Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

Fri, 23 Aug 2024-10:31 pm,

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राबरोबरच देशभरातील राजकीय, समाजिक आणि दैनंदिन घडामोडींसंदर्भातील क्षणोक्षणाच्या लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

Latest Updates

  • उद्धव ठाकरे उद्या तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Maharashtra Band : मविआने उद्याचा बंद मागे घेतलाय.. शरद पवार आणि काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनीही उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केलाय.. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं.. मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मग शरद पवार तसंच काँग्रेसनेही बंदमधून माघार घेतली होती. उद्धव ठाकरेंनीही मग बंद मागे घेण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे स्वत: उद्या सकाळी 11 वाजता आंदोलनात उतरणार आहेत.. शिवसेना भवन चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • उद्धव ठाकरे उद्या तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Maharashtra Band : मविआने उद्याचा बंद मागे घेतलाय.. शरद पवार आणि काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनीही उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केलाय.. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं.. मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मग शरद पवार तसंच काँग्रेसनेही बंदमधून माघार घेतली होती. उद्धव ठाकरेंनीही मग बंद मागे घेण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे स्वत: उद्या सकाळी 11 वाजता आंदोलनात उतरणार आहेत.. शिवसेना भवन चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • उद्धव ठाकरे उद्या तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Maharashtra Band : मविआने उद्याचा बंद मागे घेतलाय.. शरद पवार आणि काँग्रेसनंतर उद्धव ठाकरेंनीही उद्याचा बंद मागे घेण्याची घोषणा केलाय.. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं.. मात्र मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मग शरद पवार तसंच काँग्रेसनेही बंदमधून माघार घेतली होती. उद्धव ठाकरेंनीही मग बंद मागे घेण्याची घोषणा केली. मात्र उद्धव ठाकरे स्वत: उद्या सकाळी 11 वाजता आंदोलनात उतरणार आहेत.. शिवसेना भवन चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • प्रविण दरेकरांची मविआने महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया - 

    - उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं, त्यांचे आभार
    - राजकारण करायला वेळ आहे
    - दुर्दैवी प्रसंगाचा फायदा घेऊन विकृत मानसिकतेतून राजकीय पोळी भाजणे किळसवाणे
    - विरोधाला विरोध करू पण हा विरोध दुर्दैवी
    - संप करून राजकीय पोळी भाजयचा प्रयत्न होता
    - कोर्टाने चांगली चपराक दिली आहे
    - पृथ्वीराज चव्हाण यांनी कोर्टाबाबत दिलेलं विधान या भूमिकेतून मागे घेतलं
    - संविधानाच्या नावाने गळा घोटणारे हे लोक
    - देर आए दुरुस्त आए

  • ड्रग्स मध्ये कुठलाही पोलीस कर्मचारी वा अधिकारी मदत करताना आढळला तर त्याला निलंबित ऐवजी थेट बडतर्फ करण्यात येण्याचा राज्य सरकारचा निर्णय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

  • उद्धव ठाकरेंकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

    उद्धव ठाकरेंनी उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता न्यायालयाने दाखवावी असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

     

  • Maharashtra Bandh: बंद मागे घ्यावा, शरद पवारांचं आवाहन

    बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

    हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.

  • काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांना उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या एक दिवस आगोदर पोलिसांकडून नोटीस जारी. याप्रमाणे मुंबईत अनेक नेत्यांना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना स्थानिक पोलिस स्टेशन कडून नोटिस दिल्याची माहिती आहे

     

  • एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

    - बदलापूर प्रकरणात आरोपींना सोडणार नाही
    - राज्यात काहीतरी घडविण्याचे षडयंत्र सुरू आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - कोर्टाने बंद करता येणार नाही असे सांगूनही विरोधक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहात

    - काही जणांना मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी घाई झाली आहे. त्यातून लोकांना बंद करून वेठीस धरले जात आहे. 

  • महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांमध्ये सरन्यायाधीश डी के उपाध्याय म्हणाले, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला बंद पुकारण्यापासून रोखत आहोत”. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. 4.30 वाजता निकाल दिला जाणार आहे. 

