Breaking News Live Updates: महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी जागावाटप लवकरच

Fri, 05 Jul 2024-9:34 pm,

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर

Breaking News Live Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला असतानाच याविषयी सभागृहात खडाजंगी होणार का? अशी चर्चा आहे. त्याचबरोबर, विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकांचा मुद्दा चर्चेत आहे. देश-विदेशातील व महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा, जाणून घेऊया एका क्लिकवर 

Latest Updates

  • लवकरच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा होणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत...महाविकास आघाडीची आज वायबी सेंटर येथे बैठक पार पडली...या बैठकीला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित होते... तर विधानसभा जाहीरनाम्याबाबत चर्चा झाली आणि विधान परिषद रणनितीवर चर्चा झाल्याचंही शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं... बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, अनील देशमुख, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते...

  • कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिर 7 ते 11 जुलै पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जोतीबा देवाच्या मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया होणार असल्याने मंदिर 7 ते 11 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. पुरातत्व विभागाच्यावतीने संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार असल्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी उत्सव मुर्ती दर्शनासाठी ठेवली जाणार. जोतीबा देवाच्या मूर्तीला संवर्धन प्रक्रियेची गरज असल्याने संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती मार्फत रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे.

  • नाशिकमधील नाफेडमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचं समोर आलंय. तडकाफडकी कांदा व्यापार प्रमख सुनिल कुमार आणि पिंपळगावचे लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून उचलबांगडी करण्यात आलीये. नाफेड आणि एनसीसीएफची गोदामं एकच आहेत..एकत्र खरेदी दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आलाय. नाफेडचा कांदा परस्पर दुबईला फिरवण्यात आलाय..दुय्यम दर्जाचा कांदा नाफेडला दाखवून नाफेडचीही फसवणूक करण्यात आलीये.... 

  • वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 
    विधीमंडळातही टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणारेय. 

  •  महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प झालंय. स्वाफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तीन दिवसापासून यंत्रणा ठप्प आहे. डिस्चार्जसाठी परवानगी मिळत नसल्याने अनेक रुगणालय मध्ये हजारो रुग्ण डिस्चार्ज न मिळाल्याने अडकून पडले आहेत.  सरकारने पांढऱ्या रेशनकार्ड धारकाना देखील लाभ देण्याची घोषणा केली पण यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्याने गोंधळ उडालाय. नवीन स्वाफ्टवेअर अपडेट करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पेशंट डिसचार्ज झाल्यास बिलाची जबाबदारी कोण घेणार ? या साठी रुग्णालयांनी बरे झालेल्या पेशंट ला डिस्चार्ज देणे बंद केलं.

  • Breaking News Live Updates: वरंध घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला

    भोर महाड मार्गावरील वरंध घाटातील वारवंड गावाच्या हद्दीत टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळ्यानं अपघाताची घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात चालकाला धुकं आणि पाऊस यामुळं वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने, रात्रीच्या सुमारास पिकअप टेम्पो रस्त्याच्या कडेच्या दरीत नीरा देवघर धरणाच्या पात्रात कोसळला

  • मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली: अजित पवार

  • Breaking News Live Updates: झी २४ तासच्या वृत्ताची विधीमंडळात दखल

    जळगाव जिल्ह्यात पीकविमा कंपन्यांनी पात्र असतानाही अनेक दावे फेटाळून लावले आहेत. ७७,९३८ पैकी ६६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. ५९३ कोटी विमा दिला गेला. ८२१ कोटी रूपये प्रिमियम भरला होता. त्यातील जळगावमध्ये ३७३ कोटी प्रिमियम भरला होता व जळगाव जिल्ह्यात ५९३ कोटी दिले गेले. १०९१९ प्रस्तावांमध्ये केळीपीक आढळून आले नाही. नंतर पुनर्तपासणी केल्यावर २९ शेतक-यांना भरपाई दिली गेलीय. काहींनी मोकळ्या जमिनीवर,नदीपात्रात केळी दाखवली आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

  • Breaking News Live Updates: 6 जुलै रोजी महायुतीचा मेळावा 

    विधान परिषद आणि विधानसभेच्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व. आमदार खासदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित 

  • Breaking News Live Updates: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा अपघात; एक ठार

    मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली जवळ बोरघाटात नवीन बोगद्यात तीन वाहनांचा अपघात झाला. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून ट्रेलर, कार कंटेनर आणि गॅस टँकर एकमेकांना धडकले. अक्षय ढेले असे मृत टँकर चालकाचे नाव आहे

  • Breaking News Live Updates: सकाळी सकाळी ठाणेकरांना मनस्ताप; वाहतुकीची प्रचंड कोंडी

    घोडबंदर मार्ग तसेच ब्रम्हांड,कोलशेत वर्तक नगर इथेही मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे घोडबंदर वहिनी वर, आनंद नगर सिग्नल येथे मल्टी एक्सल ट्रक बंद पडला आहे. ते काढण्याची काम चालू आहे त्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे.

  • Breaking News Live Updates:  विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मागे घेणार नाहीः अजित पवार 

    माझ्याकडे दोन उमेदवार जिंकतील इतक्या आमदारांची संख्या पाठिशी आहे. त्यामुळं उमेदवार मागे घेणार नाही. आमचे संख्याबळ योग्य आम्ही 9 उमेदवार ठेवणार, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

  • Breaking News Live Updates:   भिवंडी नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांनी केली उठाबशा काढण्याची शिक्षा 

    अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून त्यांना कानाला धरून उठाबशा काढण्याची शिक्षा दिलेली आहे.जेणेकरून यापुढे ते पुन्हा या नदीपात्रात पोडण्यासाठी जाणार नाहीत.

  • Breaking News Live Updates: पोलीस भरतीच्या परीक्षेची संधी देण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन 

    पोलीस भरती 2022-23 मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. वय गेलेल्यांना एक संधी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. पोलीस भरती 2022-23 मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पण वय निघून गेलेल्या मुलांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु. कागदपत्रे उशिरा मिळाल्याने बऱ्याच SEBC उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही त्यांना भरती मध्ये फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करू द्यावी या विविध मागण्यांना घेवून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हे युवक आंदोलन करत आहेत. 

  • Breaking News Live Updates: हाथरसमध्ये पोहोचले राहुल गांधी; चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांची घेणार भेट

  • Breaking News Live Updates: शेगाव संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखीचे धाराशिव जिल्ह्यात आगमन

    आषाढी वारीसाठी श्री क्षेञ शेगावहुन निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी दिंडी हरी नामाचा जयघोष करत धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली असुन जिल्ह्यातील कळंब शहारात या पालखीचे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले

  • Breaking News Live Updates:  विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?

    लोकसभा निवडणूकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच सर्वांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत. परंतु त्‍यापूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका घेण्‍याचा विचार सुरू आहे. त्‍यादृष्‍टीने निवडणूक आयोगाने पावले टाकण्‍यास सुरूवात केली आहे. मुदत संपलेल्‍या आणि आगामी काळात मुदत संपणारया ग्रामपंचायतींच्‍या अंतिम मतदार याद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम घोषित करण्‍यात आला आहे. 

  • Breaking News Live Updates:  मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच

    T-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्व विजेत्या क्रिकेट टीमचे मुंबईत प्रथमच आगमन झालं मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियमच्या दरम्यान खुल्या बस मधून वर्ल्ड कप घेऊन भारतीय क्रिकेट टीमने हजारोंच्या संख्येने जमा झाले होते. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच पडलेला होता. पालिका कर्मचारी चपलांचा खच जमा करत आहेत. चार छोट्या गाड्या आणि तीन मोठे डंपर भरून आतापर्यंत जमा झाले चपला बूट. टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने जमा झाले होते क्रिकेटप्रेमी.गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

  • Breaking News Live Updates: अजित पवार करणार शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा?

    राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात भरमसाठ घोषणांचा पाऊस पडला असला तरी अर्थमंत्री अजित पवार आजही काही घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अजित पवार आज १२ वाजता उत्तर देतील. यावेळी ते शेतक-यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा करणार आहेत. तसंच सीमाभागात राहणा-या मराठी बांधवांसाठीही ते घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

  • Breaking News Live Updates: अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा

    बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांब्यांवरून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचे निदर्शनास आले आहे. 

  • Breaking News Live Updates: सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

    अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण होवून आज गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे.

  • Breaking News Live Updates: पालखी सोहळ्यात राहुल गांधींच्या येण्यावरून टीका

    संतांच्या पालखी सोहळ्यात राहुल गांधी यांनी कॅट वॉक करू नये. काँग्रेस आणि शरद पवार राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर करत आहेत. भाजप नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची टीका

  • Breaking News Live Updates: हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री; तिसऱ्यांदा घेतली शपथ

    हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 8 जुलै रोजी हेमंत सरकारची फ्लोर टेस्ट होणार त्याचबरोबर विधानभवनात बहुमतदेखील सिद्ध करणार.

  • Breaking News Live Updates: कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी १९ महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार

    -व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-या मुलींची १०० टक्के शुल्काची प्रतिपुर्ती होणार
    -गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय होणार
    -शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल
    -काजू उत्पादक शेतक-यांना अनुदान
    -नविन पर्यटन धोरणासह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार

  • Breaking News Live Updates: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीवर खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती

    केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने विविध विषयांवरील मंत्रिमंडळाच्या विशेष समितींच्या आज घोषणा केली. गुंतवणूक आणि विकास या विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीवर शिवसेना खासदार केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) श्री. प्रतापराव जाधव यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link