Mumbai Senate Election Result : मुंबई विद्यापीठ सिनेटवर युवासेनेचा झेंडा

Fri, 27 Sep 2024-7:41 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • राखीव पाच जागांसह खुल्या प्रवर्गातील 5 अशा सर्व 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या 10 जागांवर युवासेनेचा झेंडा. यापैकी राखीव प्रवर्गातील पाचही जागा युवासेनेनं जिंकल्या आहेत. पाचही उमेदवारांनी सुमारे 4 हजार मतांनी विजय मिळवत, ABVPचा दारुण पराभव केलाय. 
    महिला गटातून युवासेनेच्या स्नेहा गवळी यांनी ABVPच्या रेणुका ठाकूर यांना धूळ चारली. SC गटातून युवासेनेच्या शीतल देवरुखकर शेठ यांनी राजेंद्र सायगावकर यांना मात दिली. OBC प्रवर्गातून युवासेनेचे मयुर पांचाळ विजयी झाले, त्यांनी राकेश भुजबळ यांचा पराभव केला. STतून धनराज कोहचडे यांनी ABVPच्या निशा सावरा यांना हरवलं. निशा सावरा या माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या कन्या आहेत. NTमधून शशिकांत झोरे यांनी अजिंक्य जाधव यांना आस्मान दाखवलं. तसंच खुल्या प्रवर्गातील 5 अशा सर्व 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी... ABVPचा दारुण पराभव.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mantralay office Vandalism : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय...त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पाचही जागा युवासेनेने जिंकल्या- वरुण सरदेसाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Varun Sardesai On Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे.. युवासेनेचे उमेदवार मयुर पांचाळ विजयी झाले आहेत.. युवासेनेचे मयुर पांचाळ ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत.. राखीव प्रवर्गातल्या पाचही जागा युवासेनेनं जिंकल्याचा दावा, ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी केलाय.. आमच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 हजार मतं मिळाली असल्याचं, सरदेसाईंनी सांगितलंय. तर अभाविपच्या उमेदवारांना आठशे ते एक हजार मतं मिळाल्याचं ते म्हणाले. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • लाडकी बहीण किती रागात यावरुन दिसतं - वडेट्टीवार

     

    Vijay Wadettiwar : लाडकी बहीण किती रागात आहे हे यावरून दिसत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेत...त्याचबरोबर आज पाटी काढलीये उद्या हीच पाटी लाडकी बहीण डोक्यात घालेलं अशी टीकाही वडेट्टीवारांनी केलीये...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या तोडफोडीप्रकरणी वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिलीये...

  • घटनेमागचं कारण समजून घेतलं पाहिजे - फडणवीस

     

    Devedra Fadanvis : एखादी बहीण चिडली असेल किंवा कुणी पाठवलं असेल तर ते समजून घेऊ...त्याचबरोबर घटनेची चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत...तर विरोधकांवरही त्यांनी निशाणा साधलाय..

  • मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आलीय. अज्ञात महिलेनं ही तडोफोड केलीय. तोडफोडीनंतर या महिलेनं घोषणाबाजीही केली. महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात प्रवेश केला होता. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतलीय. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा आलाय. ही घटना काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडलीय आणि यावेळी महिला पोलीस उपस्थित नसल्यानं महिलेला पकडू शकलो नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. याप्रकरणी कालच तक्रार दाखल करण्यात आलीय. सध्या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे.

    बातमी पाहा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड

  • अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 4 नराधमांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Crime : पुण्याच्या एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय... गुड टच, बॅड टच याबाबत जनजागृती दरम्यान, पोलिसांच्या समुपदेशन यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय... याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय... पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंचा बोलवता धनी वेगळा - नरेंद्र पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narendra Patil On Manoj Jarange : भाजप सत्तेवर असतानाच मराठा समाजाला न्याय मिळालाय,तरीही जरांगे फडणवीसांवर टीका करत असतील तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे,अशी टीका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अक्षय शिंदेच्या वडिलांचं शाह, फडणवीसांना पत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या वडिलांची संरक्षणाची मागणी केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून अक्षयच्या वडिलांनी ही मागणी केलीय. संपूर्ण कुटुंबीय आणि वकिलाला धमक्या मिळत आहेत. त्यामुळे पोलीस संरक्षण द्यावं, अशी मागणी अक्षय शिंदेंच्या वडिलांनी केलीय. अक्षय शिंदेचा  खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या पत्रातून केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Devendra Fadanvis : धर्मवीर चित्रपटावरून खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतलाय.फडणवीसांना धर्मवीर काय माहीत आहेत? धर्मवीरांवर चित्रपट काढण्याऐवजी त्यांनी राज्य लुटण्यासाठी येणा-या नव्या औरंगजेबवर चित्रपट काढावा, असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय. धर्मवीर तीनची पटकथा लिहाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर राऊतांनी टीका केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • फडणवीसांना औरंगजेबावर चित्रपट काढावा - राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Devendra Fadanvis : धर्मवीर चित्रपटावरून खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतलाय.फडणवीसांना धर्मवीर काय माहीत आहेत? धर्मवीरांवर चित्रपट काढण्याऐवजी त्यांनी राज्य लुटण्यासाठी येणा-या नव्या औरंगजेबवर चित्रपट काढावा, असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय. धर्मवीर तीनची पटकथा लिहाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर राऊतांनी टीका केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढणार?

