Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सोलापुरात जाहीर सभेतील भाषणापूर्वी ओवेसींना पोलिसांकडून नोटीस

Wed, 13 Nov 2024-8:43 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यात विविध मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.

Latest Updates

  • एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओविसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओविसी यांना मंचावरच नोटीस देण्यात आली.ओविसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्शोभक भाषण करू नये अशी पोलिसांची नोटीस आहे. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली. 

  • हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आहेत. तर ठाकरे कडून डॉक्टर संतोष टारफे यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. आज कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वाकोडी परिसरात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे प्रचारा निमित्त गेले असता तेथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड केल्याचा केल्याची माहिती मिळत आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करावा यासाठी माजी खासदार शिवाजी माने, स्वतः उमेदवार डॉ. संतोष टारफे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपू पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

     

  • आचारसंहितेनंतर कोल्हापूर परिक्षेत्रात तब्बल 20 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 कोटी 64 लाख रोख रक्कम, 2 कोटी 83 लाख रुपयांची दारू, 22 लाख 24 हजार किमतीचा 113 किलो गांजा, 7 कोटी 57 लाख रुपये किमतीचे 9 किलो सोने 60 किलो चांदी, 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण मध्ये 23 अवैध अग्निशस्त्र, 36 काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्रात एकूण 10 दखलपात्र आणि 15 अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे.

  • पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. 

  • पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. 

  • जालना तालुक्यातील वाघ्रुळ चेकपोस्टवर पोलिसांनी 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केलीये. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चोही बाजूने नाकाबंदी करण्यात येत आहे. दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास वाघ्रूळ जहागीर येथील नाकाबंदी दरम्यान एसएसटी पथकाने एका चार चाकी वाहनातून नेण्यात येत असलेली 3 लाख 82 हजार 170 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. दरम्यान पोलिसा़कडून चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला निर्देश

    शरद पवारांचा फोटो वापरू नका, कोर्टाचे अजित पवार यांच्या पक्षाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: 'माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही'   

    टिमलो आणि हे महाशय जागा शोधत होते कशासाठी? अदाणी साठी त्याचे दलाल बनवून तुम्ही आम्हाला फसवतात. सरकार येणार म्हणजे येणार सरकार आल की मी अदानीच्या घशातील मुंबई काढून घेणार. माझ्या कोकणचं अदाणीकरण होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही; ठाकरेंची महायुतीवर टीका

    छत्रपतींचा पुतळा म्हणजे ईव्हीएम मशीन नाही. साडेतीनशे वर्ष किल्ला उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणतात वाऱ्यामुळे पडला. केसरकर म्हणतात वाईटातून काही तरी चांगल होईल. त्यात काय चांगल होईल? केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगल होईल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महायुतीवर केली आहे.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केलेः अमित शाह

    काश्मीर हे भारताचे आहे, 370 काढून चांगले केले, राहुल बाबा, इंदिरा गांधी आल्या तेही 370 परत येणार नाही. काश्मीर अभिन्ग अंग, ते कोणी वेगळे करू शकत नाही. आता मी गृहमंत्री, त्यामुळे काश्मीरमध्ये कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होतीः शरद पवार

    लोकसभेला मोदी शहांची भाषणे ऐकून लोकांमध्ये अस्वस्थता होती. नेमकं यांच्या मनात काय हे कळत नव्हतं. या लोकसभेत मात्र यावेळी तुम्ही प्रचंड ताकतीन आमच्या मागे उभे राहिले. 48 पैकी 31 लोक निवडून आले, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महायुतीच्या दोन्ही उमेदवारामध्ये पडली ठिणगी

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिकीट कसं आणलं याचे आपल्याकडे पुरावे आहेत. त्यांचे वरिष्ठ काही बोलत नाहीत त्यामुळे आपणही बोलणार नाही दोन-तीन दिवसांमध्ये हे सगळे पुरावे आपण समोर आणू, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे. मैत्रीपूर्ण लढत असं म्हणत असले तरी ही लढत शत्रु पूर्ण असल्याचं सुरेश धस म्हणालेत

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका 

    जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांचे पूत्र राहुल लोणीकरांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मंठा तालुक्यातील उस्वद येथे राहुल लोणीकर प्रचाराला गेले असता काही मराठा आंदोलक त्याठिकाणी आले.. आणि बबनराव लोणीकर यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. मात्र मराठा आंदोलकांना राहुल लोणीकरांनी व्यवस्थित उत्तर न देता त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्याचबरोबर तुम्हाला जो लिहून देईल त्याला बिनधास्त मतदान करा असंही राहुल लोणीकर यांनी मराठा आंदोलकांना म्हंटलं आहे. त्यामुळं राहुल लोणीकर हे आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला असून जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात येणार्यांना पाडणार असं या आंदोलकांनी म्हंटलं आहे.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता

