Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 13 Nov 2024-9:01 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'राणेंना साईजप्रमाणे खात मिळालं होतं', उद्धव ठाकरेंचा टोला

     

    Uddhav Thackeray on Narayan Rane : कणकवलीतील मविआ उमेदवाराच्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि अमित शाहांवर जोरदार निशाणा साधलाय.. नकली सेना म्हणणारे बे अकली असल्याचं म्हणत त्यांनी अमित शाहांना टोला लगावलाय. तर राणेंना साईज प्रमाणं मंत्रिपद मिळालं होतं म्हणत नारायण राणेंवर टीका केलीये...

  • माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद- अब्दुल सत्तार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Abdul Sattar : मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो..अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य...सत्तारांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्षपणे टीका...सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तारांचं वक्तव्य...संभाजीनगरच्या अजिंठा इथं एका सभेत सत्तारांचं वक्तव्य...माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद-सत्तार

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले- अमित ठाकरे

     

    Amit Thackeray on Uddhav Thackeray :  'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले'.. अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप..आजारी असताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्रास दिला...नगरसेवक फोडाफोडीपासून संवाद संपल्याची माहिती..झी 24 तासच्या जाहीर सभेत अमित ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • बारामतीत अजित पवारांच्या बॅगांची तपासणी

     

    Ajit Pawar : अजित पवारांच्या बॅगचीही तपासणी कऱण्यात आलीय...अजित पवारांच्या बॅगची आणि हेलिकॉपटरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलीय...आयोगाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं...अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत...कायद्याचा आदर करू- अजित पवार

  • पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी

     

    CM Eknath Shinde : पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी...कोलवडेतील हेलिपॅडवर शिंदेंच्या बॅगांची तपासणी...निवडणूक विभागाकडून बॅगेची तपासणी...पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा  

  • 'शरद पवारांचे फोटो, व्हिडिओ वापरु नका', सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi : सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली.. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले.. तसंच घड्याळाचं चिन्हं वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्याही  सूचना दिल्या.. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सगळ्या माध्यमासाठी हा नियम लागू असेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाप्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे गुजराती भूमिपुत्रांसाठी लढते - आदित्य ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसे गुजराच्या भूमिपुत्रांसाठी लढते महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीये.. वरळीतील प्रचार रॅलीत त्यांनी मनसेवर टीका केलीये.. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवली.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांचा युगेंद्र पवारांवर निशाणा

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :  मला इंग्रजी येवो की न येवो..मात्र मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.. साडे सहा लाख कोटींचं राज्याचं बजेट सादर करतो असा टोला अजित पवारांनी युगेंद्र पवारांना लगावलाय... त्याला टिंबही काढता येत नसल्याचंही अजित पवार म्हणालेत... 

  • मविआ राज्यात 170 जागा जिंकणार - रोहित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआ राज्यात 170 जागा जिंकणार असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. तर विदर्भात आमचा चांगला स्ट्राईक रेट आहे. तर फडणवीसांच्या मतदारसंघात दहशतीचं वातावरण असून लोक समोरुन बोलत नाही करु दाखवतात. अशी टीकाही रोहित पवारांनी केलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बच्चू कडूंचा रवी राणा आणि देवेंद्र फडणवीसांना टोला

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रवी राणा आणि फडणवीस यांची मैत्री राम लखनसारखी आहे, अशी खोचक टीका बच्चू कडूंनी केलीय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावर अमरावतीत जोरदार टीका केली. यावर बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राणा आणि फडणवीस हे दोघंही एकमेकांचे फॅन आहेत, त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्र्याचं काही ऐकलं असं वाटत नाही, असा टोला कडूंनी लगावलाय.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बॅगांचीही तपासणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही  तपासणी करण्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ शेअर करत भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीये.. यवतमाळ आणि कोल्हापुरात देवेंद्र फडणवीसांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती मात्र त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली असं भाजपनं म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवनीत राणांकडून बंडखोर उमेदवाराचा प्रचार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमरावतीत भाजप नेत्या नवनीत राणांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलाय. भाजपचे बंडखोर रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणांनी प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेतून नवनीत राणा यांनी अडसूळ पितापुत्रावर जोरदार टीका केली. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी रमेश बुंदिलेना निवडून द्या असे आवाहन नवनीत राणांनी दर्यापूरकरांना केलंय. दरम्यान अडसूळ पिता पुत्रांची सभेत खिल्ली उडवलीये. दरम्यान नवनीत राणांनी महायुतीचा उमेदवार सोडून रवी राणांच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विश्वजीत कदमांची संजय राऊतांवर जोरदार टोलेबाजी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राऊतांच्या अंगात आलेलं कधी उतरलंच नाही त्यामुळे आघाडीचे सरकार गेलं...असा टोला आमदार विश्वजीत कदमांनी लगावलाय...महायुती सरकारने दिल्ली आणि गुजरात पुढे महाराष्ट्राला झुकायला लावले, असंही विश्वजित कदमांनी म्हटलंय...सांगलीच्या पलूसमध्ये प्रचारासभेदरम्यान ते बोलत होते...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात 3 दिवस पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Rain Alert : उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय.. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.. त्यामुळे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय.. पुढील तीन दिवस राज्यात ढगाळ हवामान राहील असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय.. या पावसाचा फटका काढणीला आलेल्या पिकांना बसण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत दोन शिवसेना एकमेकांना भिडल्या.. जोगेश्वरीत शिवसेना आणि शिवसेना UBTचे  कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला.. यामुळे हे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारण्यासाठी गेले होते.. त्यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांवर धावू गेले.. तसंच एकमेकांवर दगडफेक केली.. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज ठाकरेंची वरळीत आज प्रचार सभा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईच्या वरळीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहेत. मनसेचे उमेदवार संदीप देशपांडेंसाठी राज ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. जांबोरी मैदानावर राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. वरळीत संदीप देशपांडेंचा सामना शिवसेना UBTचे उमेदवारआदित्य ठाकरेंशी होणार आहे. त्यामुळे आजच्या प्रचार सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडं लक्ष लागलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पूर्ण 5 वर्षांसाठी आमचं सरकार येणार - बच्चू कडू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी मोठा दावा केलाय. नायक चित्रपटासारखं नाही तर पूर्ण 5 वर्षांसाठी तिसऱ्या आघाडीचं सरकार येणार. असा दावा कडू यांनी केलाय. तर येणारं सरकार हे छोट्या पक्षांचं असेल. असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राणेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकमेकांचे कट्टर विरोधी आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. उद्धव ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.. कणकवली आणि कुडाळमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे राणेबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.. 

  • उद्धव यांची बॅग तपासणाऱ्या पथकाचं कौतुक

     

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची बॅग तपासणा-या भरारी पथकाला निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र देण्यात आलंय. काल वणी इथं उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. या बॅग तपासणीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता भरारी पथकाचं निवडणूक आयोगानं कौतुक केलंय. तपासणीदरम्यान निपक्षपातीपणा राखल्यानं आणि निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यानं, पथकाला प्रमाणपत्र देण्यात आलंय. निवडणूक आयोगाचे सामान्य निरिक्षक सज्जन राजसेकर यांनी भरारी पथकाचं कौतुक केलंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link