  • घाटगेंच्या भेटीसाठी जयंत पाटील कागलमध्ये

    समरजीत घाटगेंच्या भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापूरमध्ये दाखल. कोल्हापूर विमानतळावरून कागल कडे झाले रवाना. समरजित घाटगे यांची कागल मध्ये घेणार भेट.

  • बदलापूर अत्याचार प्रकरण : 'त्या' शाळेविरुद्ध मोठी कारवाई

    बदलापूर अत्याचार प्रकरण : माहिती दडवल्याप्रकरणी शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाच्या तपासासाठी शासनाने नेमलेल्या एसआयटीने गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 48 तास दिले तर पोलीस...; राज ठाकरेचं विधान! बदलापूरचाही उल्लेख

    48 तास दिले तर पोलीस मुंबई साफ करुन देतील असं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिलेल्या भाषणामध्ये बदलापूर प्रकरण आपल्याच पदाधिकाऱ्यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या हातात एकदा सत्ता द्या कायद्याची भीती काय असते ते दाखवतो, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

  • महाराष्ट्र बंद : उद्या लोकल ट्रेन, बस बंद ठेवायला हवी- उद्धव ठाकरे

    लोकल आणि बस सेवा उद्या बंद ठेवायला हवी, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोध करण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी दिली आहे. याच बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. 

  • राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरमध्ये; पोलिसांची चौकशी करणार

    दिल्लीहून राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे पथक बदलापूरसाठी सकाळीच रवाना झालं आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे सचिव सदस्य रूपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कातायानी आनंद बदलापूरला रवाना झालेत. बदलापूर बाल अत्याचार प्रकरणात पोलीस ठाणे, शाळा प्रशासन यांची चौकशी हे आयोग करणार आहे. आयोगाचे पदाधिकारी पीडितेच्या पालकांची भेट घेणार आहेत. आजच हे पथक बदलापूरला पोहचणार आहे.

  • राज ठाकरेंनी रद्द केली यवतमाळमधील पदाधिकाऱ्यांची बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द केली आहे. या बैठकीसाठी जिल्हाभरातून पदाधिकारी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत समारोहात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

  • रविकांत तुपकर पत्नीसहीत पोलिसांच्या ताब्यात

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नीस आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रविकांत तुपकर यांनीच ही माहिती दिली आहे. आज रविकांत तुपकर यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार असं जाहीर करण्यात आलेलं. या आंदोलनापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन उद्धव विरुद्ध काँग्रेस?

    महाविकास आघाडीत सध्यातरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको, अशी भूमिका काँग्रेसने मांडली असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या किमान चार भिंतीआड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याच्या भुमिकेनंतर काँग्रेस नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेत्यांची ही भूमिका  उद्धव ठाकरे यांना मान्य होणार का? हे पहावं लागणार आहे.

  • राज्यसभा बिनविरोध; दोन्ही महायुतीचेच उमेदवार 

    राज्यसभेच्या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उमेदवार न दिल्याने बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र अर्ज पडताळणीमध्ये अपक्षांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची निवड झाल्याने आता राज्यसभेत अजित पवार यांच्या खासदारांची संख्या 3 वर गेली आहे.

     

  • एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला

    एमपीएससी संदर्भातील प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी एमपीएससी चे विद्यार्थी शरद पवार यांना भेटायला पोहोचले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ही भेट घडत आहे. 25 तारखेला तरी परीक्षा पुढे ढकलण्यासह संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवा विभागातील पदांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. मात्र काही बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे. शिवाय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आणखी काही प्रश्न आहेत. त्यामुळे स्वतः शरद पवार यांनी या विषयात लक्ष घालण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात विद्यार्थी आले आहेत. रोहित पवार देखील त्यांच्यासोबत आहेत.

