Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 30 Oct 2024-9:11 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'सिंचन प्रकरणात माझी चूक नव्हती', झी २४ तासकडे पृथ्वीराज चव्हाणांचं मनोगत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prithviraj Chavan on Sinchan Scam : राज्याचं राजकारण ढवळून निघालेली बातमी आता आपण पाहणार आहोत...सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे आपल्याला न्याय मिळाला असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. झी २४ तासच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. सिंचन प्रकरणात आपली काही चूक नव्हती. राजकीयदृष्ट्या आपल्या सरकारला फासावर लटकवलं गेलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली. तसंच विनाकारण आपला राजकीय बळी दिला गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. सिंचनाच्या आरोपांमुळे नंतर भाजप सरकार सत्तेत आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे आपल्यावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यातून आपली सुटका झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. सिंचन प्रकरणाबबतची चौकशी आपण लावल्याचा गैरसमज पसरवण्यात आला होता. त्या गैरसमजातून आपली मुक्तता झाल्याचं समाधान, झी २४ तासवरील विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • आर. आर. आबांना कुणी त्रास दिला हे माहिती- रोहित पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Patil on Ajit Pawar : गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना आर आर आबांना कुणी त्रास दिला हे माहिती आहे.. यावर योग्य वेळी योग्य उत्तर देणार, असं म्हणत रोहित पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.. आर आर आबांच्या अनेक मित्रांनी याबाबत मला सांगितलंय.. मात्र, योग्य वेळी उत्तर देण्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते तासगावच्या ढवळी येथील प्रचार सभेत बोलत होते...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

     

    Congress : काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर...सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगेंचा समावेश....कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याही करणार प्रचार..तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीही प्रचार करणार...महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं
     

  • 'दादांचे आबांवरील आरोप दु:खद', स्मिता पाटील यांची प्रतिक्रिया

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Smita Patil on Ajit Pawar : आबा गेल्यानंतर ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं, ज्यांना आम्ही वडिलांच्या जागी पाहिलं, त्या अजित पवारांनी आर आर पाटलांवर असे आरोप करणे दुःखदायक असल्याची भावना, आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केली. सिंचन घोटाळा प्रकरणातील या आरोपांमुळे कुटुंबीयांसह आबाप्रेमींना मोठं दुःख झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

  • सिंचन घोटाळ्याची फाईल काँग्रेस-एनसीपीनं उघडली- देवेंद्र फडणवीस

     

    Devendra Fadnavis :  सिंचन घोटाळ्याची फाईल काँग्रेस-एनसीपीनं उघडली...देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा...घोटाळ्याची चौकशी आघाडी सरकारनंच लावली..अजितदादांच्या दाव्याला फडणवीसांची पुष्टी

  • अकोल्यात मनसे उमेदवाराचा अर्ज बाद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : अकोला जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालाय.  अकोला पश्चिम मतदार संघातून मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरे यांनींचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता... विधानसभेच्या निवडणुकीकरिता बाद करण्यात आलाय...निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट दिली आहेय.. मात्र प्रशंसा अंबेरे यांच वय 25 वर्षा पेक्षा कमी आहे.. त्यामुळे अर्जाच्या छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहेय..मनसे उमेदवार यांना 25 वर्ष पूर्ण करण्याकरिता 24 दिवसांचा अवधी बाकी असल्याचं कारण देत त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय

    बातमीचा पाहा - राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...

  • मविआतील बंडखोरी शमवण्यात येईल - संजय राऊत

     

    Maharashtra Election 2024 : मविआतील बंडखोरी शमवण्यात येईल असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.. रोहीत पाटलांनाही सागंली पॅटर्नचा सामना करावा लागेल असं ते म्हणालेत.. शेकापसाठी जागा सोडण्यास तयार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.. 

  • मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही - रमेश चेन्नीथला

     

    Maharashtra Election 2024 : मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचं मोठं विधान काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांनी म्हटलय.. तसेच आमच्या पक्षाकडून झालेली बंडखोरी आम्ही परत घ्यायला लावू असंही त्यांनी स्पष्ट केलंय... यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार जाणार असून मविआचं नवं सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.. 

  • महायुतीत बंडखोरांचं टेन्शन

     

    Maharashtra Election 2024 : विधानसभेत तिकीट न मिळाल्यानं भाजप आणि शिंदेंचं टेन्शन वाढलंय.. कारण ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत . त्यातील काही ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारींनी बंडखोरी केल्याचं समोर आलंय.. बुलढाणा विधानसभेसाठी संजय गायकवाड यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवार मिळालीय.. मात्र तिथे भाजपच्या विजयराज शिंदेंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. जालन्या अर्जुन खोतकरांविरोधात भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय..

  • रामटेकमध्ये मविआची डोकेदुखी वाढली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : रामटेक विधानसभा मतदारसंघात मविआची डोकेदुखी वाढली.. कारण  काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मूळक यांनी बंडखोरी केलीय.. त्यांच्या बंडखोरीला स्थानिक नेत्यांनी उघडपणे समर्थन दिलंय.. त्यांच्या रॅलीत सुनिल केदार सहभागी झाल्याचं पाहाला मिळालंय.. त्यामुळे मविआचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांचं टेन्शन वाढणार आहे..  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुहास कांदेंवर नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nandgaon Suhas Kande : नांदगाव पोलिसात सुहास कांदे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय..अर्ज भरताना विरोधात बोलणा-यांवर शिवीगाळ करून धमकी दिली होती...सुहास कांदेंविरोधात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये भीषण आग

     

    Ulhasnagar Fire : उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये भीषण आग लागलीय. ऐन दिवाळीत कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानं दुकानदाराचं नुकसान झालं आहे. जवळच फटाका मार्केट असल्यानं धोका आहे. उल्हासनगर, कल्याण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