     

    Amit Thacekray : अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतेय.. अमित ठाकरे भांडुप विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. तशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंकडे केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय. . मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत.. भांडुप विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित असल्याचा अहवाल  मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दिल्याचं कळतंय.. भांडुपसह मागाठाणे, माहीम मतदार संघातही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.. 

  • हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार नाही - सुधीर मुनगंटीवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sudhir Mungantiwar On Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं झालंय, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय. पाटील भाजपचे आहेत आणि भाजपमध्येच राहणार असा दावाही त्यांनी केलाय. त्यांच्याशी पुन्हा फोनवर बोलणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित शाहांचे महाराष्ट्रावर हल्ले - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : अमित शाहांच्या महाराष्ट्र दौ-यावर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. शाहांनी तंबू ठोकला तरीही राज्यात भाजप विजयी होणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी शाहांवर निशाणा साधलाय. ते महाराष्ट्रावर सतत हल्ले करतायेत, असा आरोपही राऊतांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दादांच्या राष्ट्रवादीची मतं कमी मिळालीत - फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते लोकसभेत भाजपला कमी प्रमाणात मिळाली. त्यामुळे भाजपची लोकसभेतील कामगिरी चांगली झाली नसल्याचं मोठं विधान फडणवीस यांनी केलंय.. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजला मिळत नसल्याचं सांगितलं..  मात्र भाजपची मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतात.. पण आम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं मिळत नसल्याचंही फडणवीस म्हणालेत.. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं मात्र भापजपकडे वळत असल्याचंही फडणवीस म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मी आधुनिक अभिमन्यू - देवेंद्र फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis : एकतर तू राहशील किंवा मी राहिल असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. त्याला आता फडणवीसांनी  उत्तर दिलंय.. कुणी कुणालाही संपवू शकत नाही. कुणी कुठेही जाणार नाही. मी अधुनिक अभिनन्यू आहे. मला चक्रव्युहात शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे. तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं फडणवीस म्हणालेत.. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय... एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • साईबाबांना 18 लाखांचा सोन्याचा मुकूट

     

    Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईबाबांना 18 लाखांचा सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आलाय. तेलंगाणाच्या साईभक्त सी. भाग्यलक्ष्मी या भाविक महिलेनं हा मुकूट अर्पण केलाय. या मुकुटाचं वजन 258 ग्रॅम आहे. यावर सुंदर नक्षीकाम कोरण्यात आलंय. या मुकुटाची किंमत 18 लाख रुपये आहे.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरांकडं हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्त महिलेचा सत्कार करण्यात आला. 

  • साताऱ्यातील माण, वाई आणि कराड दक्षिणवर काँग्रेसचा दावा 

     

    Satara Congress : सातारा जिल्ह्यातील माण, वाई आणि कराड दक्षिणवर काँग्रेसनं दावा ठोकलाय. राष्ट्रीय काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली. यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा वाढणारेय. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढलेली असल्याच्या दावा पदाधिकाऱ्यांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहील. मात्र माण आणि वाई मतदारसंघही मिळावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

  • राज्यात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Update : उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय.. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला होता.. मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मात्र उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर तसंच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Abdul Satttar : संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या मेडिकल कॉलेजविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय.  सिल्लोडमधील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी 300 खाटांचं हॉस्पिटल असल्याचं खोटं शपथपत्र सादर केल्याचा आरोप सत्तारांवर करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी औरंगाबाद खंडपीठात त्याविरोधात याचिका दाखल केलीय.  ऋषिकेश मेडिकल कॉलेजसह त्यांच्या इतर कॉलेजची नोंदणी रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आलीय.कोर्टानं सत्तारांची संस्था, राज्य सरकार, मेडिकल कौन्सिल, वैद्यकीय संचालक आणि आयुष मंत्रालयला नोटिसा बजावल्यात. ही याचिका जनहित याचिका म्हणून खंडपीठानं स्वीकारलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • डॉ. अजित रानडेंना हायकोर्टाचा दिलासा कायम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dr. Ajit Ranade : अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलासा कायम ठेवलाय. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला दिलेली तात्पुरती स्थगिती हायकोर्टानं 7 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवली. तसेच रानडेंना कुलगुरूपदावरून हटवण्याच्या निर्णयानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राध्यापक दीपक शाहांकडं सोपवण्यात आलाय. शाहांना संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाबाबतचे निर्णय घेण्याची मुभा राहील, असेही निर्देश कोर्टानं दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दक्षिण सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत वाद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    South Solapur BJP : दक्षिण सोलापूरचे भाजपाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यातील वाद चिघळला. वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या 7 माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुखांच्या समर्थकांनी केलीय. देशमुखांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. वैद्य हे दक्षिण सोलापूरमधून इच्छुक आहेत. त्यांनी जोरदार तयारीही सुरू केलीय. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दक्षिण सोलापूरचे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पावसाची तुफान बॅटिंग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain News : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि भिवंडीला पावसानं झोडपलं आहे.. रात्रभर पावसाची तुफान बॅटिंग झालीय.. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय... तर भिवंडी येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहांचालकणत्रास्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूकीचा वेग मंदालवलाय.. तर नवी मुंबई, पनवेल आणि पालघरमध्येही तुफान पाऊस झालाय..  मुंबईत पावसाची रिपरिप आहे.. 

    बातमी पाहा - Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link