Maharashtra Breaking News LIVE: अभिनेत्री प्राजक्ता माळींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Mansi kshirsagar Sun, 29 Dec 2024-10:06 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ठळक घडामोडींचे वेगवान अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा, एका क्लिकवर 

Latest Updates

  • अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जाऊन तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्याकांडाचा संदर्भ देताना आपला चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला. त्यासाठी सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालून कारवाई करावी अशी विनंती करण्यासाठी तिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसंच सुरेश धस यांच्यावर कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही तिनं दिलाय. 

  • मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली आहे.  माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्या पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  सुट्टीत फिरायला गेलेले पर्यटक परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीत अडकले आहेत.  कोकणातून मुंबईकडे येताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.  मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक ठप्प झाली आहे. 

  • बीड हत्याकांड प्रकरणावर पंकजा मुंडे यांचं ट्विट

    शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने, नियमाने!! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक. दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. 

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक बातमी समोर 

    बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येप्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले अशी माहिती देणारा व्यक्ती दारुच्या नशेत. दमानिया यांनी दिली होती आरोपींच्या हत्येची माहिती

  • बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग

    पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग. बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग. आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

  • EVMच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत मतांचा चोरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आरोप

    विधानसभा निवडणुकीत मतांची झालेली चोरी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. या चोरीबाबत सखोल चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने EVM मशीन व VVPAT मशीनच्या माध्यमातून झालेल्या चोरीचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे. 

  • प्राजक्ता माळी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

    अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु, अद्याप वेळ निश्चित झालेली नाहीये. 

  • कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती 

    कल्याण मधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. नियुक्ती बाबत मुख्यमंत्र्यांनी फोन द्वारे आपल्याला कळवल्याचे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले. कल्याण पोलिसांनी याबाबत आरोप पत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार अशी माहिति उज्वल निकम यांनी दिली. 

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली 

    दिल्ली पोलिसांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील घरावर सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीत उपस्थित बिहारचे विद्यार्थी बीपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नितीश कुमार यांच्या घराला घेराव घालू शकतात. त्यामुळे नितीशकुमार यांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली. अनेक विद्यार्थी संघटनांनी नितीश कुमार यांच्या दिल्लीतील घराला घेराव घालण्याची घोषणा केली आहे. 

  • मढ-कोळीवाड्यात मच्छिमारांच्या बोटीला चीनच्या मालवाहू जाहजाची धडक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार, चीनच्या CALL SING BTSJ FLAG CHA या कार्गो शिपनं शनिवारी रात्री जवळपास 12 ते 12:30 वाजता मच्छिमारांच्या बोटीला धडक दिली आहे. 

     

  • नवी मुंबई विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार

    नवी मुंबई विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. इंडिगो कंपनीचं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. धुक्यामुळे हे विमान 2 वाजता लँड होणार आहे. त्यासाठी रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामे पूर्ण झालीय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय. त्यानुसार महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात येणार असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  • विमान अपघातप्रकरणी पुतीन यांनी मागितली अझरबैजानची माफी 

    अझरबैजान विमान अपघातप्रकरणी व्लादमीर पुतीन यांनी अझरबैजानची माफी मागितलीय. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना निशाणा चुकला त्यामुळे हा अपघात झाला, असं पुतीन यांनी म्हटलंय. अझरबैजान विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हे विमान कझाकिस्तानकडे जात होतं. ही घटना अतिशय दु:खद आहे, व्लादमीर पुतीन यांनी म्हटलंय.

  • Maharashtra Breaking News LIVE: बीड- हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

    बीडच्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार करून सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी तिघा जणांवर गुन्हा दाखल झालाय. माणिक हरिश्चंद्र फड याच्याकडे परवानाधारक पिस्टल असून त्याने पिस्टलसह फोटो काढून सोशल माध्यमावर वायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला

  • Maharashtra Breaking News LIVE: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग होणार

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग संपन्न होणार आहे. आज दुपारी  इंडिगो एअरलाईनचे व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवे वर लँडिंग करणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिले विमान उड्डाण करेल असे स्पष्ट करत ही डेडलाईन चुकणार नसल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय. 

  • Maharashtra Breaking News LIVE: उल्हासनगरात मध्यरात्री २ वाजता तरुणाची गळा चिरून हत्या

    शांतीनगर भागात असलेल्या रेमंड शोरूमच्या समोरील रस्त्यावरून हा युवक रात्री दोन वाजेच्या सुमारास  अॅक्टिव्हावरून जात असताना त्याची अॅक्टिव्हा थांबवून त्याचा गळा चिरण्यात आला. या घटनेत सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला.

