Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 27 Nov 2024-11:51 am,

LIVE Updates on November 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच?

     

    Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार सस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनं दिलीय, आतापर्यंत हे पालकमंत्रिपद शिवसेनेकडं होतं. त्यामुळे हे शिवसेनेलाच मिळावं अशी मागणी आहे. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट हे दोघेही पालकमंत्री पदावर अडून बसलेलेत, असं सूत्रानं म्हटलंय. तर दुसरीकडं भाजपनेसुद्धा पालकमंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती मिळतेय. अतुल सावे यांना आता पालकमंत्रिपद मिळायला हवं अशी भाजपची भूमिका असल्याचं सूत्रानं म्हटलंय. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये पालकमंत्रिपदांवरून रस्सीखेच निर्माण झाल्याचं दिसतंय.

  • काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं - आशिष देशमुख

     

    Ashish Deshmukh On Congress MLA : महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असा खोचक टोला सावनेरचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी लगावला आहे. आशिष देशमुखांनी तुलनात्मक आकडेवारी सादर करत काँग्रेसला खोचक सल्ला दिलाय. 

  • पुण्यात बाबा आढाव उद्या आत्मक्लेश उपोषण करणार 

     

    Pune Baba Adhav : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आत्मक्लेश उपोषण करणारेत.  महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत उद्या महात्मा फुले वाडा इथे हे आत्मक्लेश उपोषण होणारेय. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप घेत नाही हे अनाकलनीय आहे असं मत बाबा आढावा यांनी व्यक्त केलंय...

  • पुण्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Candidate Deposit : पुण्यातील तब्बल २५९ उमेदवारांचे डिपॉझिट विधानसभा निवडणुकीत जप्त झालंय... २१ विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालंय...सर्वात जास्त इंदापूर मधील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Koregaon-Bhima Case : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचां अंतिम युक्तिवाद सध्या सुरू आहे. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य होती, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिशिर हिरे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर केला. कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ एका भागात झाली नाही. शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य भागातदेखील झाली. मात्र, पोलिसांना दंगली कशा हाताळायच्या याची माहिती असते. नियमावलीप्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी केलाय. आयोगासमोर 53 जणांची साक्ष नोंदवण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणारेय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाशिकमध्ये सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ

     

    Nashik CNG Price Hike : नाशिकमध्ये सीएनजी दरात दोन रुपयांनी वाढ झालीय.. अचानक वाढलेले सीएनजी दरामुळे नाशिककर संतप्त झाले आहेत... 89 रुपये 90 पैसे असलेला दर आता 91 रुपये 90 पैसे झालाय.. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत...

  • प्रभादेवी आणि दादर परिसरात 2 दिवस पाणी बंद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Water : मुंबईतल्या लोअरपरेल, दादर आणि प्रभादेवी भागात राहणा-या नागरिकांना दोन दिवस पाणी येणार नाहीय. मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी उद्या रात्री 10 वाजल्यापासून ते परवा रात्री आठवाजेपर्यंत पाणी येणार नाहीए. त्यामुळे 22 तास लोअरपरेल, दादर, प्रभादेवीतल्या काही परिसरांचा पाणी पुरवठा  पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: पाणीपुरवठा बंद असणार आहे. नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असं आवाहन पालिकेने केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • डी.वाय.चंद्रचूड यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    D.Y.Chandrachud On Sanjay Raut : कोणत्या याचिकेवर सुनावणी करायचं हे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का? अशा शब्दांत माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील घडामोडीला चंद्रचूड जबाबदार आहेत. 12 आमदारासंदर्भात निर्णय देऊ शकले नाहीत. इतिहासात चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याला चंद्रचूडांनी उत्तर दिलंय. सुनावणी करणं एखादा व्यक्ती ठरवणार का? असा सवाल उपस्थित करत. याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार सरन्यायधीशांना असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदिती तटकरेंनी महेंद्र थोरवेंना सुनावलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad Aditi Tatkare : काठावर वाचलात जरा इकडं तिकडं झालं असतं तर काय जागा आहे ते कळलं असतं अशा शब्दात आमदार आदिती तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावलं.यश मिळालं तर त्याची हवा डोक्यात जाऊ देवू नका असा सल्लाही आदिती यांनी  दिलाय. सुनील तटकरे यांनी माझ्यासह जिल्हयातील शिवसेनेचे तीनही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांना पालकमंत्री होऊ देणार नाही असा इशारा आमदार थोरवेंनी दिला होता. त्यावत त्या बोलत होत्या. आपण थोरवेना फार महत्‍व देत नाही.कोण कुठला मंत्री होणार हे आमचे नेते ठरवत असतात हे कुणी स्थानिक आमदार ठरवत नाही असा टोलाही आदिती तटकरे यांनी थोरवेंना लगावला

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Congress Meeting : काँग्रेसनं आज मुंबईत नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावलीय. आजच्या बैठकीत गटनेता निवडला जाणारेय. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link