Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 30 Sep 2024-10:28 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake Video Viral :  मराठा तरुणांनी लक्ष्मण हाकेंना विचारला जाब..हाकेंसमोर मराठा तरुणांची घोषणाबाजी...लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप...लक्ष्मण हाकेंना जाब विचारण्याचा व्हिडिओ व्हायरल

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • इंदापुरात अज्ञाताकडून तरुणावर गोळीबार

     

    Indapur Firing : इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. आणि या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय…राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. त्याला तीन राउंड लागले असल्याची माहिती मिळतीये. घटना घडतात इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरुये..

  • 'शरद पवार महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब', गोपीचंद पडळकरांची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gopichand Padalkar on Sharad Pawar : शरद पवार महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याचं घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथे शरद पवार गेल्यानंतर काही लोकांनी आम्हाला अहमदनगर असंच नाव हवं आहे. त्याचा नामांतर करू नये अशी मागणी केली. त्यांच्यासमोर घोषणाबाजी दिली तर ही घोषणा देणारे कोण आहेत. आणि शरद पवारांसमोर या घोषणा का दिल्या औरंगजेबाचे अवशेष अंश अजून जिवंत आहेत. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याची टीका आमदार पडळकरांनी शरद पवारांवर केलीये...
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले', सिद्धार्थ मोकळेंचा गौप्यस्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Siddharth Mokale : वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक सनसनाटी राजकीय दावा केला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये चर्चा सुरु असल्याचा खळबळजनक दावा मोकळेंनी केलाय.. मोकळेंनी प्रसिद्धी पत्रकात एक दावा केलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah : उद्या अमित शाहा मुंबईत...मुंबईतील विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा...नवी मुंबईतही अमित शाहांची बैठक...वाशी सिडको सेंटरमध्ये अमित शाहा घेणार बैठक...दुपारी 3 वाजता नवी मुंबईतील आरएसएस पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाहा घेणार बैठक 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • फेक नरेटिव्हबाबत भाजप जनजागृती करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP : संविधान बदल आणि आरक्षणाच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपची नवी स्ट्रेटजी..फेक नरेटिव्हबाबत भाजप जनजागृती करणार...महाराष्ट्र भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचा उपक्रम 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 12 जानेवारी 2025ला प्रयागराजमध्ये कुंभमेळा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prayagraj Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा होणार आऐहे.. 12 जानेवारीला प्रयागराज इथं कुंभमेळा होणार आहे.. त्यासाठी 30 ते 50 कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.. तर कुंभमेळाव्यासाठी 933 कोटी रुपये खर्च होणार आहे.. त्यासाठी रेल्वेनंही विशेष तयारी केलीय... रेल्वेकडून 992 विशेष ट्रेनची व्यवस्था केलीय.. परिसरात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे तर हॉस्पिटल आणि इतर सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • देशी गायींना 'राज्यमाता-गोमाते'चा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा

     

    Desi Cow : महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्यात आलाय.. हा मोठा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.. सोबतच महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.. अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.

  • तिरुपती मंदिर लाडू प्रसादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

     

    Tirupati Laddu : तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी मोठी बातमी...प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरल्याचं दिसत नाही असं निरीक्षण नोंदवत, सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसंच लाडू प्रसाद तपासाचा निकाल निघाला नसताना माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती, असा सवालही सुप्रीम कोर्टानं केला. यावरुन सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याना खडेबोल सुनावले. 

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये राडा 

     

    Sindhudurg Zilla Parishad Rada : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं..सावंतवाडी पंचायत समिती इमारतीचा कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या हेतूने आज पेपर सबमिशन ठेवण्यात आलं होतं. मात्र ठेका मिळवण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेलं खाजगी गुंडाने सकाळपासून दहशत माजवली होती. याविरोधात ठाकरे गटाकडून खाजगी गुंडाना चोप देण्यात आला.

  • गुहागरमध्ये महायुतीत वाद?