  • Maharashtra Breaking News LIVE: मी या अगोदरच एसपींना पुरावे दिले होतेः अंजली दमानिया

    मी जे बोलले होते त्याचे सर्व पुरावे हे पाठवले होते. तरीदेखील त्यांनी मला विचारणा केलेली आहे पुन्हा मी हे सर्व पुरावे त्यांना देणार आहे मात्र यावरून पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचं समोर येत असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटले मी जी एस पी यांना माहिती दिली त्यावरती काय कारवाई झाली याची माहिती द्यायला हवी ती मात्र दिलेली नाही

  • बीड पोलिसांची अंजली दमानिया यांना नोटीस

    बीड:स्थानिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. फरार आरोपी यांचे मृतदेह सापडल्याचे आणि पुरल्याचा अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यामुळे नोटीस पाठवली आहे. अंजली दमानियांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. माहिती व पुरावे पोलिसांकडे सादर करावे यासाठी पोलिसांकडून दमानियांना पत्र

  • प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता

    अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार दिली असून मुख्यमंत्र्यांनाही 1-2 दिवसांत भेट घेणार आहे. तसंच, करुणा मुंडेंनादेखील नोटीस दिली आहे, अशी माहिती पसमोर येत आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    बारामती ते इंदापूर मार्गे बार्शीकडे निघालेल्या बस प्रवासामध्ये अनोळखी युवकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.आरोपीने अल्पवयीन मुलीला आपल्या मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत केला विनयभंग

  • Maharashtra Breaking News LIVE: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

    लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊन ही सरकार, स्थानिक प्रशासन यांच्याकडून आळंदीमध्ये इंद्रायणी प्रदूषण रोखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. या प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून इंद्रायणी नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कसलीही कारवाई होत नसल्याच वारंवार स्पष्ट होत आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानिया आक्रमक

     संतोष देशमुख यांच्या हत्येला वीस दिवस उलटूनही आरोपी फरार असल्यामुळे आरोपींना अटक करा. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज सकाळी 10पासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावं असा आव्हान दमानिया यांनी केला आहे 

  • Maharashtra Breaking News LIVE: मेट्रोच्या कामांमुळे घोडबंदर भागात वाहतूक बदल

    घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रो मार्गिकच्या कामामुळे ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल ३० डिसेंबरपर्यंत दररोज रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत लागू असतील. ठाणे शहरात मेट्रो मार्गिका चार आणि पाचच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी कापूरबावडी भागात मेट्रोचे खांब उभारण्यात आले असून खांबावर तुळई उभारली जाणार आहेत. त्यामुळे या भागात ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात CNG च्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून दर लागू

    पुण्यात सीएनजी गॅसदरात प्रतिकिलो १ रुपया १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. शनिवार, २८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले असून, नव्या दरानुसार शहरात आता सीएनजी ८९ रुपये किलोने मिळणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  मुंबईचे हवामान बिघडले, धुरक्याची चादर, हवा खराब

    शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण प्रचंड वाढले असताना आता दररोज विषारी धुरक्याची चादर आणि हवेची गुणवत्ता 'खराब' नोंदवली जात आहे. मुंबईत आज बोरिवली, मालाड, माझगाव, कुलाबा, वरळी आणि भायखळ्यामध्ये हवेचा 'एक्यूआय' 250 च्यावर नोंदवला गेल्याने हवेची गुणवत्ता 'खराब' असल्याचे समोर आले. परिणामी सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार बळावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  वाघासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद

    वाघासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद, बार्शी अभयारण्यातील ढेंबरेवाडी परिसरात वाघ आणि बिबट्याची दहशत. शनिवारी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात कैद. टिपेश्वरहून आलेला वाघ दोन वेळा याच ढेंबरेवाडी परिसरातील कॅमेरात झाला होता कैद. वाघावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आता बिबट्या दिसून आला

  • Maharashtra Breaking News LIVE:  रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले

    थर्टीफर्स्‍ट आणि नववर्ष स्‍वागताचे वेध सर्वांनाच लागले आहेत. नववर्ष स्‍वागताचे सेलीब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या किनार्‍यांवर गर्दी केलीय. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टसचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांची सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलींग, एटीव्ही राईड्स, जायंटबॉल सारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडीमंडळीही खुश आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग होणार आहे. आज दुपारी 12 वाजता होणार व्यावसायिक विमानाचे लँडिंग  होणार आहे 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link