Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

नेहा चौधरी Fri, 30 Aug 2024-8:14 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Latest Updates

  • Badlapur News : जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याचा सत्कार करू! बदलापुरात सकल मराठा समाजाची घोषणा

    बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आंदोलन केले. यावेळी सदर घटनेचा निषेध करताना "शिवरायांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पडण्यास कारणीभूत ठरलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं जो कोणी छाटून आणेल, त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू", अशी घोषणा यावेळी सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी केली आहे. तसेच सकल मराठा कार्यकर्त्यांनी दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या पत्रात  केली आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले. 

  • मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

    मीरा भाईंदरमध्ये भाजप जिल्हा सचिव राजन पांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. राजन पांडे यांच्या पोटात व मानेवर चाकू खुपसण्यात आला असून यात अजून एक जण जखमी झाला आहे. भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत सदर घटना घडली असून राजन पांडे यात गंभीर जखमी झाले आहेत.  पांडे यांना मिरारोड मधील वॉकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे समर्थक म्हणून राजन पांडे यांना ओळखलं जातं. अंतर्गत वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हल्ला करणाऱ्याचे नाव विनोद राजभर असे सांगण्यात येत आहे. 

  • पीओपी गणेशमूर्तींना तूर्तास बंदी नाही, सर्वसामान्यांना हायकोर्टाचा दिलासा

    7 सप्टेंबर रोजी घरोघरी गणपतीचं आगमन होणार असून यासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मात्र पीओपी गणेशमूर्तींबाबत ग्राहक आणि मूर्तिकारांमध्ये संभ्रमावस्था होती. अखेर मुंबई हायकोर्टाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. पीओपी गणेशमूर्तींना तूर्तास बंदी नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केलंय. मात्र येत्याकाळात पीओपीबाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जावं अशा सूचना कोर्टाने दिल्या. तसेच यापुढे गणेश मंडळांना परवानगी देतानाचा पीओपी बंदीची अट घालणं आवश्यक असल्याचं हायकोर्टाने नमूद केलं आहे. 

  • वाढवण बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पडले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बंदर देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल असे म्हंटले. मोदी भाषणादरम्यान म्हणाले की, "भारताच्या विकासासाठी हा मोठा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले गेलेत, यासाठीच वाढवण बंदराचे भूमिपूजन केले.  वाढवणं बंदर हे देशातील सर्वात मोठा कंटेनर पोर्ट होईल. देशात सध्या जेवढे कंटेनर येतात जातात, त्यापेक्षा जास्त कंटेनर इथं येतील जातील. या क्षेत्राची ओळख आता फोर्टप्रमाणे पोर्ट अशी होईल". तसेच मोदी म्हणाले की, "दिघी पोर्ट विकासालाही मंजुरी देण्यात आलीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रतिक बनेल. तसेच मच्छिमारांसाठी 700 कोटींची योजना आणली गेलीये". 

  • मी शिवरायांच्या चरणी डोकं ठेऊन माफी मागतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

    शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. काही महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले होते. मात्र सोमवारी हा पुतळा कोसळला ज्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. 

     

  • वाढवण बंदरासाठी केंद्राकडून 76 हजार कोटींची तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणा दरम्यान वाढवण बंदराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुख्यमंत्री या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "वाढवण बंदरासाठी केंद्राकडून 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे". 

  • जेएनपीटीपेक्षा तिप्पट मोठं बंदर इथं होतंय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी पालघर येथील वाढवणं बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी वाढवण बंदरासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मोदींचे आभार मानले. फडणवीस भाषणादरम्यान म्हणाले की, "जेएनपीटीपेक्षा तिप्पट मोठे बंदर इथं होणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर कायम राहील. बंदर होणार नाही असं सर्वांना वाटत होतं मात्र मोदीजींच्या प्रयत्नातून हे बंदर होतंय. तसेच या बंदराला राष्ट्रीय बंदराचा दर्जा दिला जाणार आहे, या वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदी यांचे नाव इतिहासात नोंद होईल".  "या परिसरात एअरपोर्टही व्हावे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच मच्छिमारांसाठी विविध सोयी उपलब्ध करू. मच्छिमार,आदिवासींना ट्रेनिंग देवून इथं काम दिले जाईल" असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान दिलं. 

  • Vadhavan Port : इथल्या एकाही बांधवाला वा-यावर सोडणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवणं बंदराचे भूमिपूजन पार पडणार आहे. यासाठी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी पालघरमध्ये दाखल झाले. या भूमिपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना म्हंटले की, '35 वर्षांपासून हे बंदर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. मोदी साहेबांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत वाढवण बंदर प्रकल्प मंजूर केला, या बंदरामुळे लाखो रोजगार निर्माण होतील. तसेच इथल्या एकाही बांधवाला वा-यावर सोडणार नाही असे वचन देतो'.  अजित पवारांनी या बंदराचे वैशिष्ट्य सांगताना म्हंटले की, 'समुद्राच्या आत 10 किमी हे बंदर होणार असून हे जगातील 10 बंदरांपैकी एक असेल'. 