     

    Guhagar Mahayuti : रत्नागिरीतील गुहागरमधून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या मेहुण्याची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पितृपक्षानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार विनय नातूही निवडणुकीच्या तयारीला लागल्याने महायुतीत मोठा पेच निर्माण होणार आहे. गुहागरच्या जागेसाठी भाजपची समजूत काढण्याचं आव्हान. श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेसमोर असणार आहे. दरम्यान, इथले विद्यमान आमदार भास्कर जाधव आहेत. त्यामुळे, विधानसभेत भास्कर जाधव विरुद्ध विपुल कदम अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार का, याकडेही लक्ष लागलंय. श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. 

  • शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला

     

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी आहे.. कॅबिनेट बैठकीत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय.. मराठा समाजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

  • लाडकी बहीण योजनेत फसवणूक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Ladki Bahin Yojana : सेतू सुविधा केंद्र चालकाने लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचं समोर आलंय.. योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केलीय.. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा इथं हा प्रकार समोर आलाय.. मनाठा गावातील सीएससी केंद्रचालकानच हा प्रकार केलाय.. सचिन थोरात या तरुणानं रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधारकार्ड आणि बँक पासबुक जमा केलेत... मात्र त्याचा दुरुपयोग करून लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरून फसवणूक केलीय.. महिलांच्या आधारकार्डवर खाडाखोड करून त्यावर पुरुषांचे आधारकार्ड आणि बँक पासबुक लावलेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षण द्यावं - मनोज जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : आचारसंहितेआधी मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा. नाहीतर निवडणूक घेऊनही तुम्हाला पश्चाताप होईल, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुळशीत ड्रोनची दहशत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Drone : मुळशी भागात दोन दिवसांपासून रात्रीच्यावेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरतायेत. एकाचवेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसतायेत. हे ड्रोन नेमके कुणाचे आहेत आणि कशासाठी घिरट्या घालतायेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अगदी हिंजवडी आयटी पार्कपासून भूगाव, पौडपर्यंत या ड्रोनची दहशत पसरलीये. तर दुसरीकडे मावळ तालुक्यात रात्रीच्या वेळेस ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना आढळून आलाय..पाचाणे, पुसाणे, चांदखेड, आणि दांरूब्रे गावावर ड्रोन फिरत होते....त्यामुळे ग्रामस्थांनी शिरगावं पोलिसांकडे धाव घेतली..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे फडणवीसांविरोधात लढणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MNS Nagpur Candidate : मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केलीय.. राज ठाकरेंनी नागपूरमधील सर्व 6 विधानभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे त्यांनी सांगितलंय.. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय.. सिनेविश्वातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर याबात घोषणा केलीये..

    बातमी पाहा - ज्येष्ठ अभिनेते Mithun Chakraborty यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  • मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का? - संजय राऊत

     

    Sanjay Raut On CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना ट्विट करता येतं का असा खोचक सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना विचारलाय.. ठाकरेंवर टिका करण्यापूर्वी भूतकाळ विसरू नका अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीये.. 

