Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 01 Oct 2024-12:33 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • आमदारांच्या कामागिरीचे रिपोर्ट कार्ड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Working Report Card : 2019 ते 2024 पर्यंत विधिमंडळाचे 12 अधिवेशन झालेत.. या अधिवेशनात 288 आमदारांनी 5 हजार 921 प्रश्न मांडले. यात राज्यात सर्वाधिक ६५६ प्रश्न मुंबादेवीचे काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी विचारलेत आलंय. तर खान्देशातून धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी तब्बल 357 प्रश्न उपस्थित केलेत.. 'संपर्क' या संस्थेने राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाचे विश्लेषण करून अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आलाय.. अधिवेशनात दादा भुसे यांनी एकही प्रश्न विचारला नाही. त्यामुळे दादा भुसे यांनी विधानसभेत मौन पाळल्याचं अहवालातून समोर आलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • गायीच्या दुधाला भाव द्या - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : गोमातेला राजमाता केल्याच्या सरकारच्या अध्यादेशावर संजय राऊतांनी सडकून टीका केलीये. भाजपशासित राज्यांमध्ये होणारी गोवंश हत्या थांबवा आणि  गायीच्या दुधाला भाव द्या असा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय..

     

  • राज्यातील भाजप कुचकामी - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : दरम्यान, मोदी शाहांच्या महाराष्ट्र दौ-यावर खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केलीय. राज्यातील भाजप कुचकामी आहे. म्हणून मोदी, शाहांचे दौरे होतायत अशी टीका राऊतांनी केलीय.. इतकंच नाहीतर अमित शाह, मोदी महाराष्ट्रात आले की भीती वाटते असं म्हणत निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी मुंबईत आणतील असा टोलाही राऊतांनी लगावला... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीराजेंचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अधिकृत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajiraje : संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष झालाय. निवडणूक आयोगानं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करून चिन्ह जाहीर केलंय. संभाजीराजेंनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. आता स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय - अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit pawar : लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय झालीये.. योजनेत जर अडचणी असत्या तर ही योजना आणलीच नसती असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.. नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्याकडूनच जाणून घेऊ असं अजित पवार म्हणालेत... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेसकडून राज्यात लापता लेडीज पोस्टर्स

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Congress Poster : महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे, पण राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी  `लापता लेडीज´ पोस्टर्स लावण्यात आलेत. पोस्टर्समधून बेपत्ता महिलांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आलाय. पोस्टर्समधून कलात्मकरित्या शिंदे, फडणविस, अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका केलीय. महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचं काँग्रेसने दर्शवलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको - विहिंप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vishwa Hindu Parishad : नवरात्रात होणा-या गरबा आयोजनाबद्दल विश्व हिंदू परिषदेच्या अपेक्षांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे... गरबा उत्सवात मुस्लिम तसंच बिगर हिंदू धर्मियांना प्रवेश देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजकांकडे केलीये. त्यासाठी गरबा नृत्य होत असलेल्या ठिकाणी येणा-या सर्व भाविकांचे आधार कार्ड तपासावे असे विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय. ज्यांची देवीवर श्रद्धा नाही त्यांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित शाहांचं 'मिशन मुंबई'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah In Mumbai : अमित शाहांचा दोन दिवसीय मुंबई दौरा आजपासून सुरू होतोय.. दुपारी अमित शाहा मुंबईत दाखल होणार आहे.. दुपारी अमित शाहा मुंबईत येणार आहे.. नवी मुंबई आणि मुंबईतील विधानसभेच्या जागांचा आढावा अमित शाहा घेणार आहे.. तसेच कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे.. मुंबईतील कमी मताधिक्य असणाऱ्या जागांचा शाह आढावा घेणार आहेत.. तसेच उद्या अमित शाहा हे ठाणे आणि कोकण विधानसभेचा आढावा घेणार आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • चुकीच्या सर्व्हेमुळे भावना गवळीचा बळी - भावना गवळी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Washim Bhavana Gawali : निवडणुकीतील चुकीच्या सर्व्हेमुळे बळी गेल्याची खदखद स्वत:भावना गवळींनी व्यक्त केलीये.. उमेदवारी सर्वे तुमच्या बाजूनं नाही असं कारण देत महायुतीकडून लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.. वाशिमच्या नंधाना येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या... यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील होते.. आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका.. मतदारसंघाची खरी परिस्थिती वरिष्ठांना कळवा अशी विनंती यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांना केली.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Commercial Gas Cylinder Price Hike : ऐन सणासुदीत व्यावसायिक सिलेंडर गॅस महागलाय. व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात 48 रुपयांची वाढ झालीये. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर गॅसचे दर 1900 रुपयांवर पोहचलंय. हे नवे दर आजपासून लागू होतायेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मजुराच्या मुलाला सुप्रीम न्याय

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Supreme Court : प्रवेश शुल्क भरण्यास उशीर झाल्यानं एका मजुराच्या मुलाला आयआयटी धनबाद इथं प्रवेश नाकारण्यता आला होता.. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याची दखल घेऊन विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिलेत.. गुणवत्ता आणि प्रतीभा वाया जाऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टानं विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिलेत. केवळ 17 हजार 500 रुपये शुल्क भरण्यास विलंब झाल्यानं विद्यार्थ्याला प्रवेश नाकारण्यात आला होता.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP : विधानसभा निवडणुकीत भाजपनं 150 जागांवर लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. यासाठी 150 मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक पाठवले जाणार आहेत... विशेष म्हणजे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांकडून उमदेवारांची नावं मागवली जाणार आहेत.. प्रत्येक मतदारसंघात किती नेते निवडणूक लढवण्यासाठी सक्षम आहेत याचीही चाचपणी भाजपकडून केली जाणार आहे. संभाव्य उमेदवारांची नावं तसंच निवडणुकीत होणारी संभाव्य बंडखोरी याचाही आढावा भाजपकडून घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

     

    Delhi Supreme Court : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. अजित पवारांकडून घड्याळ चिन्ह काढून घ्या अशी याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलीये.. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं अजित पवारांचा पक्ष पालन करत नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून घड्याळ चिन्ह काढून घ्यावं अशी मागणी शरद पवारांनी केलीये. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवं चिन्ह मिळणार का याकडे सा-याचं लक्ष लागलंय.. 

  • मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरला बदलणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Central Railway Time Table : मुंबईत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून  बदल करण्यात येणार आहे. या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन २० जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणारेत. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सीएसएमटीऐवजी २० अप आणि डाऊन लोकल दादरवरून धावतील असा निर्णय घेण्यात आलाय. या बदलामुळे सध्या लोकलला होणारा विलंब टाळता येईल असा विश्वास रेल्वे अधिका-यांनी व्यक्त केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link