Maharashtra Breaking News Today LIVE Updates : सिन्नरमध्ये माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर गोळीबार
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्य-देशभरातील आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज चौथा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
Latest Updates
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र
उसाच्या एफआरपीमध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का ? या याचिकेची सुनावणी का लांबत आहे - शेट्टींचा सवाल..
वकिलांमार्फत संबंधित प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचा अर्ज केला असताना देखील सुनावणी का होत नाही? न्यायदेवता न्याय देणाऱ्यांच्यासाठी आहे का ? एफआरपीच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार केंद्राला असताना राज्य सरकारने तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
ज्या न्यायाधीशांकडे मी याचिका दाखल केली त्यांना गेल्या दोन वर्षात निर्णय घ्यायला का वेळ लागत आहे अशी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना यांना पत्राद्वारे विचारणा करण्यात आली आहे.
संबंधित न्यायाधीशांना या विषयाचे गांभीर्य नसेल तर त्यांना देखील तीन टप्प्यात पगार द्यावा अशी राजू शेट्टी यांची मुख्य न्यायाधीशांना विनंती.
अमित शाहांविरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन
अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध इंडिया आघाडीकडून व्यक्त करण्यात आला आहे. अमित शहा यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन केलं जातंय. संसदेच्या मकरद्वाराजवळ विरोधकांचं आंदोलन सुरु आहे. यावेळी विरोधी पक्षांचे खासदारं भींतीवर चढून आंदोलन करताना दिसून आलंय. नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून खासदारांचं आंदोलन
सिन्नरमध्ये माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर गोळीबार
सिन्नरमध्ये माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर गोळीबार. हल्ल्यात सागर लोंढे थोडक्यात बजावले. तर एका हल्लेखोराला अटक आणि तिघे फरार आहेत.
मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर मेरिटाईम बोर्डाला जाग
मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर मेरिटाईम बोर्डाला जाग. मुंबईतून सुटणाऱ्या बोटींची कसून चौकशी करणार. नियम मोडणाऱ्या बोटींचा परवाना रद्द करणार.
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार
विधानपरिषद सभापती म्हणून राम शिंदेंची निवड झाली आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोकांचे आभार मानले आहे. कारण त्यांनी राम शिंदे हे बिनविरोधी विधानपरिषद सभापती झाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात मुका आंदोलन सुरू
अमित शहा यांच्या संसदेतील वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच मूक आंदोलन केले जात आहे. संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत आंदोलनाला सुरुवात केली. पुण्यातील ससून रुग्णाला समोरील आंबेडकर पुतळा जवळ आंदोलनाला सुरुवात झाली.
का होतंय हे आंदोलन?
-परभणी येथे पवित्र संवेदनाची विटंबना व आंबेडकरी जनतेवर झालेला अत्याचाराचा निषेध
-बीड जिल्ह्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध
-अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याविरोधात मूक आंदोलन
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे होण्याचे अध्यक्ष आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
- माथाडी कामगारांनी गाडीतून कांदा उतरवण्यास नकार दिल्याने शेतकरी संतप्त
- संताप्त शेतकऱ्यांचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य चौकात रास्ता रोको
- शेतकऱ्यांनी आपली वाहने महामार्गाच्या आडवी लावत केली आंदोलनाला सुरुवात
- बाजार समितीत सर्व लिलाव सुरू मात्र कांद्याचाच बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समाजमाध्यमावरून जीवे मारण्याची धमकी. नोएडा पोलिसांकडून धमकी देणाऱ्याला अटक. बांगलादेशस्थित आरोपीकडून हत्यारंही जप्त.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक प्रतिक्रिया देत आहे. सकाळी दहा वाजता संविधान चौकात महाविकास आघाडी आंदोलनाला सुरुवात.
महाआघाडीतील पक्षांचे आमदार संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन.