Maharashtra Breaking News LIVE: अमित शाहांचं `मिशन मुंबई`, दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात बैठकींचा धडाका

Sun, 08 Sep 2024-11:47 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Maharashtra Breaking News LIVE: देशासह राज्यात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. जाणून घेऊया राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Latest Updates

  • अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा

    अमित शहा यांच्या 'मिशन मुंबई'ला सुरूवात झाली आहे. अमित शहांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशातच आता दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शहांनी बैठकीचा धडाका लावलाय. भाजपची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक बोलवण्यात आलीये. तर महायुतीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Maharashtra Breaking News LIVE:लाडकी बहिण योजनेनंतर आता शिवसेनेची 'लाडकी भेट, कुटुंब भेट' मोहीम

    लाडकी बहिण योजनेनंतर आता शिवसेनेची 'लाडकी भेट, कुटुंब भेट' मोहीम. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा घरात पोहचणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मोहीमेंतर्गत घरा घरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ खाजगी बसला अपघात

    पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवाशी बसला अपघात झाला. पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्यवळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली आणि ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन आदळली. या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार कमी दाखल केल आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: पुढच्या महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते : अशोक चव्हाण

    पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असा अंदाज व्यक्त करत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांचं स्वागत

    मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 

  • अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील - अमोल मिटकरी

    अजित पवार किंगमेकर होते, आहेत आणि राहतील. तर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील असा थेट विश्वास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार 

    वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे भाजपला सोडचिठ्ठी देणार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचा त्यांनी जाहीर केलं आहे. तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.  गणपती मंडळाच्या आरतीला गेले असताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील काही महिन्यांपासून ते भाजप पक्षापासून दूर आहेत. बापू पठारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका बसणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह पीटिशनवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी

    मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या क्युरेटीव्ह पीटिशनवर 11 सप्टेंबर रोजी न्यायमूर्तींच्या बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर ही क्युरेटीव्ह पीटिशन दाखल झाली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: अभिनेता सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पा विराजमान

    अभिनेता सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. यावेळी बाप्पाची सुंदर सजावट केली. तसेच बाप्पाला धुप दिप नैवेद्य दाखवून सहपरिवारानं आरती केली. आरतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.

  • Maharashtra Breaking News LIVE: धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू

    धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू झालेत...सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग सोबतच फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय...दरम्यान लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये..

  • Maharashtra Breaking News LIVE: अभिनेत्री सई ताम्हणकरने लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अभिनेत्री सई ताम्हणकरने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. सध्या ती तिच्या आगामी 'मानवत मर्डर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या निमित्तानं बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी ती तिथे पोहोचली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: नवनीत राणा आणि रवी राणा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

    आमदार रवी राणा आणि माझी खासदार नवनीत राणा यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदात सुरू आहे. सर्व प्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली जाणार आहे. त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे त्यांची मोजदात केली जाणार आहे

     

  • Maharashtra Breaking News LIVE: एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल: अजित पवार

    आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी अर्थ विभाग आपल्याकडे  आहे तो उपयोगी पडला. विकास करून दाखवण्याची हिंमत आणि धमक आपल्यात आहे हे देखील मतदारांना सांगावे लागेल. एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल,  असे अजित पवारांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत. तुम्हाला न सांगता इतका विकास करतोय, माझा बारामतीचा विकास करत असताना कुठलाही स्वार्थ नाही, असंही पवारांनी म्हटलं आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: दरोडेखोरांच्या मारहाणीत शेतकऱ्याची हत्या, गावकरी आक्रमक

    हमदनगरच्या तिसगाव येथील भडके वस्तीवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मच्छिंद्र ससाने यांचे हत्या झाली या घटनेच्या निषेधार्थ तिसगाव येथील ग्रामस्थांनी गावबंदचे आवाहन केलं होतं माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत आज तिसगाव येथे मोर्चा काढून गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं आणि घटनेच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली या सभेत ससाने यांच्या खुनाचा तपास पोलिसांनी सात दिवसात लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे 

  • Maharashtra Breaking News LIVE: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश 

     

  • Maharashtra Breaking News LIVE: 'कृषीमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करु नये'

    धनंजय मुंडे यांच्यासोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मध्यरात्री चर्चा झाली, अस जरांगे यांनी म्हटलंय. रात्री 3 नंतर मुंडे यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन भेट घेतली. माझी भेट घेण्यासाठी कुणीही अंतरवालीत येऊ शकतो असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. कृषिमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करु नये, चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही असा चिमटा देखील जरांगे यांनी काढला आहे.  मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांशिवाय कुणाचाही होऊ शकत नाही. असंही जरांगे म्हणाले

  • Maharashtra Breaking News LIVE: धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीचे पंचनामे सुरू 

    धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन,उडीद,मुग,ज्वारी,फळबागा,भालेभाज्या चे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे आशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडुन नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तलाठी,मंडळाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नुकासानीचे पंचनामे पुर्ण करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर महिलांची स्नानासाठी गर्दी

    ऋषिपंचमीनिमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात महिलांनी स्नान करण्यासाठी गर्दी केलीये... सकाळपासूनच हजारो महिलांची रामकुंड परिसरात स्नान करत आहे...हिंदू धर्मात ऋषीपंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा हे व्रत 8 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच आज पाळले जात आहे. हा दिवस सात ऋषींना समर्पित आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

    नागपूर जिल्हातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या महादूला येथे सुरु नदीत पोहण्याच्या मोहात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृतक मुलांची नावे आहेय. ते दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत होते

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई; जीएसटीच्या अधिक्षकासह दोघांना अटक

    सीबीआयने केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिक्षकासहित दोन खाजगी व्यक्तींना लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे. सीबीआयने सापळा कारवाई करून केली अटक केली आहे. एका व्यावसायिकला लाचेसाठी तब्बल १८ तास कोंडून ठेवून अटक करण्याची भीती दाखवत ६० लाख मागितल्याचा आरोप आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा; भूगर्भशास्त्र तज्ञांकडून पाहणी

    मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडल्याने खबरदारी म्हणून मागच्या दोन दिवसांपासून सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील भूगर्भशास्त्र विभाग टिमकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेगा पडून एक बाजू दबत चालल्याची बाब येथील शेतकऱ्यांनी जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुतीमध्ये मिठाचा खडा, राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपने थोपटले दंड

    हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. हडपसरमध्ये विकासकामाचे श्रेय लाटताना भाजपला डावलले, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारा विरोधात भाजपने निदर्शने केली आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात निषेध घोषणा दिल्या आहेत. तसंच, महायुती धर्म फक्त भाजपने पाळायचा का? असा सवाल भाजप आमदार शिवराज घुले यांनी केला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातून 40 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त

    पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. कोंढव्यातून समीर शरीफ शेख याला अटक करण्यात आलीय. 

  • Maharashtra Breaking News LIVE: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचे समूहिक अथर्वशीर्ष पठण 

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचे समूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. 31 हजार महिलांचा सहभाग ऋषिपंचमी निमित्त आयोजित उपक्रम. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यांची उपस्थिती

  • Maharashtra Breaking News LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज व उद्या ते पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याचबरोबर, 9 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून नंतर लालाबागचा राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link