    विधानसभा निवडणुकीच्या धामधूमिमुळे राज्यातील ऊस हंगाम लांबण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर पासून राज्यातील ऊस हंगाम सुरू होणार असला तरी प्रत्यक्ष उसाचे गाळप विधानसभा निवडणुकीच्या पडघमानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याचे संबंधित नेते, चेअरमन, एमडी आणि कामगार हे निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असल्याने निवडणूक निकालानंतर प्रत्यक्षात बहुतांशी साखर कारखान्याचे धुरांडे पेटण्याची शक्यता आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे  मार्गदर्शक तत्त्वे

    सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    1 कोणतेही घर कारणे दाखवा नोटीसशिवाय पाडू नये. किमान 15 दिवसांचा अवधी द्यावा

    2 नोटीस नोंदणीकृत पोस्टाने पाठवावी, ती घराबाहेर चिकटवावी.

    3 सूचनेमध्ये नियमांचे उल्लंघन कसे झाले याचा स्पष्ट उल्लेख असावा.

    4 प्राधिकरणाने जमीनमालकाला सुनावणीची संधी दिली पाहिजे.

    5 पाडण्याच्या प्रक्रियेची व्हिडिओग्राफी असावी.

    6 डिमोलिशन रिपोर्ट डिजिटल पोर्टलवर अपलोड करावा

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाशिकमध्ये बागेश्वर धाम वीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमास विरोध

    बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कार्यक्रम असल्याचं अंनिसचा दावा

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: जोगेश्वरी राड्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    जोगेश्वरी येथे मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे व शिंदेंच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  लोकसभेनंतर विधानसभेतही राणांविरोधात पुन्हा बच्चू कडूंनी ठोकले दंड

    शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना बच्चू कडूंच बळ. येत्या 17 तारखेला बच्चू कडू आणि नयना कडू घेणार प्रीती बंड यांच्यासाठी भव्य जाहीर सभा. कडू दाम्पत्याच्या एन्ट्रीने बडनेरा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत. बडनेरा मतदार संघात बच्चू कडू एन्ट्री करत असल्याने रवी राणांचं टेन्शन वाढणार.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  महायुतीच्या उमेदवारासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा रोड शो

    शिरूर हवेली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अभिनेते सयाजी शिंदे यांचा उरुळी कांचन येथे रोडशो पार पडला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कटके यांनी मतदारांशी संवाद साधला

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईत दोन्ही शिवसेनेत राडा, मध्यरात्री दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक

    जोगेश्वरीत दोन्ही शिवसेनेत राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप होता. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभेसाठी काँग्रेसची रणनीती, देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यासाठी काँग्रेसची विशेष रणनीती. काँग्रेसचे देशातील तीन मोठे नेते महायुतीला घेरणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वेगवेगळ्या मुद्यावरून राज्यातील महायुतीला घेरणार, अशी सूत्रांची माहिती आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणी  

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती सुर्यकांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर होईल. हे खंडपीठ दुपारी १ वाजेपर्यंत बसणार आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

    पुण्यातील रक्तपेढ्यामधील रक्तसाठा कमी असल्याने रक्त टंचाईचे सावट पुण्यात निर्माण झाले आहे. केवळ 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच रक्त साठा शिल्लक आहे. दिवाळी सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होतो आहे.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात अचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

    पुण्यातील खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी  भरारी पथकाने कारवाई केली आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज ठाकरेंची आज पुन्हा वरळीत सभा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा वरळीत सभा घेत आहेत. संदीप देशपांडे हे वरळीतून उभे आहेत. संध्याकाळी 6 वाजता जांबोरी मैदान येथे ही सभा होत आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ

    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिका लॉटरी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी वेळ लागत असल्याने ही मुदत वाढ देण्यात आलीय

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा

    आज उद्धव ठाकरे यांच्या तीन सभा कोकणात होत आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे ठाकरेंच्या सभा होणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार या कडे लक्ष?

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates : अमित शहा यांची आज जाहीर सभा 

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून  चाळीसगाव मतदार संघातील महायुती भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची चाळीसगावमध्ये जाहीर सभा, चारच दिवसात आमित शहा दुसऱ्यांदा जळगावमध्ये आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link