Breaking News Live : सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला

दक्षता ठसाळे-घोसाळकर Sun, 22 Sep 2024-1:04 pm,

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Latest Updates

  • सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला...!

    पिंपरी- चिंचवड शहरातील कारभारी वेगळा असल्याने मी इथे जास्त आले नाही. ते काम बघत होते. आले तरी कार्यक्रम घेत नव्हते. मला कोणाच्या कामात ढवळा - ढवळा करायला आवडत नाही. सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला...!
    साहेबांनी रिटायर झाल्यावर कोल्हापूर मध्ये राहण्याचा विचार होता त्यासाठी त्यांनी जागा ही घेतली होती, कारण ते साहेबांचे आजोळ आहे...

  • माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला 

    - माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - इंडिया आघाडी  त्यासोबतच इतर राजकीय विषयावर चर्चा उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यात होणार असल्याची माहिती

    - ऐन विधानसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर ही बैठक महत्वाची मानली आहे

  • मराठा आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का नाही - जरांगे
    काल मराठा समाजाच्या मुलांना मारहाण - जरांगे
    फणडवीसांना ही शेवटची संधी - जरांगे
    शाळा, दवाखान्यात जाण्याचे रस्त बंद केले - जरांगे
    भुजबळ, फडणवीस राज्य चालवतात का? - जरांगे 

  • बारामतीतून शरद पवार LIVE 

    10 दिवसांत जागा वाटप पूर्ण करणार - शरद पवार 
    आम्ही तीन पत्र एकत्र निवडणूक लढणार - शरद पवार 
    इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरु आहे - शरद पवार 
    जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू 

  • बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत. शहरात अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे मोठं मोठे बॅनर लावण्यात आलेत. तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार असे बॅनर झळकले आहे. त्यामुळे सुळे आणि युगेंद्र यांच्या बॅनरची आता राज्यात चर्चा होत आहे. 

  • विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाली आहे.  27 आणि 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौ-यावर जाणार आहे. महिन्या अखेरीस निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. 

     

  • अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा आज मोहोळ, माढ्यात आहे. अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे. 

  • मराठा आंदोलकांकडून आज जालना आणि परभणी जिल्हा बंदची हाक; तर वडीगोद्रीतून अंतरवालीकडं जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आलं आहे.  मराठा-ओबीसी वाद टाळण्यासाठी निर्णय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link