Maharashtra Breaking News LIVE: ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर

Mon, 12 Aug 2024-10:50 pm,

Maharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. तर एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Latest Updates

  •  शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव व रेणुका देवी सोसायटी कोट्यवधींचे आर्थिक फसवणूक प्रकरणी ते अटकेत होते. अद्वय हिरे यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मिळून जवळपास 7 कोटी रुपयांची जामीन बँकेला तारण ठेवली असा त्यांच्यावर आरोप होता. तब्बल 9 महिन्या नंतर हिरे यांना जामीन मंजूर झालाय.

  •  पेसा अंतर्गत भरती संदर्भात नाशिक मधील सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, माजी आमदार जे पी गावित, आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली . बैठकीनंतर माजी आमदार गावित यांनी 21 ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिलाय... आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पेसाभरती अंतर्गत असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालय बंद करण्याचा इशारा दिलाय 

  • चंद्रपुरात कुख्यात गुंड हाजी सरवर याचा गोळीबारात मृत्यू झाला तर त्याचा एक साथीदार शिवा 2 गोळ्या लागल्याने जखमी झालाय. हाजीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात चिकित्सा कक्षात उपटार सुरु होते. पण उपचारादरम्यान हाजीचा झाला मृत्यू झाला. आपल्या 4 साथीदारांसह हाजी सरवर हॉटेल शाही दरबार इथं जेवणासाठी गेला होता. गुंड टोळ्यांच्या वर्चस्वाच्या संघर्षातुन हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 
    या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात  मोठा तणाव निर्माण झाला होता.

     

  • आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आरक्षणाच्या भूमिकेला आमचं सहकार्य असेल. बैठकीला जरांगे, भुजबळांनाही बोलवण्याची मागणी पवारांनी केलीय. तसंच
    50 टक्क्यांवर मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राला आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद न करता केंद्राने पुढाकार घेऊन यावर मार्ग काढण्याचं आवाहन पवारांनी केलंय. 

  • पेसा भरती झालीच पाहिजे या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाले. भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर आणि माजी महापौर रंजना भानसी यांना आंदोलकांनी घेराव घातला. तसंच सरकारविरोधात गो बॅकच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून आदिवासींचं बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय.

  • मोगलांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो. महायुतीचं सरकार झालं हे त्यांना अजून हजम होत नाही. त्यांना बसता उठता, झोपेतही मीच दिसतो. ते सांगायचे सरकार पडेल आता २ वर्ष होऊन गेली. सरकार मजबुतीने उभं आहे. जे घटनाबाहय सरकार म्हणता, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनचे बॅनर कसे लावतात. हे दुट्टपी आहेत. यांना फक्त घेण माहित आहे देण नाही. आमचं सरकार देणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

  • Maharashtra Breaking News LIVE: नागपूर: वाडी- हिंगणा मार्गावरील टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला 

    शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोल नको  असा नियम असताना तसेच हिंगणा तालुक्यात 10 किलोमीटर परिसरात 3 टोलनाका  असल्याचा आरोप करत मनसेचे आक्रमक आंदोलन

  • Maharashtra Breaking News LIVE: महापालिका आयुक्तांच्या गाडीवर गटारीचे पाणी फेकत भीम आर्मीचे आंदोलन

    सोलापुरात महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीवर टाकण्यात आलं ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी. सोलापूर शहरातील भीम आर्मी पदाधिकाऱ्यांचा आंदोलन.

  • Breaking News Live Update : पालिका कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले 

    पिंपरी चिंचवडमध्ये अ प्रभाग कार्यालयात लिफ्ट मध्ये अडकले वीस मिनिटे जनसंवादासाठी आलेले नागरिक. यामध्ये शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, चंद्रकांत दादा लोंढे, गणेश दराडे,श्रीराज अन्सारी, आदी नागरिक होते.

