कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Oct 20, 2024, 16:20 PM IST
1/6

पोषक तत्व

पोषक तत्वांनी युक्त कच्ची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.   

2/6

कच्ची केळी

पिकलेल्या केळीप्रमाणेच कच्ची केळी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची केळी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. 

3/6

निरोगी केस

कच्ची केळी ही व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे दोन्ही जीवनसत्त्वे केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जातात. 

4/6

रक्तदाब

पोटॅशियम भरपूर असल्याने कच्ची केळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे रोज कच्ची केळी खावी. 

5/6

पचन

कच्ची केळी आहारातील फायबरचा समृद्ध स्त्रोत मानली जाते. जर तुम्ही रोज कच्ची केळी खाल्ली तर तुमची पचनशक्ती सुधारू शकते. 

6/6

कर्करोग

कच्च्या केळीमध्ये निरोगी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्याची क्षमता असते. अशा स्थितीत जर तुम्ही ही केळी खाल्ली तर किडनीचा कर्करोग टाळता येतो.