  • India Breaking News LIVE : शरद पवारांनी Z प्लस सुरक्षा नाकारली

    केंद्र सरकारनं दिलेली झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारलीये.. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर गृह मंत्रालयाचे अधिकारी दिल्ली इथं शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.. 15 अधिका-यांनी याबाबत शरद पवारांशी चर्चा केली.. मात्र त्यानंतर शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला.. 

     

  • Kolhapur Gokul Live : गोकुळच्या सभेत गोंधळ 

    कोल्हापुरात गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आहेत. गोकुळ दूध संघात मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील याची एकत्रित सत्ता आहे. हे दोन्ही नेते राज्यात विरोधात तर गोकुळ दूध संघात एकत्र आहेत. विरोधक हळूहळू गेटच्या बाहेर जमू लागले आहेत.

  • MODI LIVE : गोकुळ सदस्यांचा वाढवण बंदर भूमिपूजन स्थळी गोंधळ 

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध आहे. तर वाढवण बंदर भूमिपूजनाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे मुंबईसह वाढवण बंदर परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. बीकेसीमध्ये काँग्रेस आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धडपकड करण्यात आली आहे. आंदोलनापूर्वी वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. वाढवण बंदर भूमिपूजन सभे स्थळी गोकुळच्या सदस्यांनी एकच राडा केलाय. 

  • Vadhavan Port : वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांचं आंदोलन

    पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये दाखल होणार आहेत. मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या बोटीत काळे फुगे लावलेले आहेत.या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलनं करण्यात आलेली होती. 

     

  • MODI LIVE : 'जगात फिनटेकमध्ये भारत एक उदाहरण म्हणून पाहिलं जातं'

  • MODI LIVE : 'मुद्रा लोन घेणाऱ्यांत 70 टक्के महिला आहेत'

  • MODI LIVE : 'महिला सशक्तीकरणासाठी नव्या संधी आणल्या'

  • Maharashtra Breaking News LIVE:  वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  

     

  • Maharashtra Breaking News LIVE : वर्षा गायकवाड राहत्या घरी स्थानबद्ध; काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

    मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी काँग्रेसने मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर वर्षा गायकवाड यांना राहत्या घरी स्थानबद्ध करण्यात आलंय. त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांना भेटण्यास परवानगी नाही. शिवाय एका कार्यकर्त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबई काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याप्रकरणी हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे.. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीये त्यामुळे वर्षा गायकवाड संतप्त झाल्यात

     

  • PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत तणाव

    मुंबईतील बीकेसी इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानिमित्त बीकेसीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतंर पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय.

     

  • PM Modi Maharashtra Tour : 'शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा', काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

    पंतप्रधानांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी मुंबईत तणावाचं वातावण निर्माण झालंय. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी काँग्रेनं पंतप्रधानांकडे केलीये. यासाठी मोदींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. मुंबईत ठिकठिकाणी मोदींनी माफी मागावी अशी मागणी करणारे पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेत. मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हे पोस्टर्स लावलेत. दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक कार्यकर्त्यांना सकाळीच त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय.

     

  • India Breaking News LIVE : कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल

    कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर पश्चिम बंगाल सरकारचं मोठं पाऊल उचलंय. डॉक्टर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसात शिक्षा देण्यासंदर्भात ममता सरकार आणणार नवीन विधेयक आणलंय. नवीन विधेयकात 7 दिवसात फाशी देण्याची तरतूद करण्यात आलीय. 2 सप्टेंबरपासून पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ममता बॅनर्जी 3 सप्टेंबरला हे विधेयक मांडणार आहे.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : मालवणमधील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटीलला अटक  

    सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटील याला अटक करण्यात आलीये. चेतन पाटील हा या पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणनच्या पथकाने मध्यरात्री त्याला अटक केली.

     

  • PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, सभेसाठी पालघर सज्ज

    पालघरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यक्रमास्थळी दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलंय. सभामंडपामध्ये बॅग, पिशवी, पाण्याची बॉटल, खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली. नागरिकांसाठी वाहने आणि बसेस वाहनतळ व्यवस्था करण्यात आली.

     

  • Maharashtra Breaking News LIVE :  शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचं अजब विधान

    शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजब विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीया वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE :  मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

    या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. अंतापूरकर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीय. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप झाला होता. आमदार जितेश अंतापूरकर हे भाजप नेते अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण, बसवराज पाटील, अर्चना चाकूरकर यांच्या पाठोपाठ मराठवाड्यातील आणखी एका नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE :  महाराष्ट्र प्रदेश भाजपची आज महत्त्वाची बैठक 

    आज महाराष्ट्र प्रदेश भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे..संघाच्या पुढाकारानंतर भाजपच्या हालचालींना वेग आलाय. या बैठकीत मुंबईतील उमेदवारांच्या संदर्भात निश्चिती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसेच राज्यातील विभागांचा आढावा आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांबाबत माहिती सुद्धा घेतली जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोअर कमिटीचे महत्त्वाचे सदस्य उपस्थित राहणार आहे..

  • PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन करणार आहेत. सुमारे 76 हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. समुद्रात खोल पाण्यातील बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून, जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसंच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link