  • मुंबई शहर आणि उपनगरांत 618 उमेदवारांचे 778 अर्ज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : मुंबई शहर आणि उपनगरात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज दाखल  केलेत.. यात अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.. दिंडोशी मतदारसंघात 32,  मानखुर्द शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईतल्या उतार मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे... 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मावळमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीय

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : मावळमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीय.. कारण बापू भेगडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. त्यांच्या  उमेदवारीमुळे सुनील शेळके यांचं टेन्शन वाढलंय.. फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत बाळा  भेगडे यांनी महायुतीच्या उमेदवाराला साथ देण्याचं मान्य केलं होतं. अशी माहिती सुनील शेळकेंनी दिलीय...मात्र बाळा भेगडे यांनी शब्द पाळला नसल्याचं शेळके म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीनगर शहरावर ड्रोनची नजर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Election 2024 : संभाजीनगर शहरावर पुढील काही दिवस ड्रोनची नजर असणार आहे.. विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ यासाठी संभाजीनगरमधील पोलीस प्रशासन सज्ज झालंय.. शासकीय कार्यालयं, हॉटेल आणि मार्केटवर ड्रोनची नजर असणार आहे.. शहरातील संवेदनशील ठिकाणीही ड्रोनची नजर असणार आहे.. तसेच पोलिसांचं खास पथकही अनुचित प्रकार रोखण्यासाठी काम करणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सहमतीनं घटस्फोटासाठी कुलिंग कालावधी नको-हायकोर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai High Court On Divorce : सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांसाठी कुलिंग कालावधीची अट ठेवू नका.. अशी महत्त्वीची सूचना उच्च न्यायालयान कौटुंबिक न्यायालयाला केलीय..  परस्पर संमतीने विभक्त होऊ पाहणाऱ्या जोडप्यांना घटस्फोट मंजूर करण्यापूर्वी सहा महिने कुलिंग कालावधी देण्यात येतोय.. मात्र तशी अट घालू नका असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय.. त्यामुळे सहमतीनं घटस्फोट घेणा-यांची मानसिक त्रासातून सुटका होणार आहे.. तसेच घटस्फोटाच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं मुंबई हायकोर्टाचं म्हणणं आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • निवडणूक कालावधीत 4 दिवस मद्यविक्री बंद

     

    Maharashtra Election 2024 : निवडणूक कालावधीत 4 दिवसांसाठी मद्यविक्री बंद असणार आहे...  18 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्यात येणारेय... त्याचबरोबर 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी ही मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे..... तसेच या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करुन त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.. तसा इशारा सरकारकडून देण्यात आलाय.. 

  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अर्ज भरण्याचा काल होता शेवटचा दिवस

    अखेरच्या दिवसापर्यंत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात एकूण 618 उमेदवारांनी 778 अर्ज भरले आहेत. मुंबईत अणुशक्तीनगर मतदारसंघात सर्वाधिक 37 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दिंडोशी मतदारसंघात 32,  मानखुर्द शिवाजीनगर 29, चांदिवली 27, जोगेश्वरी 25 आणि मुंबईतल्या उतार मतदारसंघात दाखल झालेल्या अर्जाची संख्या 20 च्या आसपास आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटाची तारीख 4 नोव्हेंबर आहे. अखेरच्या दिवसापर्यंत या आकड्यांमध्ये घट होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल

  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: निवडणूक कालावधीत चार दिवस मद्य विक्री बंद

    जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक कालावधीत म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यत. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केले आहेत.या आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत

    अकोला जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे ते म्हणजे नाराज इच्छुक उमेदवारांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याने.यामध्ये सर्वाधिक बंडखोर उमेदवारांची संख्या ही महायुतीत आहेत. सर्वाधिक आऊट गोईंग  भाजपमध्ये असून सर्वाधिक इन कमिंग प्रहार पक्षात आहे. काल पर्यंत मोठी ताकद नसलेल्या तिसरी आघाडीला नाराज इच्छुकांमुळे आता बळ आला आहेय.

  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates:  ...तर उमेदवारी अर्ज मागे घेईल सुनील शेळकेंचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना खुले आव्हान

    मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळचे महायुती उमेदवार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात दोन दिवसांपूर्वी मावळमधील महायुती चा तेढ सोडवण्यासाठी चर्चा झाली. मात्र ती चर्चा निष्फळ ठरत दुसऱ्या दिवशीच बाळा भेगडे यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या व्यासपीठावर हजेरी लावली.

  • सिंचन प्रकरणात चौकशी लावली नव्हती - पृथ्वीराज चव्हाण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satara Prithviraj Chavan : सिंचन प्रकरणी कोणतीही चौकशी लावली नव्हती.. नाहक माझा बळी घेतला गेला असं विधान  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.. सिंचन घोटाळ्याची फाईल आपल्याकडे आली नाही आणि आपण त्यावर सही केली नसल्याचंही चव्हाण म्हणालेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • श्रीनिवास वनगांचा अखेर कुटुंबाशी संपर्क

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Palghar Shrinivas Vanaga : अखेर तब्बल 36 त्यानंतर पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याचे समजते . पहाटे श्री निवास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले असल्याचं त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी सांगितले. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत, श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता वनगा कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न

     

    Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक बंडखोर असल्याचं पाहायला मिळतंय. या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी महायुतीनं प्रयत्न सुरु केल्याचं समजतंय. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते बंडखोरांना थंड करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोरीचा महायुतीला फटका बसू नये यासाठी तिन्ही नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय. त्याचाच भाग म्हणून आज रात्री उशिरा तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link