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PM Modi : विधानसभा प्रचाराच्या जाहीर सभांचा आज धडाका उडाणारेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुस-या दिवशीही महाराष्ट्रात सभा होणार आहेत. अकोल्यात दुपारी 12 वाजता तर नांदेडमध्ये दुपारी 2 वाजता ते सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींनी काल धुळे, नाशिकमध्ये सभा झाल्यानंतर आज पुन्हा ते अकोला आणि नांदेडमध्ये सभा घेणार आहेत

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link