Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरासंदर्भातील मोठी अपडेट

Mon, 01 Jul 2024-9:00 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात व देशभरात आता मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, आता राज्याच्या राजकारणातही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर, एकीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह अपडेट्समधून

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE: दीक्षाभूमी वादावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया 

    'दीक्षाभूमीचा आराखडा स्मारक समितीच्या संमतीने तयार केला, यात आक्षेप असतील तर ते ऐकून घेतली पाहिजे. आमचा राज्यसरकार म्हणून काम कसे व्हावे असा कुठलाही आग्रह नाही, आंदोलक आणि स्मारक समितीने तोडगा काढावा. यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. दीक्षाभूमी समिती आणि आंदोकांनी ठरवावे जो पर्यंत सगळे ठरवत नाही तो पर्यंत कुठलेही काम होणार नाही', असं म्हणत सगळ्यांच्या शंकांचे निरसन व्हावे असा सूर देवेंद्र फडणवीस यांनी आळवला. 

  • Maharashtra Breaking News LIVE: दुधाच्या दरांसंदर्भातील सर्वात मोठी बातमी 

    दूध उत्पादन संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीला रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत देखील उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. दूध उत्पादन संदर्भात अनेक प्रश्नांवर इथं चर्चा होणार असून, दूध दरात वाढ करण्याची या बैठकीत शक्यता आहे. ज्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल असं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये दुधाला 30 रुपयांचे दर मिळवून देत ते स्थिर ठेवण्यावर भर दिला जाईल. यामध्ये 5 रुपये शासनाचं अनुदान असल्याचा निर्णय होऊ शकतो. 

  • Maharashtra Breaking News LIVE: कल्याणमधून गंभीर घटना समोर... 

    कल्याण पूर्व 100 फुटी चौक परिसरात गंभीर घटना घडली असून, एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संदीप राठोड असे जखमी तरुणाचे नाव असून, चार ते पाच जणांनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोळशेवाडी पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेतली. सध्याच्या घडीला जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले

    राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटलेत. प्रसाद लाड यांनी आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संसदेतील विषय असून आपल्या कामकाजाशी संबंध नसल्याचं यावेळी सभागृहात सांगितलं. त्यावेळी प्रसाद लाड दानवेंकडे हातवारे करून बोलत होते. दानवेंनी माझ्याकडे हातवारे करून बोलायचं नाही, असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. एकच गोंधळ उडाल्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. तर आपण कोणालाही घाबरत नसून काय कारवाई करायची ती आपला पक्ष करेल असं दानवे म्हणालेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? 

    घाटकोपर होर्डिंग प्रकरणात चौकशी करण्याची वेळ आल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला. तर प्रसिद्धी पाहिजे तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या ही महाराष्ट्रातील राजकारण्यांची गरज झाल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलीये. 

  • Maharashtra Breaking News LIVE: भाजपला जबरदस्त दणका 

    विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे.  सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यात वाहून गेलेला पाचवा मृतदेह सापडला 

    लोणावळ्यातील भुशी डॅम इथं पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या कुटुंबापैकी आणि एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. 

  • Maharashtra Breaking News LIVE: अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित 

    शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात मुंबई पदवीधर मतदारसंघाचे, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब सध्या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या जल्लोष सुरू आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अनिल परब  यांचा विजय निश्चित

    अनिल परब - 44791
    किरण शेलार - 18771
    लीड - 26020

  • Maharashtra Breaking News LIVE: आज माऊली, तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम कुठे?

    पुण्यात आज संत ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी मुक्कामी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगाचा प्रत्यय आज पुण्यात पाहायला मिळाला. पुण्यात सर्वधर्मीय दिंडीचा आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू मुस्लिम शिखी साई बौद्ध भिक्खू यांच्या वेशभूषेत आलेल्या वारकऱ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. या दिंडीच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. टाळ मृदंगाच्या गजरात आपण सर्वजण एक आहोत हा संदेश वारकऱ्यांनी दिला.

  • Maharashtra Breaking News LIVE: दिक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंगला विरोधातील आंदोलक हिंसक

    दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोधान आज उग्र रूप धारण केल. अंडर ग्राउंड पार्किंगला विरोध करत आज जमा झालेल्या आंदोलकांनी बांधकाम ठिकाणी तोडफोड केली. काही बांधकाम साहित्यची जाळपोळ करत पटवले. आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी पार्किंगच्या दृष्टीने चर्चेकरता आंदोलकाला बोलवले होते. मात्र समितीकडून कोणीच चर्चेला आलं नाही. त्यानंतर आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी ही पार्किंग बांधकाम सुरु असलेल्या जागी तोडफोड, जाळपोळ केली..दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र यात अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी 

    राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून, राजकीय पुनर्वसनाच्या चर्चा सुरु असतानाच विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव समोर आलं आहे. भाजपकडून 5 नावं समोर आली असून, यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांच्या नावाचा समावेश आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? राहुल गांधींचा सवाल 

    अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? अग्निवीरांना सरकार जवान समजत नाही. अग्निवीराला शहिदाचा दर्जा का नाही? राहुल गांधी यांचा भाजपप्रणित सरकारवर घणाघात. लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं गदारोळ. दिशाभूल करू नका म्हणत अमित शाह यांनी प्रत्युत्तर देऊनही राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करणं सुरूच ठेवलं. 

