Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

Sun, 20 Oct 2024-5:35 pm,

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडीचा थोडक्यात आढावा एका क्लिकवर पाहा LIVE UPDATES...

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया राज्यातीस व देश विदेशातील लाइव्ह घडामोडी. 

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

    महायुतीत भाजपाने आपली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपली यादी पहिली यादी उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील नावांवर शिक्कामोर्बत होणार आहे.  

  • Maharashtra Breaking News LIVE: भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर झालीये.. भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीये.. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीये.. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये.. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीये.

  • Maharashtra Breaking News LIVE: भाजपची पहिली यादी जाहीर 

    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर 2019 मध्ये तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभेतून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का

    बीड जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या काळामध्ये राजेंद्र मस्के यांचा राजीनामा. मस्के यांनी सोशल मीडियावर आपण राजीनामा देत असल्याचे केल जाहीर. विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळत नसल्याने राजेंद्र मस्के नाराज.

  • Maharashtra Breaking News LIVE: आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवणार : मनोज जरांगे

    अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक सुरु आहे. आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवणार. असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: कोल्हापुरात मंदिर विहिरीत कोसळून पुजा-याचा मृत्यू

    कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे गावात एक विचित्र अपघात झालाय.. दांगट मळा इथं नृसिंहाचं मंदिर थेट विहिरीत कोसळलंय.. या दुर्घटनेत मंदिरातील पुजा-याचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय.. कृष्णात उमराव दांगट असं या पुजा-याचं नाव आहे.. विहिरीच्या कडेलाच हे 20 वर्ष जुनं मंदिर होतं.. सकाळी पुजारी मंदिरात आले असता संपूर्ण मंदिरच विहिरीत कोसळलं.. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालीये. 

  • Maharashtra Breaking News LIVE: विदर्भातील 12 जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

    ठाकरे गटाने विदर्भातील 12 जागांवर दावा केला आहे. काल झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने ठाकरे गट नाराज असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मविआमधील धुसफुस कायम, बैठकीनंतरही जागावाटपावर तोडगा नाही

    शिवसेना आणि काँग्रेसचे जागावाटपात जमेना. 10 तासांच्या बैठकीनंतरही जागावाटपावर तोडगा नाही. शिवसेना ठाकरे गटाने बोलावली तातडीची बैठक. मविआमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले नसल्याचे चित्र. 

  • Maharashtra Breaking News LIVE:   इंदापूर शहरात झाला हर्षवर्धन पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील प्रचाराचा शुभारंभ इंदापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या इंद्रेश्वराला श्रीफळ वाढवून करण्यात आलााय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा नेत्या अंकिता पाटील ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आलाय

  • Maharashtra Breaking News LIVE:  मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक

    मातोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता ठाकरे गटाची तातडीची बैठक. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाच्या नेत्यांची बैठक. जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत होवू शकते चर्चा

  • Maharashtra Breaking News LIVE:  काँग्रेस नेत्यांचा दिल्ली दौरा; बैठकीत उमेदवारांच्या नावांची चर्चा होणार?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या जवळपास सर्वच जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे.  

  • Maharashtra Breaking News LIVE:  संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती 

    काल रात्री आलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदा घाटा परिसरात असलेले मंदिर हे पाण्याने वेढले गेलेले आहे. दोन दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

  • Maharashtra Breaking News LIVE:  खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प, अनेक वाहने बंद पडली

    खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने घाटात अडकून पडली आहेत. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि साताऱ्याचा दिशेने वाहने निघाली असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यात भात शेतीचे मोठं नुकसान

    ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडा पडलेला परतीच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत . जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन भात लागवडी खाली आहे . यातील 80 ते 90 टक्के शेतीचे या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे . 

  • Maharashtra Breaking News LIVE: माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक निवासस्थानी दाखल. बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक. या आधी देखील अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती... त्यामुळे येत्या 2-3 दिवसांत माढा मतदारसंघात दादांना धक्का बसण्याची शक्यता.

  • Maharashtra Breaking News LIVE: आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेने साडेपाच हजार कर्मचारी देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार हे कर्मचारी दिले जाणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: - सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात 

    सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात. जिल्ह्यातील चार ते पाच जागा लढवण्याचा दुसऱ्या आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचा निर्णय. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर तिसऱ्या आघाडीतून प्रहार जनशक्ती पक्षाचा दावा.

  • Maharashtra Breaking News LIVE: आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई 

    राज्य विधानसभा निवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर होतात आचारसंहिता लागू झाली आहे या काळात गैर व्यवहार होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोग अलर्ट मोडवर आहे गेल्या चार दिवसात निवडणूक आयोगाच्या पथकाने बेहीशेबी १० कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम तसेच मद्य जप्त केले आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: गडचिरोली पोलिसांपुढे नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण

    गडचिरोली पोलिसांपुढे एका नक्षल दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे यातील पुरुष हरियाणा राज्यातील रहिवासी आहे तर महिला मूळ गडचिरोली जिल्ह्यातील आहे. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे आजवर एकुण 676 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: लॉरेन्स बिष्णोईच्या नावे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकी

    पुण्यात एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई  टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची  खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफ व्यवसायकाला ई मेल पाठवून धमकी देत खंडणी मागितली. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच नाव वापरत खंडणी मागण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पुणे गुन्हे शाखेकडे करण्यात आलीय. त्यानुसार पुणे सायबर पोलीसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: रामटेकच्या राखी तलाव चौकात भीषण अपघात, एकाचा मुत्यु

    रामटेक तुमसर मार्गावर गोंदिया येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) च्या अधिकाऱ्याची कार क्रमांक एमएच 31 एफआर 1115 ही गोंदियावरुन रामटेक दिशेने जात असताना रामटेक बायपास येथील राखी तलाव चौकामध्ये मोटरसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारवरील नियंञण सुटले.  कारने चौकालगत असलेल्या भेलपुरीच्या ठेल्याला धडक देत पुढे ती कार मोटार सायकल रिपेरिंग गॅरेज ला जाऊन आदळली. यामध्ये भेलपुरी ठेल्याजवळ उभे असलेले लखन शेखर भोसले वय ३५ वर्ष यांचा घटनास्थळी मुत्यू झाला.

  • Maharashtra Breaking News LIVE: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाः भावेश भिंडेला जामीन मंजूर

     

    Maharashtra Breaking News LIVE: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक केलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. भिंडेने यापूर्वी अटकेच्या कारवाईला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र त्याची अटक कायदेशीरच असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या अर्जावर न्यायाधीश व्ही. एम. पाठाडे यांनी निर्णय दिला. घाटकोपरमध्ये १३ मे रोजी होर्डिंग कोसळून १७ लोकांचा मृत्यू तर ८० हुन अधिक लोक जखमी झाले होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link