Maharashtra Breaking News LIVE : मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक

नेहा चौधरी Wed, 21 Aug 2024-9:09 pm,

Maharashtra Breaking News LIVE : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.

Latest Updates

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवालय मध्ये. मुंबईतल्या काही मतदारसंघाबाबत चाचणी सुरू असल्याची माहिती.‌ मुंबईतल्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत जयंत पाटील यांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा सुरू. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि इतर नेते उपस्थित.

  • बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची झाली तोडफोड करण्यात आली आहे. गावातील लोकांनीच परिवाराला गावा  बाहेर काढले आहे. तर, अज्ञात लोकांनी घराची तोडफोड केली आहे. 

  • शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.  यावेळी शरद पवार यांनी CRPF ची सुरक्षा स्वीकारली आहे. यापूर्वी असलेली राज्य सरकारची z+ सुरक्षा सुद्धा सोबत असेल. तसेच CRPF चे 10 जवान त्यांच्या सोबत राहणार आहेत. 

  • बदलापूरमधील एका नामांकित शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आलीय. या टीमकडून दोन्ही पीडितांच्या घरी जाऊन दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवण्यात आला. 

  • बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय...मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच काँग्रेसनं आंदोलन केलंय...पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये झटापटही झाली...

  • Badlapur Breaking News LIVE :  'जनतेच्या पैशांमधून स्वत:चं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा...'; राज ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

    जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

    बातमी सविस्तर वाचा - 'बहीण खरंच लाडकी असेल तर..', राज ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या..'

     

  • Maharashtra Breaking News LIVE :  सांगलीचे खासदार विशाल पाटीलांचं सुहास बाबर यांना महाविकास आघाडीचे निमंत्रण

    सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलंय...महायुतीचे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबरांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य विशाल पाटीलांनी केलं होतं...त्यामुळे महायुतीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती... आता त्याबाबत विशाल पाटीलांनी खुलासा केलाय...महायुतीला आपला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसून याउलट सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत खानापूर -विटा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण निमंत्रण दिल्याचे खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलंय... त्यामुळे सुहास बाबर महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का ? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरूये..

     

  • Maharashtra Breaking News LIVE :  सोलापूर  रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढताना प्रवाशाचा तोल जाऊन तो खाली पडला... पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला. गार्डने तात्काळ ब्रेक मारला आणि गाडी थांबवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झालीय. 

  • Pune Breaking News LIVE : पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    पुण्यात अजून एक अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिचावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे सगळे मित्र आहेत. मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे. 

     

  • Badlapur Breaking News LIVE : अकोल्यात शिक्षकाकडून 6 विद्यार्थीनींचा विनयभंग 

    अकोल्यात एका शिक्षकानं 6 विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय..पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद सरदार या शिक्षकाला अटक केलीये.. त्याच्यावर पॉस्कोसह विविध गुन्हे नोंदवण्यात आलेत.. हा शिक्षक 8वीच्या वर्गातील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांना स्पर्श करत होता..

    सविस्त बातमी वाचा - बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...

     

  • Badlapur Breaking News LIVE : अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

    बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीची पोलीस कोठडी आज संपली.. त्यामुळे आज त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं...  त्याला पुन्हा 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. बदलापुरातील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षयनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.. 

     

  • Badlapur Breaking News LIVE : बदलापुरातील 'ती' शाळा भाजपशी संबंधित - संजय राऊत

    खासदार संजय राऊत यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केलाय. बदलापुरातील 'ती' शाळा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. फडणवीसांच्या तोंडी SIT शब्द शोभत नाही अशीही टीका त्यांनी केली. इतकंच नाही तर कालच्या घटनेची दखल सुप्रीम कोर्टाने का घेतली नाही?  'रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना तुम्ही  गुन्हेगार ठरवता का?' असा संतप्त सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. 

     

  • Badlapur Breaking News LIVE : लाडकी बहिण योजना विरोधकांच्या जिव्हारी लागल्यामुळंच बदलापूरचं आंदोलन... - मुख्यमंत्री

    बदलापुरात झालेलं आंदोलन राजकीय दृष्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय.. 8-9 तास आंदोलन सुरू होतं त्याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. स्थानिक कमी होते आणि इतर ठिकाणावरून गाडी भरूल लोकं आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय.. 

    सविस्तर बातमी वाचा - Badlapur School Crime: 'लाडकी बहीण योजना जिव्हारी लागल्याने बदलापूर आंदोलन'; CM विरोधकांवर संतापले

     

  • Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काय आहे परिस्थिती?

    नागपुरात आरक्षण बचाव कृती समितीने भारत बंदच्या हाकेला समर्थन देत संविधान चौकात 11 वाजेपासून धरणे आंदोलन करणार आहे... अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे... आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीसही अलर्ट मोडवर आहेत

     

  • Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर, पुण्यानंतर आता नाशिक हादरलं

    बदलापूरची घटना ताजी असतांना चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी नाशिक जिल्हाही हादरला.....नाशिकच्या सिन्नरमध्ये एका साडेचार वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. वावी गावात ही घटना घडलीय.. पोलिसांनी चिमुकलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असून आरोपीला अटक केलीये.. तर वडणेर भैरव इथं एका 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन त्याच्यावर अत्याचार करण्यात आलेत.. या प्रकरणातील आरोपीलाही पोलिसांनी अटक केलीये.. तर तिसरी घटना चांदडमध्ये घडली असून दोन अल्पवयीन मुलींचं चांदवडमधून अपहरण करण्यात आलंय.. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत... 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : आज भारत बंदची हाक 

    Bharat Bandh : दलित आणि आदिवासी संघटनांकडून आज (21 ऑगस्ट 2024) भारत बंदची हाक देण्यात आलीय. या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी घेतलाय. एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे ही बंदची हाक देण्यात आलीय. 

    बातमी सविस्तर वाचा - Bharat Bandh : आज भारत बंद! काय सुरू आणि काय ठप्प? घरातून बाहेर पडण्यापूर्वी पाहा महत्त्वाची माहिती

     

  • Maharashtra Breaking News LIVE : उद्या कोल्हापुरात सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा मेळावा 

    आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचार यात्रेच्या नियोजनात बदल करण्यात आलाय. त्यामुळे सध्या लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमांवर भर देण्याची भूमिका महायुतीच्या नेत्यांनी घेतलीय. या पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा मेळावा होणारेय. 20 ऑगस्टपासून महायुतीच्या प्रचार यात्रेला सुरुवात होणार होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित होते.

  • Maharashtra Breaking News LIVE : मविआची आज महत्त्वाची बैठक 

    मविआची आज महत्त्वाची बैठक होणारेय... महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत  विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा होणारेय. तसंच मुख्यमंत्रिपदासाठीच्या चेहरा निवडीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचं आज राज्यभर निषेध आंदोलन

    Badlapur Update :  बदलापुरात चिमुकलीवर  झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचं आज राज्यभर निषेध आंदोलन करणार आहेत. सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात बदलापूरमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर रेल रोको प्रकरणी  32 आंदोलकांना अटक

    Badlapur Update :  बदलापूर रेल रोको प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून 32 आंदोलकांना अटक केलीय. तर 300 ते 400 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. बदलापुरात चिमुकलीवर  झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काल पालक आणि बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळाला होता... बदलापूरकरांनी रेल्वे रुळांवर उतरवून लोकल सेवा नऊ तास रोखून धरली होती, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केलं होतं... आज मात्र बदलापूर रेल्वे स्टेशनची परिस्थिती सामान्य असल्याचं दिसतंय.. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link