  • अहेरीची जागा काँग्रेस लढवणार - विजय वडेट्टीवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar : अहेरी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी,अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य उमदेवाराला इथून संधी देण्याची गरज असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेत.मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री यांना अहेरीतून मैदानात उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सरकार म्हणजे विषकन्या - नितीन गडकरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकीय पक्षांबाबत केलेल्या विधानाची पुन्हा एकदा चर्चा होते.  सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्यापासून दूर राहिलं पाहिजे.. कारण सरकार म्हणजे विषकन्या असते असं मोठं विधान नितीन गडकरींनी केलंय.. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या भरोशावर राहू नका असा सल्लाही नितीन गडकरींनी उद्योजकांना दिलाय.. नागपूरमधील विदर्भ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट कौन्सिलच्या कार्यक्रमात ते बोलत होते..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ramdas Kadam On Uddhav Thackeray : हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दापोली मतदारसंघातून उभं राहावं असं आव्हान रामदास कदम यांनी दिलंय.. दापोलीतील जनता आदित्य आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार असल्यांची रामदास कदम म्हणालेत. ठाकरेंनी आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचंही कदम म्हणालेत... तर आनंद दिघे यांचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं असा आरोपही त्यांनी केलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीवर CCTVची नजर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ulhasnagar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अखेर ६ दिवसानंतर काल उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. मात्र या दफन विधीला एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षानं विरोध केला होता.. त्यामुळे दफनविधीनंतर स्मशानभूमीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.. या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत.. तसंच पोलिसांकडूनही स्मशानभूमीत बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नरहरी झिरवाळांचं सरकारविरोधात आंदोलन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक झालेत.. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात नरहरी झिरवाळ आजपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. धनगर आरक्षण तसंच पेसाभरतीच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मंत्रालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार आहेत. मंत्रालयाजवळी गांधीपुतळ्याजवळ सकाळी 10वाजता त्यांचं हे आंदोलन सुरु होणार आहे.. त्यांच्या या आंदोलनात राज्याती विविध आदिवासी संघटनाही सहभागी होणार आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जागावाटपात आम्ही मविआच्या खूप पुढे - सुनील तटकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sunil Tatkare : विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा खूप पुढे गेलीय. जागा वाटपात आम्ही महाविकास आघाडीच्या कोसो दूर पुढे सहमतीवर आलो असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. चर्चा अतिशय समाधानकारक असून २८८ जागा लढायच्या आणि बहुमत आणायचं या दृष्टीकोनातून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीचे विभाग निहाय मेळावे आणि जिल्हास्तरीय बैठका यांचे नियोजन पुढच्या काही दिवसात केलं जाईल, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • खासदार प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Praniti Shinde On BJP : हिंदू-मुस्लिमचा वाद भाजपने आपल्या देशात पेटवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. जात-पात-धर्मावर भाजपने राजकारण केलं ज्याला अनेकजण बळी पडले असंही त्या म्हणाल्या. आपण सगळे हिंदू आहोत, कदाचित देवधर्म मी जास्त करते मात्र धर्माच्या नावावर कधीही राजकारण करत नाही.. धर्माच्या नावावर मतदानही मागितलं नाही... लोकसभा निवडणुकीत आपल्या देशाला कीड लागली, बुरशी लागली..अशी टीका प्रणिती शिंदेंनी सरकारवर केली.ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी, उद्या कामं करणारी लोकं राहणार नाहीत अशी खंतही प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Cabinet Meeting : आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत...सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी, मृत्यूनंतर मिळणारी ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 20 लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार निर्णय...डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढवण्यात येणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यातील खासगी बालवाडी शाळांसाठी कायदा तयार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    New Law For Pre School : राज्यातील खासगी  बालवाडी शाळांसाठी कायदा तयार करण्यात आलाय.. या कायद्याचा मसुदा विधी विभागाकडे पाठवण्यात आलाय.. येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा कायदा मंजूर होणं अपेक्षित आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी दिलीये.. येत्या शैक्षणिक वर्षापासून बालवाडीच्या मुलांना शिक्षण विभागाचा अधिकृत अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पुस्तकही तयार करण्यात आलीत.. कायद्याची अंमलबजावणी झाली की बालवडी शाळा सुरु करण्यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे.. तसंच सरकारनं तयार केलेला अभ्यासक्रमच शिकवावा लागणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मविआची जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक

    Mumbai Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक आज होणार आहे...मुंबईत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे..  गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सलग 2 दिवस मविआच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या जागावाटप संदर्भात बैठका होणारेत. गेल्या आठवड्यात तिन्ही पक्षांतील नेत्यांनी सर्व 288 जागांचा आढावा घेत चर्चा केली होती. मात्र त्यापैकी जवळपास 30 ते 35 जागांवर मविआतील पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे तिढा असलेल्या या जागांवर आता दुस-या टप्प्यातील जागावाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरेठ झिजवणे, ही भीक असते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.. त्यामुळे काही लोकं हातास आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवता हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका शिंदेंनी केलीय. लोकांना देणं माहीत नाही फक्त घेणं माहीत असल्याची टीकाही शिंदेंनी ठाकरेवर केलीय.. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले हे लक्षात ठेवा असंही शिंदे म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link