    प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाचही नागरिक घामाघुम झाले. सुरक्षारक्षक बेजबाबदार हसत होते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

  • Maharashtra Breaking News LIVE: पिंपरी चिंचवड शहरात खड्ड्यांचं साम्राज्य; महापालिकेचा दावा फोल

    पिंपरी चिंचवड शहरामध्ये सतत सुरू असलेल्या संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रस्त्यांवर खड्डे आढळून येत आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख रविराज बडे आणि गजानन कदम त्याचबरोबर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी शिवसेना शिंदे या पक्षात प्रवेश करणार आहेत

  • Maharashtra Breaking News LIVE: सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन, महापालिका मुख्यालयावर  धडक

    कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कंत्राटी सफाई कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलंय.महापालिका हद्दीतील २७ गावांमधील जवळजवळ ४५० सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झालेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावीः शरद पवार

    मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावी. विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही त्या बैठकीत हजर राहू. मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या नेत्यांना बोलवावे. संयुक्त बैठकीतून आरक्षणाचा प्रश्नावर मार्ग काढावा. 50 टक्केच्या वर आरक्षण देण्यासाठी धोरणात बदलण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. समाजातील समंज्यास्य टिकवणे गरजेचे आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: तो पर्यंत पूजा खेडकरला अटक करु नका, न्यायालयाचे निर्देश

    पूजा खेडकर प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये, असे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. तत्काळ अटक करणे आवश्यक नाही. 21 ऑगस्टला या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार

  • Maharashtra Breaking News LIVE: विधानसभेसाठी पक्षाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरः सूत्र

    विधानसभेच्या जागा निश्चितीचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मतदारसंघात फेरबदल करण्याचेही अधिकार देवेंद्र फडणवीसांवर सोपवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: 'महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात'

    महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधान सभेची रणनीती यावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार.

  • Maharashtra Breaking News LIVE: मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे सुपारीबाजः संजय राऊतांची टीका

    मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे हे शिंदेचे भाडोत्री आहेत. ते सुपारीबाज आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या घराबाहेर आज 'जवाब दो आंदोलन'

    पुण्यातील मोदी बाग या शरद पवारांच्या निवासस्थानाबहेर मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानतळात घुसण्याचा दोघांचा प्रयत्न

    पुण्याच्या लोहगाव एअरपोर्ट वरून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बनावट तिकिटाच्या आधारे पुणे ते लखनऊ इंडिगो कंपनीच्या विमानात या दोन्ही संशयताने घुसून विमान प्रवास करण्याचा केला प्रयत्न. या दोघांनी बेकायदेशीर रित्या एअरपोर्टवर घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एअरपोर्ट पोलिसांनी त्यांना अटक केली आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस अलर्ट मोडवर

    अजित पवार यांची जनसमान यात्रा सुरू आहे. अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागामार्फत अजित पवारांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या सुरक्षित मोठी वाढ करण्यात आली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: 'अर्जुन खोतकरांनी विधानसभेत निवडून जावं आणि माझ्या जागेवर मंत्री बनावं'

    टायगर अभी जिंदा है,असं म्हणत अर्जुन खोतकर यांनीं विधानसभेत निवडून जावं आणि माझ्या जागेवर मंत्री बनावं त्यांच्यासाठी मदत करायला मी तयार आहे, असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत

    यंदाच्या खरीप हंगाम मध्ये जिल्ह्यात एकूण 4लाख 5 हजार 180 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली असून त्यामध्ये 3 लाख 7 हजार 275 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. जवळपास 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.सोयाबीन पीक चांगलं बहरले होती.मात्र मागील 15 दिवसापासून सततचा पाऊस व ढगाळ वातावरण होते. या बदलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर अळीसह इतर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे पाटील यांची नगर शहरात शांतता रॅली 

    मनोज जरांगे पाटील यांची नगर शहरात शांतता रॅली निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिवादन त्यानंतर मिरवणुक मार्गाने रॅली निघून 4 वाजता चौपाटी करंजा येथे सभा होईल

  • Maharashtra Breaking News LIVE: सुधारित पेन्शन; कर्मचारी, शिक्षक पुन्हा संपावर

    राज्य सरकारने 'सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना' जाहीर केली, मात्र आठ महिने उलटूनही शासन निर्णय जारी केला नसल्याने २९ ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात  सुनावणी

    अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पटियाला हाऊस न्यायालयानं १ ऑगस्टला पूजा खेडकर यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link