Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटात मागील आठवड्यात एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचं प्रकरण चर्चेत असतानाच आता यावरुन राजकीय टीका होताना दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: शरद पवार मंगळवारी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी हा दुर्देवी प्रकार घडला तिथे जाऊन पहाणी करुन आले. या ठिकाणी भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली. मात्र या पोस्टवरुन आता अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटात जाऊन पोलिसांकडून नेमकं काय घडलं याची पहाणी केली. या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना सुप्रिया सुळेंनी, "बारामती लोकसभा मतदार संघातील बोपदेव घाटाला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काही दिवसापूर्वी या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले," अशी कॅप्शन दिली.
बारामती लोकसभा मतदार संघातील बोपदेव घाटाला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काही दिवसापूर्वी या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या… pic.twitter.com/ZcNqD3wLvR
— Supriya Sule (@supriya_sule) October 8, 2024
सुप्रिया सुळेंनी केलेल्या या पोस्टला कोट करुन रिप्लाय करताना रुपाली चाकणकरांनी त्यांना सुनावलं आहे. "संबंधित घटना घडून पाच दिवस झाले. पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले. मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी?" असा सवाल रुपाली चाकणकरांनी उपस्थित केला आहे.
तसेच या पोस्टला रिप्लाय करताना रुपाली चाकणकरांनी, "आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक कांग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार?" असा सवाल रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे. "आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसावर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, ते व्हिडीओ पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी 4 सायबर गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी?" असा प्रश्न रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.
नक्की वाचा >> पंढरपूरला मुक्कामी जात असाल तर सावधान! फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड; भक्त निवासाच्या...
"कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला. जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत. यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार?" असा सवालही चाकणकरांनी विचारला आहे. पोस्टच्या शेवटी त्यांनी, "झोपी गेलेल्याला जागं करता येतं. झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही म्हणून आपल्या माहितीसाठी एनसीआरबीचा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे," असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

आता रुपाली चाकणकरांच्या या टीकेला शरद पवारांचा पक्ष काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.