Breaking News LIVE: रायगडमध्ये एस टी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

दक्षता ठसाळे-घोसाळकर Wed, 09 Oct 2024-2:53 pm,

दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Latest Updates

  • समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत छगन भुजबळांनी दिले आहेत. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्ताने छगन भुजबळांनी शुभेच्छा देताना हे संकेत दिलेत. त्यामुळे समीर भुजबळ कोणत्या पक्षाकडून लढणार ? याकडे लक्ष लागून आहे.

  • दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. मुंबईत शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर  झळकले आहेत. या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

  • रायगड - एस टी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

    माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटातील घटना

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अपघातात 8 महिला जखमी , त्यापैकी एक गंभीर

    लाडकी बहिण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगाव इथं जाताना झाला अपघात

    रानवडे कोंड इथून 29 महिला निघाल्या होत्या कार्यक्रमाला

    जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए बालाजी खतगावकर यांनी मुखेडमधून प्रचार सुरूच ठेवलाय. तर 100 टक्के मलाच उमेदवारी मिळणार आणि मी लढणारच असा ठाम निर्धार खतगावकरांनी केलाय. मुखेडचे विद्यमान आमदार भाजपचे तुषार राठोड आहेत. मात्र विद्यमान आमदारांना विरोध करण्याचा विषय नाही, असं खतगावकरांनी म्हटलंय.

  • Bopdev Ghat Rape Case: 'तुमच्या पदाधिकाऱ्यावर महिलांचे अश्लील...'; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

    Bopdev Ghat Rape Case: सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मंगळवारी सायंकाळी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जाऊन पहाणी करत स्थानिक पोलिसांना काही निर्देश दिले.

    सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • हरियाणाच्या निकालावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया 

    हरियाणामध्ये विकासनिती जिंकली - मुख्यमंत्री
    महाराष्ट्रात बहुमत मिळेल - मुख्यमंत्री 
    महाराष्ट्रात महायुतीच जिंकणार - मुख्यमंत्री 
    महाराष्ट्रात आम्ही विविध योजना आणल्या - मुख्यमंत्री 

     

  • ... तर हरियाणाचा निकाल बदलता येऊ शकला असता; संजय राऊत काँग्रेसबद्दल स्पष्टच बोलले

    Sanjay Raut On Congress: संजय राऊत यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकांवरुन काँग्रेसचे कान टोचले आहेत. तसंच, महाराष्ट्रातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.   

    सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...

    Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...   

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 

     
     
  • शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क

    येत्या 12 तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.  या मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारलं जातं आहे. तसेच यावर्षीही दस-या मेळाव्याला  राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार असल्यानं त्यांच्यासाठी बसण्याची आसनव्यवस्था देखील करण्यात येणार आहे.

  •  सुनील केदारांच्या अडचणी वाढल्या

    नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सुनील केदारांच्या अडचणी वाढल्यात. चौकशी समितीकडून त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. ही चौकशी कोणत्याही परिस्थितीत तहकूब केली जाणार नसल्याचं समन्समध्ये म्हटलं आहे.

  • सामनातून काँग्रेसवर टीका 

    हरियाणातील पराभवावरुन सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. हरियाणात मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा काँग्रेसला फटका बसला आहे. त्यामुळे या निकालातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी धडा घ्यावा असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. 

  • अजित पवारांकडून रोहित पवारांच कौतुक 

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेत आमदार रोहित पवारांचं कौतुक केल आहे. रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये चांगलं काम करतोय, अशा शब्दांत अजित पवारांनी कौतुक केल आहे. राजकीय भूमिका बदलताना शरद पवारांनी अगोदर होकार दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली, असा गौप्यस्फोटही  अजित पवारांनी केला आहे. तर घरामध्ये पुरूष मंडळी असेपर्यंत घर एकत्र असतं विधान अजित पवारांनी केल आहे. अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

  • संजय राऊतांची हरियाणा निकाला पत्रकार परिषद 

    हरियाणात काँग्रेसचा पराभव दुर्दैवी - राऊत 
    हरियाणाच्या निकालाचा परिणाम होणार नाही - राऊत
    कोणाला स्वतःला मोठाभाऊ समजू नये - राऊत 
    निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही 
    पराभवातून आम्हाला खूप काही शिकता येईल 

     

  • पंढरपुरात भाविकांची फसवणूक

    पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाचं बनावट संकेत स्थळ....भाविकांची फसवणूक होत असल्याचं उघड....भक्तनिवास आरक्षणासाठी  HTTPS यात्राधाम डॉट ओआरजी याच संकेत स्थळाचा वापर करण्याचं आवाहन...

  • नवी मुंबईत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला खिंडार

    शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा तुतारी फुंकणार आहेत. विजय नहाटा शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान निवासस्थानी बैठक होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचं नाव देण्याचा ठराव बैठकीत पास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

     

  • अभिजीत पाटील हाती तुतारी घेणार?

    -अभिजीत पाटलांनी पुन्हा घेतली पवारांची भेट
    -अभिजीत पाटील हाती तुतारी घेणार?
    -अभिजीत पाटील माढा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक
    -अभिजीत पाटील फडणवीसांचे निकटवर्तीय

     

  • बैठकीत तिढा सोडवणार

    -काही जागांवर तिढा कायम राहिल्यास तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तिढा सोडवणार, तर उर्वरित एकमत झालेल्या जागा लवकरच जाहीर करणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    -शिवसेना ठाकरे गट १०० च्या आसपास  तर काँग्रेस पक्ष १०० पेक्षा अधिक जागा लढवण्याच्या तयारीत, तिढा पूर्णपणे सुटल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवणार हे समोर येणार

    -महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या आहेत अश्या १५४  जागा त्याच पक्षांकडे ठेवण्यात आल्यात... अगदी काही मोजक्या जागांवर फेरफार करण्यात आलाय  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link