  • संजय राऊतांच्या आज तीन सभा

    खासदार संजय राऊत आज धरणगाव, अमळनेर आणि जळगावात सभा घेणार. आज संजय राऊत यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात संजय राऊत यांचा दौरा. ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

  • जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीसाठी 400 निरीक्षक

    जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीसाठी 400 निरीक्षक तैनात करण्यात येणार. केंद्रीय निवडणूक आयोगाने  जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या 400 हून अधिक निरीक्षकांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान बनावट प्रक्रियेपासून सावध राहण्यास सांगितले. आयोगाने निरीक्षकांना सल्ला दिला आहे की, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या अशा विधानांना त्वरित प्रतिसाद द्यावा. 

  • विनेश फोगटची सुरक्षा काढल्याचा दावा

    विनेश फोगट यांनी दिल्लीत महिला कुस्तीपटूंना मिळणारी सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट यांनी गुरुवारी गंभीर आरोप केला की दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना, त्यांच्यासह, मिळणारी सुरक्षा काढून घेतली आहे. या महिला कुस्तीपटूंनी माजी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्लीत न्यायालयात साक्ष देणार आहे. विनेश फोगट आणि तिची चुलत बहीण संगीता फोगटयांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला आणि त्यानंतर माजी WFI प्रमुखाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाने मोठे लक्ष वेधले असून पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे आज होणार होणार आहे. विनेश फोगटच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असून, उपायुक्त पोलिसांनी "कुस्तीपटूंना दिलेली सुरक्षा काढून घेतलेली नाही," असं सांगितलं आहे. 

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून अमेरिका दौऱ्यावर

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.  यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन लॉयड यांची भेट घेणार आहेत. संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा होईल. याशिवाय संरक्षण मंत्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयक सहाय्यक जेक सुलविन यांची भेट घेणार आहेत.

  • नाशिकमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक

    सकाळी 10 वाजता महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

  • शिंदे-फडणवीस-पवार आज नाशिकमध्ये

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमधील कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. महिला सशक्तीकरण अभियानाला कार्यक्रमाला हे नेते उपस्थित असणार असून हा कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता होणार आहे.

  • शनिवार-रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

    येत्या शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. ठाणे व रायगडला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या सोमवारी 26 ऑगस्टला गोकुळअष्टमी आहे तर मंगळवारी दहिकाला उत्सव साजरा केला जाणार आहे.

  • दहावी-बारावी फेरपरीक्षेचा आज निकाल

    दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.inwww.mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसरया दिवसापासून गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल, त्यासोबतच शुल्कदेखील भरता येईल.

  • ‘मंकीपॉक्स’साठी सेव्हन हिल्स रूग्णालयात स्वतंत्र कक्ष आरक्षित

    मुंबईमध्ये अद्याप ‘मंकीपॉक्स’चा एकही रूग्ण आढळलेला नाही. मात्र विदेशातून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सावधगिरी म्हणून मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स रूग्णालयात 14 खाटा असलेला कक्ष आरक्षित ठेवला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

  • वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 43 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

    नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात 43 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा नीट परीक्षेत राज्यातून तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रवेशाच्या नोंदणीसाठी शुक्रवारी अंतिम दिवस आहे. यंदा नीट परीक्षेत तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थी राज्यातून पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या 10 ते 11 हजाराने अधिक आहे.

  • बेस्टच्या कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन मागे

    बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील डागा एसएमटी – एटीपीएल भाडेतत्त्वावरील बस चालकांचा पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर मागे घेण्यात आले. चालक हळूहळू कर्तव्यावर दाखल झाल्यानंतर विस्कळीत असलेली बस सेवा पूर्ववत झाली.

  • गणेश आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा

    गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मास्टिक पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.

  • रात्री उशीरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. जवळपास एका तासाहून अधिक काळ ही बैठक चालली. बैठकीत 24 तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्यातील महिला व लहान मुलींवर होणारे अत्याचार, लाडकी बहीण योजनेबरोबरच सुरक्षित बहीण या विरोधकांच्या नरेटिव्हवरुन चर्चा झाली, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link