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेण्यासाठी पंढरपूर तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळावे यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद 

    कागदपत्र घेऊन महिला तलाठी कार्यालयात

  • विधानपरिषदेच्या जागांवरुन एकनाथ शिंदेंची डोकदुखी वाढणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी.

    संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने विधान परिषदेसाठी इच्छूक.

    लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी

  • बारामती लोकसभेचा लेखी अहवाल अजित पवारांना सादर करण्यात आला आहे. बारामती लोकसभेत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती होती, मतांची टक्केवारी किती होती पराभव नक्की का झाला याचा अहवाल अजित पवारांना सादर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस जिल्ह्याध्यक्षांनी हा अहवाल सादर केला. अजित पवार अधिवेशनानंतर बारामती लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी घेणार आढावा बैठक अहवालावर अजित पवार विधानसभेसाठी तयारी करणार आहेत.

  • सत्ताधारी आमदाराने उडविले विरोधकांचे आंदोलनांचे प्लाकार्ड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलनासाठी एकवटले

    ह्यावेळी आमदार सचिन अहिर यांनी आमदार रैम कदम यांच्यासमोर प्ला कार्ड धरला तो आमदार बांगर यांनी उडविला

    विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हातातून ही प्ला कार्ड घेत तो हवेत फेकून देतानाचा व्हीडीओ समोर आलाय

  • Maharashtra Breaking News LIVE: विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन सुरू

    सत्ताधारीही दुस-या बाजूला पोस्टर घेवून आले
    सत्ताधारी विरोधक आमनेसामने
    विरोधक आमदार सत्ताधारी आमदारांसमोर येवून करतायत आंदोलन
    पेपरफुटी,नीट विरोधात विरोधकांचे आंदोलन

  • विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज सकाळी ११ वाजता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. तर, लोकसभेत दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: कडेगाव मध्ये 30 जणांना गॅस्ट्रोची लागण,आमदार विश्वजित कदमांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

    सांगलीच्या कडेगाव मध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. एकाच दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान कडेगाव शहरामध्ये गँस्ट्रोची साथ पसरल्याची माहिती मिळताच,आमदार विश्वजित कदम यांनी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रूग्णांची विचारपूस करत आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचा सूचना दिल्या.

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात मुकामी असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकेच स्नान आणि अभिषेक

    पुण्यात मुकामी असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकेच स्नान आणि अभिषेक सुरू आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात पादुका अभिषेक करण्यात येतोय. मोठ्या भक्तीमुळे वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुका अभिषेक सुरू आहे

  • पुणे कार अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात आव्हान देणारय़...पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला सुधारगृहातून सोडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले...मात्र, राज्य गृहविभागाने पुणे पोलिसांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची परवानगी दिलीय...

  • Maharashtra Breaking News LIVE: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर  भीषण अपघात; 4 ठार

    यवतमाळच्या जिल्ह्यात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर चापर्डा गावाजवळज ट्रक आणि इनोव्हा कार मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: उपसभापतीसाठी अयोध्येतील सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस

    ममता बॅनर्जी यांनी उपसभापतीपदासाठी अयोध्येतील सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस केली आहे.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंह यांना फोन करून हा प्रस्ताव दिला आहे. सभापती निवडीनंतर आता उपसभापतींबाबत विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अवदेशकुमार यांना समोर ठेवून विरोधी  सरकारवर दबाव आणत आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: एल 3 बार मधील ड्रग्ज पार्टी प्रकरण; पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

    फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री बार मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील ड्रग्जचा पुरवठा करणारी नवी साखळी समोर येऊ लागली आहे. अक्षय स्वामी तसेच आर्यन पाटील (रा. पुणे) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: कोकण पदवीधर निवडणूक: निकालाआधीच निरंजन डावखरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर

    निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आहेत. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच लागले बॅनर. भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी लावले बॅनर. कोकण पदवीधर मतदार संघाची आज नेरूळ इथं मतमोजणी.  महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणेकरांची तहान भागवणाऱ्या  धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

    पुणेकरांची तहान भागवणाऱ्या  धरणांच्या पाणी साठ्यात वाढ.खडकवासला, पानशेत ,वरसगाव धरण परिसरात पावसामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला. प्रत्येकी अर्धा टीएमसी ने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी खडकवासला धरणातून काही प्रमाणत पाणी सोडण्यात आले आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात झिकाचा धोका वाढला; गर्भवतीला संसर्ग

    एरंडवणे परिसरातील एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. रुग्ण आढळून आलेल्या एरंडवणे आणि मुंढवा परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: शिक्षक, पदवीधरची आज मतमोजणी; कुणाची बाजी? 

    विधानपरिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी नवी मुंबईत होणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला  दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली. मंगल आणि पवित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • Maharashtra Breaking News LIVE: मत पत्रिकेसह सेल्फी घेऊन समाजमाध्यमांवर व्हायरल भाजपच्या महिला अध्यक्षावर गुन्हा दाखल

    निवडणुकीत मतदान केल्यानंतर मत पत्रिकेसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार कोकण पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या दिवशी समोर आला होता. याप्रकरणी अंबरनाथचे नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी; व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात 

    तेल कंपन्यांनी 19 किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. 30 रुपयांनी दर घसरले असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीयेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link