Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 11 Nov 2024-10:36 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मला लाईटली घेतलं म्हणून मविआचं सरकार पाडलं- मुख्यमंत्री

     

    CM Shinde on Uddhav Thackeray  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवलीच्या प्रचार सभेत एक खळबळजनक विधान केलंय..मला लाईटली घेतलं म्हणून मविआचं सरकार पाडल्याचा गौप्यस्फोट केलाय.. तर संघर्षातून पुढे आलोय त्यामुळे धमक्यांना घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी विरोधकांना दिलाय.. ते चांदिवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीपमामा लांडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते...

  • राज्यात येणाऱ्या दिल्लीश्वरांची तपासणी व्हावी- आदित्य ठाकरे 

     

    Aditya Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर आदित्य ठाकरे यांनीही एक्स समाजमाध्यमावर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात येणा-या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणा-या राज्यकर्त्यांचीही तपासणी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. 

  • 'मतदारांना टोपी घालणाऱ्यांना घरी बसवा',शिंदेंकडून राजेश टोपेंचा समाचार

     

    CM Shinde on Raje Tope : 25 वर्षात विकासाच्या नावाने बोंबाबोंब असून ऐवढी वर्ष मतदारांना टोपी घालणा-यांना घरी बसवा... डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा अशा शब्दात जालन्याच्या घनसांगवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी शरद पक्षाचे आमदार राजेश टोपेंचा समाचार घेतला..... 

  • अकोल्यात वंचितचा अपक्षाला पाठिंबा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akola Vanchit Party : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिलाय.. भाजपसोबत बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेले हरीष अलिमचंदानी यांना वंचितनं पाठिंबा दिलाय.. वंचितच्या अधिकृत उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे वंचितकडून अलिमचंदानी यांना पाठिंबा देण्यात आलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्या आदित्य ठाकरेंची माहीममध्ये प्रचार सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या मुंबईतील माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सभा घेणार आहेत. शिवसेना UBTचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी पोर्तुगीज चर्चजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचे उमेदवार आणि चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्याविरोधात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. राज ठाकरेंनी मागील आठवड्यात वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात सभा घेतली होती. विशेष म्हणजे कुटुंबातील उमेदवार असल्यानं शिवसेना UBT माहीम दादर मतदारसंघात प्रचार करणार नसल्याची चर्चा होती. मात्र उद्या या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा होणार असल्यानं, या चर्चांना पूर्णविराम मिळालंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सत्ताधाऱ्यांना मोकळं रान असतं हे मान्य नाही- अमोल कोल्हे 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kolhe on Uddhav Thackeray : राष्ट्रवादी SPचे खासदार अमोल कोल्हे यांची बॅगही हेलिपॅडवर तपासली गेली. सांगलीतील विटा इथे वैभव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमोल कोल्हे आले असता, त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यावरुन कोल्हेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नियम असतात हे मान्य, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात, अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • वणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी

     

    Uddhav Thackeray : यवतमाळच्या वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा असताना, तिथे त्यांची यंत्रणेकडून बॅग तपासण्यात आली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बॅग तपासली गेली का, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचीही बॅग तपासणार का असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले. 

  • माहीम कोळीवाड्यात सदा सरवणकरांना विरोध

     

    Sada Sarvankar : मुंबईतील माहीम कोळीवाडा परिसरात प्रचारादरम्यान स्थानिकांनी सदा सरवणकर यांना विरोध केला..माहीम कोळीवाडा येथे राहणा-या स्थानिक कोळी महिलांचे फिश फूड स्टॉल विद्यमान आमदार सदा सरवणकरांनी हटवल्याने स्थानिक नाराज झाल्याचे दिसून आले..\ कोळी महिलांकडून झालेल्या आक्रोश आणि विचारलेल्या प्रश्नांना न उत्तर देताच सदा सरवणकर तिथून निघून गेले ....

  • यशोमती ठाकूर यांचा राज ठाकरेंवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Yashomati Thakur On Raj Thacekray : आत्ताच्या राजकीय चिखलाला संविधानाची तोडफोड करणारे जबाबदार, असा पलटवार यशोमती ठाकूरांनी राज ठाकरेंवर केलाय. तर असं बेजबाबदार वक्तव्य राज ठाकरेंनी करू नये, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर यशोमतींनी प्रत्युत्तर दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • माहीममधून विजयी होणार असल्याचा सरवणकरांना विश्वास

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघात तिरंग लढत होतेय.. सदा सरवणकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.. तर दुसरीकडे राज ठाकरेंची भेट घेण्यास मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं असं सदा सरवणकर म्हणालेत.. 

