Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Thu, 10 Oct 2024-9:19 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • टेनिसपटू राफेल नादालची निवृत्तीची घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rafael Nadal : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालनं निवृत्तीची घोषणा केलीये...हा हंगाम शेवटचा असणार असल्याचं त्यानं जाहीर केलंय...22 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालनं टेनिसमधून निवृत्ती जाहीर केल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पहायला मिळतेय...त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिलीये...

    बातमी पाहा - Rafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?

  • मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : बीडच्या नारायण गडावरील मराठा समाजाच्या मेळाव्याची तयारी पूर्ण झालीये....मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे..जरांगे ज्या ठिकाणाहून संबोधित करणारेत त्या ठिकाणी मोठं स्टेज उभारण्यात आलंय.. त्याचबरोबर पार्किंग आणि मेळावा होणाऱ्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : येत्या शनिवारी मुंबईसह राज्यात विविध राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा होत आहे. मात्र मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असणार आहे. शनिवारी दस-याला मुंबईत उद्धव ठाकरेंचा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्वीचा हा दसरा मेळावा असल्यानं, या दोन्ही मेळाव्यांकडे राजकीय जाणकार, तसंच सामान्यांचंही लक्ष असणार आहे. मात्र हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढल्या 4 ते 5 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचं भाकीत हवामान विभागानं व्यक्त केलं आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

    बातमी पाहा - नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट

  • नाशिकमध्ये अबू सालेमच्या मैत्रिणीला अटक

     

    Nashik Abu Salem Friend Arrest : नाशिकमध्ये परदेशी नागरिकासह अबू सालेमच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. परदेशी नागरिक अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर अबू सालेमच्या मैत्रिणीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. तिथे अबू सालेमचा घातपात करण्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. नाशिक क्राईम ब्रँच आणि दहशतवादी विरोधी पथकानं एकत्र ही कारवाई केली असून, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. 

  • उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन

     

    Ratan Tata : ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण, टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं आहे. मुंबईत वरळीमधील स्मशामभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्याआधी स्मशानभूमीतील कम्युनिटी हॉलमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तर रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसंच नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मान्यवरांनी रतन टाटांचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना स्मशानभूमीत सोडण्यात आलं. यावेळी या महान उद्योजक आणि तितक्याच आदरणीय माणसाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली आणि शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं. 

  • रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा - राज ठाकरे

     

    Raj Thackeray : रतन टाटांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात यावा...अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीये...यासंदर्भात राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय...रतन टाटांना खरतंर हयात असतानाच भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानानं सन्मानित करायला हवं होतं...आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवा अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलीये...त्याचबरोबर माझ्यासह तमाम भारतीयांचीही याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही असंही राज ठाकरे पत्रात म्हणालेत...

  • उद्योग रत्न पुरस्कार यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल -  मंत्री उदय सामंत 

    गुरुवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत एकूण 80 निर्णय घेण्यात आले असून हे सर्व निर्णय समाजपयोगी असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे.  टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की कॅबिनेट बैठकीत टाटा यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे त्याला रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. रतन टाटा यांना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला होता. तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल. नवीन उद्योग भवन हे ७०० कोटींचे होत आहे याला टाटा यांचे नाव देऊन ही एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली असेल. 

  • धनगर आरक्षणाचं शुद्धीपत्रक रद्द करण्याची सरकारवर नामुष्की

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhangar Reservation : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की...धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं शुद्धीपत्रक काढण्यात आले होते....धनगड हे आपल्या राज्यातच नाहीत, अशी भूमिका धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता....धनगड जातीचे सात दाखले संभाजीनगरात काढले होते. ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत...महसूल व सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक काढले होते....चुकीचे शुद्धीपत्रक काढणा-यांवर अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी धनगर समाजानं केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

     

  • पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार 

     

    Dhananjay Munde : पंकजा मुंडेंच्या भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. खुद्द धनंजय मुंडेंनी ट्विटवरून ही माहिती दिलीय. मी येतोय तुम्हीही या असं आवाहन मुंडेंनी बीडकरांना केलंय.. भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे.. 

  • रतन टाटांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर, राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय

     

    State Cabinet Meeting on Ratan Tata Passed Away : रतन टाटांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर....केंद्र सरकारला विनंती करणारा प्रस्ताव मंजूर...राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय...मंत्रिमंडळ बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली

  • 'सध्याचे खासदार मारहाणीची भाषा करतात', सुजय विखेंचा निलेश लंकेंवर आरोप

     

    Sujay Vikhe on Nilesh Lanke : टायगर अभी जिंदा है असं म्हणत सुजय विखे यांनी निलेश लंकेना इशारा दिलाय.. पराभूत झालो असलो तरी खचलो नाही असंही सुजय विखे म्हणालेत.सध्या निवडून आलेले खासदार विकासाबाबत बोलत नाहीत.. मारहाण आणि शिविगाळीची भाषाच ते कायम करत असतात असंही सुजय विखे म्हणालेत.. नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी लंकेंवर टीका केलीय.. 

  • आज एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख- राज ठाकरे

     

    Raj Thackeray on Ratan Tata Passed Away : आज एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 

  • भारताच्या विकास यात्रेत टाटांचं योगदान विस्मरणीय- मोहन भागवत

     

    Mohan Bhagwat on Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं परिपत्रक काढून शोक व्यक्त केलाय. संपूर्ण देशासाठी ही दु:खद घटना आहे, अशी भावना सरसंघचालक मोहन भागवतांनी पत्रकातून व्यक्त केलीय. भारताच्या विकासयात्रेत टाटांचं योगदान विस्मरणीय आहे. भारताचा अमूल्य रत्न हरपला असंही मोहन भागवतांनी परिपत्रकात म्हटलंय.

  • शेवटची राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Cabinet Meeting : आज राज्य सरकारची सह्याद्री अतिथी गृहात मंत्रिंडळाची बैठक होणार आहे...विधानसभा निवडणुकी पूर्वीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता....उद्योजक रतन टाटा यांना मंत्रिमंडळाकडून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर बैठकीला होईल सुरुवात....विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज देखील घोषणांचा पाऊस पडेल असा अंदाज...शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा होण्याची शक्यता...
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • टाटांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयांचे नुकसान- मुकेश अंबानी

     

    Mukesh Ambani on Ratan Tata Passed Away  : टाटांच्या निधनामुळे प्रत्येक भारतीयांचे नुकसान झाले...भारताचा एक दयाळू -हदयाचा मुलगा हरपला... मुकेश अंबानी यांनी भावना व्यक्त केल्या...

  • उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दु:ख झाले- अमित शाह

     

    Amit Shah : उद्योजक, प्रखर राष्ट्रवादी हरपल्याने खूप दु:ख झाले... देशाच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे...केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

  • तुम्हाला कधीही विसरले जाणार नाही- आनंद महिंद्रा

     

    Anand Mahindra  on Ratan Tata Passed Away : तुम्हाला कधीही विसरले जाणार नाही, कारण, महापुरूष कधीचं मरत नाहीत, अशा शब्दांत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

  • रतन टाटा एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते- पंतप्रधान

     

    PM Modi on Ratan Tata Passed Away : रतन टाटा एक दूरदृष्टी असणारे उद्योजक होते...दयाळू आणि असाधारण व्यक्तिमत्व... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केलाय.

  • रतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर...सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टाटा यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. तिस-या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानं त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं... मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link