Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 28 Sep 2024-1:48 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'चिंगम राऊतांनी सिंघम फडणवीसांची चिंता करू नये', प्रवीण दरेकरांची टीका

     

    Pravin Darekar on Sanjay Raut : धर्मवीर चित्रपटावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. चिंगम संजय राऊतांनी सिंघम देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या राऊतांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?, असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावलाय.

  • विधानसभेपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA  Disqualification Case : आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव, चिन्ह वाद प्रकरण...सर्वोच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला सुनावणी...विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह ?...सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाच्या वतीने याचिका दाखल...घड्याळ ऐवजी दुसर चिन्ह देण्याची शरद पवार गटाची मागणी...तर राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णयाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय...सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार, याकडे दोन्ही गटाचे लक्ष

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanaatan Mantralay : एक सनातन मंत्रालय असावं अशी मागणी होतेय...सनातन धर्म रक्षणासाठी सनातन मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केलीय. यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर...', प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे.. जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर हे आंदोलन शरद पवारांनीच चालवलं आहे असा निष्कर्ष लोक काढतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं विधान केलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अंबाबाईचं मंदिर आज दर्शनासाठी बंद

     

    Ambabai Temple : कोल्हापुरचं अंबाबाई देवीचं मंदीर आज दर्शनासाठी बंद असणार आहे...शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीचा गाभारा स्वच्छ केला जातोय. त्यामुळे भक्तांसाठी आज मंदिर बंद असेल. सायंकाळी सात वाजेपर्यंत गाभारा स्वच्छतेचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान या वेळेत देवीची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आलीये...

  • 'पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार', हर्षवर्धन पाटलांची माहिती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं...मात्र ते पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर दहा वर्षांत सविंधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर काँगेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले...इंदापुरात त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा

     

    Beed : पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीकडून बहिष्कृत केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
    बीडमध्ये सास-यानं केलेल्या प्रेमविवाहाची शिक्षा जातपंचायतीनं त्याच्या सुनेला दिलीय. आष्टीच्या डोईठाणमध्ये हा प्रकार घडलाय. सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. अनेक वर्ष झाली त्यानं तो दंड भरला नाही. त्यामुळे जातपंचायतीनं सुनेसह मुलाला बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्यानं पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारू अशीही धमकी देण्यात आली. या प्रकरणात 9 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या निमित्ताने पुन्हा एकदा जातपंचायतचा मुद्दा समोर आलाय.

  • रक्षकचं बनले भक्षक !, ​देवगडमध्ये पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devgad Crime on Nanded Police Arrested : नांदेडवरून देवगडला फिरायला आलेल्या पोलीस कर्मचा-यांनीच देवगडमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. देवगड एसटी स्टॅण्डवरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता..खेदाची बाब म्हणजे विनयभंग करणा-या सहा जणांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना घडताच उपस्थित नागरिकांनी या सहाही जणांना चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय. सहाही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. रक्षक म्हणून पाहिल्या जाणा-या पोलिसांनीच असं कृत्य केल्यामुळे पोलीस खात्याला काळीमा फासणारी अशी ही बातमी आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

     

  • नांदेडमध्ये नेरली गावातील 200 जणांना विषबाधा

     

    Poisoning in Nanded : नांदेड शहराजवळ नेरली गावात दोनशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री गावातील अनेकांना उलट्या आणि डोकेदुखी सुरू झाली. मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्णांना खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येतंय.

  • 'विद्येचं माहेरघर कोयता गँग', शरद पवारांची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : विद्येचे आणि उद्योगाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला राज्यकर्त्यामुळे आता ‘कोयता गँग’चे विशेषण चिटकल्याची टीका शरद पवारांनी केलीये..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खराडी येथे महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते... त्यावेळी शहरातील बिघडलेल्या कायदा- सुव्यवस्थेवरुन पवारांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या', शिंदे, पवार, ठाकरेंच्या पक्षाची मागणी

     

    Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घ्या अशी मागणी सत्ताधारी शिंदे, अजित पवारांसह ठाकरेंच्या शिवसेनेनं केलीये.. मात्र भाजप आणि काँग्रेसनं याबात मौन बाळगलं.. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी एका टप्प्यात निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी शिंदे, अजित पवार आणि उद्धव ठकारेचा पक्ष आग्रही राहिले.

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM, DCM visit Nashik today : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार नाशिक दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणारेय. तर सारथीच्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात येणारेय. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडणारेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक विजय ही सुरुवात- आदित्य ठाकरे

     

    Aditya Thackeray on Mumbai Senate Election Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरवात असून, असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवेल असा विश्वास, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सिनेटच्या निकालातही अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोप, आदित्य यांनी केला. हीच हरण्याची भीती असल्यामुळे राज्यात शहरांतील तसंच स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नसल्याची टीका त्यांनी केली. आमचे कार्यकर्ते, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि मतदार राजाने आम्हाला साथ दिली, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केली. 

  •  '...तर राहुल गांधी पंतप्रधान असते', प्रकाश आंबेडकरांचा दावा

     

    Prakash Ambedkar : काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय.. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं.. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असंही आंबेडकर म्हणालते. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणालेत..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link