     

  • मुंबईत माझं घर नाही - फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis : मुंबईत कधी स्वत:चं घरं घेण्याचा विचार केला नाही. महाराष्ट्रात 20 मुख्यमंत्री झालेत. मात्र मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याच मुंबईत घरं नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. नागपुरच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच मी कधी स्वत:चा विचार केला नाही. नेहमी समाजासाठी काम केलं, असं त्यांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीममधून उमेदवारी मिळाल्यानतंर उद्धव ठाकरेंना धक्का बसल्याची टीका अमित ठाकरेंनी केलीय... तसेच माहीममधून कुणीही उभं राहिलं तरीही जिंकून येणार असल्याचं अमित ठाकरे म्हणालेत.. तर अमित ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय.. अमित ठाकरे लहान आहे. त्यांनी शिकावं असा पलटवार संजय राऊतांनी केलाय.. 

  • शाहू महाराजांचा भाजपवर निशाणा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपकडून समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप खासदार शाहू महाराजांनी भाजपवर केलाय. तर अर्ज मागे घेण्याची मधुरिमाराजें यांच्यासह  मालोजीराजेंचीही इच्छा होती, असं स्पष्टीकरणही शाहू महाराजांनी दिलंय.

  • धीरज देशमुखांच्या सभेत रितेश देशमुखांची टोलेबाजी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Ritesh Deshmukh : काँग्रेसचे उमेदवार आणि भाऊ धीरज देशमुखांच्या सभेत रितेश देशमुखांची टोलेबाजी पाहायला मिळाली. 20 तारखेला इतक्या जोरात बटण दाबा की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, असा टोला रितेश देशमुखांनी लगावलाय. भाजप उमेदवार रमेश कराडांवर त्यांनी टीका केली. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही झापूक झुपूक वारं वाहतंय, असंही रितेश देशमुखांनी म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भंडाऱ्यात अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भंडा-याच्या तुमसर मोहाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शिवचरण वाघमारेंवर कारवाई करण्यात आलीय... त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केलीय. नावाचा आणि चिन्हाचा गैरवापर केल्याचा ठपका शिवचरण वाघमारेंवर ठेवण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बेळगावात भरतीसाठी आलेल्या तरुणांवर पोलिसांचा लाठीचार्ज

     

    Belgav : बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरती सुरू असून यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर मधील मैदानावर युवकांनी तोबा गर्दी केली होती. जवळपास 30 हजाराहून अधिक युवक भरतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलीस आणि बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांना या युवकांवर लाठीमार करावा लागला. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन दोन युवक जखमी झाले. प्रादेशिक सेनेच्या 106 प्यारा, 115 महार,. 125 दि गार्ड्स इन्फंट्री बटालियन मधील सैनिकांच्या 257 व क्लार्कच्या 53 जागांसाठी बेळगावात अखिल भारतीय मेळावा सुरू आहे. मराठा लाईफ इन्फंट्री च्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर ही भरती सुरु आहे.

  • जरांगेंच्या मागणीला विरोध आहे भाजपनं जाहीर करावं - आंबेडकर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपनं मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध आहे हे जाहीर करावं, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी भाजपला केलंय. बीडच्या माजलगावमधील सभेत त्यांनी हे आव्हान केलंय. आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आमदार विधानसभेत गेले पाहिजेत असंदेखील आंबेडकर म्हणालेत. यावेळी त्यांनी एससी, एसटीमधील आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या वर्गीकरण आणि नॉन क्रिमीलेयरच्या निर्णयावर संताप व्यक्त केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • माहीमवासीय माझ्यासोबत आहेत - अमित ठाकरे

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघात आपल्यासमोर कितीही उमेदवार असले तरी फरक पडत नाही. कारण माहीमवासीय आपल्यासोबत आहेत, असा विश्वास माहीममधले मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंनी व्यक्त केला. माहीममध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. माहीममधल्या नागरिकांनी खूप सहन केलंय. इथल्या समस्या सहज सुटणा-या आहेत, यासाठी आपल्याला एकदा संधी द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी हे आवाहन केलं. तर अमित उभा असताना आपण भिका मागणार नाही, त्याला निवडून नक्की आणणार, असा दावा यावेळी राज ठाकरेंनी केला. 

  • काँग्रेसची बंडखोर 21 नेत्यांवर कारवाई

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसकडून 21 बंडखोरांचे निलंबन करण्यात आलेय.. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या 21 जणांवर काँग्रेसने ही कारवाई केली आहे.. या 21 जणांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचे कारण देत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेय.. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील राजेंद्र मुळक,याज्ञवलक्य जीचकार आणि चंद्रपाल चौकसे यांच्यावरही कारवाई झालेली आहे

  • राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

     

    Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व दिग्गज राजकीय नेते आज प्रचाराचा धाडका लावणारेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज राज्यात 6 सभा होणारेत. मुख्यमंत्री मुंबईसह अहिल्यानगर, जालन्यात सभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिम, जळगाव जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावणारेत. देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदियासह मुंबईत प्रचार सभा घेणारेत. शरद पवार आज धुळे, जळगाव जिल्ह्यात 5 सभा घेणार आहेत. दोंडाईचा, पारोळा, मुक्ताईनगर, जामनेर आणि शेवटची सभा धरणगावमध्ये होणारेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link