ठाकरे, शिंदे, मुंडे आणि... राज्यात शनिवारी पाच दसरा मेळावे, पाहा कोणत्या नेत्याची तोफ कुठे धडाडणार

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याचा दसरा मेळावा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दसऱ्या मेळाव्यातून सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करणार असून निवडणूकीचं रणशिंगही फुंकलं जाणार आहे. राज्यात उद्या तब्बल पाच दसरा मेळावे होणार आहेत.  पाहुयात कोणत्या नेत्यांचा कुठे दसरा मेळावा होणार

| Oct 11, 2024, 14:41 PM IST
1/7

ठाकरे, शिंदे, मुंडे आणि... राज्यात शनिवारी पाच दसरा मेळावे, पाहा कोणत्या नेत्याची तोफ कुठे धडाडणार

2/7

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथं होणार आहे. या मेळाव्याचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची… वाजत गाजत गुलाल उधळत या… असं आवाहन या टिझरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

3/7

शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा तिसरा दसरा मेळावा आहे. याआधीचे दोन दसरा मेळावे हे बीकेसीतल्या एमएमआरडीए मैदानावर झाले होते. पण यंदाच्या दसरा मेळाव्याचं स्थान बदलण्यात आलं आहे. शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 50 हजार लोक बसतील इतक्या खुर्च्या सध्या आझाद मैदानामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. 

4/7

भगवान भक्ती गड सावरगाव घाट या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दसरा मेळावा होणार आहे..  या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडेही उपस्थीत राहणार आहेत.. त्यामुळे हे दोन्ही नेते उद्याच्या मेळाव्यातून काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..   

5/7

बीडमधील नारायण गडावर मनोज जरांगेंचा उद्या दसरा मेळावा होणार आहे.. अंतरवली सराठी मध्ये झालेल्या सभेनंतर हा सर्वात मोठा मेळावा आहे..त्यामुळे या मेळाव्यातून मनोज जरांगे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..

6/7

नागपुरात परंपरेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपूरमधील रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा भरवला जातो. 

7/7

भारतात 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडरकरांचे लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात. विजयादशमीला  दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाखांपेक्षा जास्त अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.