Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 11 Oct 2024-2:09 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा

     

    Noel Tata : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा...टाटा ट्रस्टच्या मुंबईतील बैठकीत निर्णय...रतन टाटांच्या निधनानंतर नोएल टाटांची नियुक्ती...-नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ

  • पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Vehical Todfod : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड...तीन मुलांनी दारुच्या नशेत 12 वाहनं फोडली...गाड्या फोडणा-या दोघांना अटक, एक फरार...पुण्यातील जनता वसाहत परिसरातील घटना

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • शासन निर्णयांचा धडाका,​ 10 दिवसात 1 हजार 291 शासन निर्णय जारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Government Decision : 10 दिवसात 1 हजार 291 शासन निर्णय जारी...आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयांचा धडाका...प्रलंबित निर्णय जाहीर करण्याची सरकारची धावपळ...वर्क ऑर्डर काढण्यासाठी सर्वच विभागांची लगबग

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अजित पवारांची तातडीची पत्रकार परिषद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : आज अजित पवारांची महत्त्वाची पत्रकार परिषद...संध्याकाळी 6.30 मिनिटांनी अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे..आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती...अजित पवार काय घोषणा करणार या कडे महाराष्ट्राचं लक्ष...मत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद बोलावल्यानं पक्षकार परिषदेचं महत्त्व वाढलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या साधणार जनतेशी संवाद साधणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणारेत. पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणारेत. पहिल्यांदाच राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष असणारेय 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • छगन भुजबळांचे निवृत्तीचे संकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chhagan Bhujbal Retirement : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत.. कोणताही निर्णय घेताना मला विचारण्याची गरज नसल्याचंही त्यांनी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर भुजबळांना सांगितलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • राज्यातील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharera : राज्यातील 314 गृहप्रकल्प दिवाळखोरीत गेलेत.. तशी माहिती महारेराच्या संकेतस्थळावर देण्यात आलीय.. दिवळखोरीत गेलेल्या गृहप्रकल्पाच्या यादीत मुंबईतील 236 प्रकल्प आहेत.. पुण्यातील 52 प्रकल्पांचा समावेश आहे.. तर अहमदनगर आणि सोलापुरातील 5 प्रकल्प दिवाळखोरी गेलेत. घरं घेणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी यासाठी महारेरानं संकेतस्थळावर प्रकल्पांची यादी दिलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुण्यात फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची मोठी कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Railway Action : पुण्यात फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची मोठी कारवाई...पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधात मोहीम तीव्र केलीय...आत्तापर्यंत 10 कोटी 43 लाख रुपयांचा दंड वसूल...-सप्टेंबर महिन्यात 20 हजार 569 प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुण्यात पुन्हा हिट अँड रन, एकाचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Hit and Run : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडलीये.. एका आलिशान कारचालकानं दुचाकीस्वाराला चिरडलंय.. या दुर्घटनेत रौफ अकबर शेख या दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. हा तरुण डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.. या दुर्घटनेतील ऑडी कारचा चालक हा दारुच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.. 
     

     

  • मंत्रिमंडळ बैठक लवकर सोडून गेलो नाही- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : मंत्रिमंडळ बैठकीवरून आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. लातूरमध्ये नियोजित कार्यक्रम होता त्यामुळे लवकर गेल्याचं अजित पवार म्हणालेत.. एखनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगून लातूरला गेल्याचं अजित पवार म्हणालेत.. माध्यमांमधील बातम्या चुकीच्या असल्याचं अजित पवार म्हणालेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद- सूत्र

     

    Mahayuti : मंत्रिमंडळ बैठकीत वादाची ठिणगी-सूत्र...शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद-सूत्र...अजित पवार बैठकीतून उठून गेलेत- सूत्र...मुख्यमंत्री शिंदेंच्या काही महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी न दिल्यानं शिंदे आणि अजित पवारांमध्ये बैठकीत खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती...
     

  •  पुण्यात  7 नव्या पोलीस स्टेशनचं आज उद्घाटन

     

    Pune New Police Station  : पुण्यात आज नवीन सात पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात येणारेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटन समारंभाला उपस्थित असणारेत.
    नवीन पोलीस स्टेशनसाठी 816 मनुष्यबळ देखील मंजूर झालंय. तसंच पायाभूत सोई- सुविधांसाठी 59 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. दरम्यान, नवीन सात पोलीस स्टेशनमुळे पुणे शहरात आता एकूण 39 पोलीस स्टेशन्स झालीत. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी नवीन पोलीस ठाण्याची नावं आहेत.

  • नवी मुंबई विमानतळावर आज उड्डाण चाचणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Airport : नवी मुंबईत विमानाचं लवकरच टेक ऑफ होण्याची शक्यताय कारण... नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी होणारेय... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर आज हवाई दलाचं सुखोई 30 विमान धावपट्टीवरून काही अंतरावर उड्डाण करणार आहे. तर लष्कराचं विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर उतरणारेय. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल हे मान्यवर उपस्थित राहणारेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबईतील दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Rain Alert : येत्या शनिवारी मुंबईसह राज्यात विविध राजकीय नेत्यांचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र मुंबईतल्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंचा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा दसरा मेळावा असल्यानं, या दोन्ही मेळाव्यांकडे राजकीय जाणकार, तसंच सामान्यांचंही लक्ष लागलं आहे. मात्र हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढल्या 2 ते 4 दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link